Fitness

कंबरेवरील चरबी करायची असेल कमी तर प्या लवंगेचे पाणी

Dipali Naphade  |  Jul 20, 2020
कंबरेवरील चरबी करायची असेल कमी तर प्या लवंगेचे पाणी

आपली लाईफस्टाईल आणि नियमित व्यायाम  न करण्याच्या सवयीमुळे अंगावर बऱ्याच ठिकाणी चरबी साचते. मात्र कंबरेवर चरबी साचली तर ती कमी करण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात. पण तुम्हाला जर कंबरेवरील चरबी कमी करण्यासाठी सोपा उपाय सांगितला तर? हो तुम्ही स्वयंपाकघरातील असा एक पदार्थ वापरून कंबरेवरील चरबी नक्कीच कमी करू शकता. आपल्याकडे लवंगेचा उपयोग हा मसाल्यामध्ये अथवा भाजीमध्ये जेवणाचा स्वाद वाढविण्यासाठी करण्यात येतो. मात्र कंबरेवरील चरबी कमी करण्यासाठीही याचा उपयोग करता येतो हे तुम्हाला माहीत आहे का? लवंग आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मदत करते. यामध्ये प्रोटीन, लोह, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि हायड्रोक्लोरिक अॅसिड जास्त प्रमाणात असते. केवळ चरबी कमी करण्यासाठीच नाही तर अनेक आजारांपासून दूर राखण्यासाठीही लवंगेच्या पाण्याचा उपयोग करून घेता येतो. याचा कसा वापर करायचा आणि त्याचं किती प्रमाण असायला हवं ते आपण या लेखातून पाहूया.

हातावरची चरबी महिनाभरात करा कमी, जाणून घ्या (How To Reduce Arm Fat In Marathi)

लवंगेमुळे कशी होते चरबी कमी?

Shutterstock

लवंग ही शरीरातील मेटाबॉलिजम उत्तेजित करते, ज्यामुळे शरीरातील विशेषतः कंबरेवरील चरबी कमी करण्यास मदत  मिळते. यामध्ये अँटिकोलेस्टेरिक आणि अँटिलिपीड गुण असतात. जेव्हा लवंग काळी मिरी, दालचिनी आणि जिऱ्यासह मिक्स करण्यात येते तेव्हा शरीरातील मेटोबॉलिक रेट वाढण्यास मदत होते. कमी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेससारख्या आजारावरही हे लागू आहे. लवंग शरीरातील ब्लड शुगर नियंत्रित करण्यास मदत  करते. याचं पाणी कशा तऱ्हेने बनवून प्यायचे ते जाणून घेऊया.  तसंच लवंगेमुळे तुमची पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. जर तुम्हाला अयोग्य आहारामुळे अपचनाच्या समस्या होत असतील. अपचन, डायरिया, पोटात गोळा येणं, बद्धकोष्ठताच्या समस्या जाणवत असतील तर याचा तुमच्या समस्या दूर करण्यासाठी नक्कीच चांगला वापर होतो. एकदा अपचनाची समस्या कमी झाली की आपोआपच शरीरातील चरबी कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे यामध्ये लवंगेची खूपच मदत मिळते

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय (How To Reduce Face Fat In Marathi)

लवंगेच्या पाण्याने कमी होते कंबरेवरील चरबी

Shutterstock

लवंगेचे पाणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य 

कसे बनवावे लवंगेचे पाणी 

एका पॅनमध्ये लवंग, दालचिनी आणि जिरे घ्या आणि हे सर्व भाजून घ्या.  याचा एक वेगळा सुगंध तुम्हाला येईल. हा सुगंध यायला लागल्यावर गॅस बंद करा. हे मिश्रण मिक्सरमधून वाटून त्याची पावडर करून घ्या आणि एका हवाबंद डब्यात भरून ठेवा.

कसे करावे सेवन 

एक ग्लास पाणी गरम करा आणि त्यामध्ये लवंगेची बनवलेली पावडर एक चमचा घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात एक चमचा मध मिक्स करा आणि सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी तुम्ही हे पाणी प्या. तसंच तुमचा नेहमीच हलका व्यायामही यासह चालू ठेवा. सतत तळलेले पदार्थ खात राहू नका. तुम्हाला योग्य रिझल्ट हवा असेल तर नियमित लवंगेच्या पाण्याचे सेवन करा आणि त्यासह योग्य डाएटही फॉलो करा. असं केल्यास, तुम्हाला लवकरच चांगला परिणाम  दिसून येईल आणि तुमच्या कंबरेवरील चरबी कमी होईल.  

स्वयंपाकघरात सापडतील तुम्हाला नैसर्गिक पेनकिलर्स, आता गोळ्या घेण्याची गरज नाही

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

Read More From Fitness