Fitness

घरच्या घरी पायाचा थुलथुलीतपणा कमी करतील Ankle weights वाचा कसे

Leenal Gawade  |  Jan 16, 2020
घरच्या घरी पायाचा थुलथुलीतपणा कमी करतील Ankle weights वाचा कसे

जाड मांड्या, थुलथुलीत मांड्या अशी तुमच्याही पायाची अवस्था झाली असेल तर तुम्हाला तुमच्या पायांना Toned करणे फारच गरजेचे आहे. जर तुम्ही पाय कमी करण्यासाठी वेगवेगळे व्यायामप्रकार करुन पाहात असाल तर आणखी पर्याय आम्ही तुमच्यासाठी आणला आहे.अगदी घरच्या घरी तुम्ही याचा उपयोग करुन तुमचे पाय टोन्ड आणि सुंदर बनवू शकता. पायांचा थुलथुलीतपणा कमी करण्यासाठी या Ankle Weights चा नेमका कसा वापर करायचा आणि ते वापरताना नेमकी काय काळज घ्यावी ते सांगणार आहोत मग करुया सुरुवात

रोज दोन अंडी खाण्याचे फायदे वाचाल तर आजपासूनच अंड्याचे सेवन कराल सुरु

Ankle Weights म्हणजे काय?

shutterstock

नर्तिका ज्याप्रमाणे पायांना घुंगरु बांधतात अगदी त्याचप्रमाणे हे  Ankle Weights असतात. म्हणजे यावर घुंगरु नसते इतकेच. तुम्हाला वेगवेगळ्या वजनामध्ये हे  Ankle Weights मिळतात. 0.75 पासून या वजनांना सुरुवात होते ते जास्तीत जास्त 2 किलो इतके त्यांचे वजन असते. तुम्ही कोणत्या वजनगटात मोडता त्यानुसार तुम्हाला  Ankle Weights घ्यायचे असते. त्यासाठी तुम्ही जिथून Ankle Weights घेत आहात. त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन घ्या किंवा तुम्ही जीमला जात असाल तर तिथे ट्रेनरला विचारुन मगच याची खरेदी करा. 

असा करा Ankle Weightsचा वापर

shutterstock

आता तुम्ही  Ankle Weights विकत घेतल्यानंतर तुम्हाला त्यांचा वापर नेमका कसा करायचा हे माहीत हवं.   Ankle Weights घातल्यानंतर तुम्ही तुमच्या व्यायामाची सुरुवात कशी करायची ते आता पाहुया 

वॉकिंग: आता तुम्हाला पहिल्यांदा जर काही करायचे आहे तर ते चालायचे आहे. जागच्या जागी चालले तरी चालू शकेल. वजन घालून चालल्यामुळे तुमच्या चालण्यामध्ये बराच फरक पडतो. तुम्ही दहा पावलं चालल्यानंतर तुम्हाला कदाचित घामही येऊ शकतो. थकवा जाणवून शकतो. तुमच्या पायांवर अतिरिक्त ताण जाणवतं असेल तर वजन पायातून काढून टाका. पण तुम्ही तुमची क्षमता हळुहळू वाढवणे या व्यायामप्रकारात फारच गरजेचे असते. 

जंपिग जॅक्स: आता तुम्हाला थोडा आणखी Intense वर्कआऊट हवा असेल तर तुम्ही  Ankle Weights घालून जंपिग जॅक्स करु शकता म्हणजे तुम्हाला एका जागी उभे राहून उड्या मारा. पाय फाकवताना तुम्हाला दोन हात वर घ्यायचे आहेत. असे तुम्हाला जमेल तितक्या वेळात करायचे आहे. 

लेग लिफ्ट:  हा प्रकार तुम्हाला झोपूनही करता येतो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यातील व्यायाम निवडा. तुम्हाला किमान 1 सेकंद तरी पाय वर  हवेत ठेवायचा आहे.असे तुम्हाला दोन्ही पायांचे करायचे आहे. आधी 10 पासून सेट सुरु करा नंतर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार व्यायाम वाढवा. 

झुंबा: आता तुम्हाला टीपिकल व्यायाम आवडत नसेल तर तुम्ही मस्त झुंबा किंवा डान्स करु शकता.  Ankle Weights घालून जेवढं शक्य असेल तेवढं नाचा. तुम्हाला नक्कीच काही कॅलरीज बर्न केल्यासारख्या वाटतील

हातावरची चरबी महिनाभरात करा कमी, जाणून घ्या

ही काळजी ही आहे महत्वाची

आता तुम्ही  Ankle Weights घालत असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 

मग आता पायांचा थुलथुलीतपणा कमी करा आणि फिट राहा. 

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय (How To Reduce Face Fat In Marathi)

Read More From Fitness