त्वचेची काळजी

त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी डेली स्किन केअर रूटिनमध्ये असं वापरा ग्लिसरीन

Trupti Paradkar  |  Jun 9, 2021
त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी डेली स्किन केअर रूटिनमध्ये असं वापरा ग्लिसरीन

त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये  ग्लिसरिन वापरलं जातं. कारण ग्लिसरिनमुळे त्वचेला पोषण आणि मऊपणा येतो. ग्लिसरिन हे असं एक प्रॉडक्ट आहे ज्यामुळे तुमची त्वचा मऊ तर राहतेच शिवाय त्वचेच्या अनेक समस्या यामुळे कमी होतात. ग्लिसरिन म्हणजे एक रंगहीन आणि गंधहीन पॉलीओल कपाउंड असते. चिकट असलेले ग्लिसरिन अॅंटि व्हायरल आणि अॅंटि मायक्रोबायल असतेच शिवाय ते नॉन टॉक्सिकदेखील असते. ग्लिसरिनमध्ये असे काही घटक पदार्थ असतात ज्यामुळे त्वचेला मऊपणा मिळतो. थंडीपासून संरक्षण करणाऱ्या अनेक  उत्पादनामंध्ये ग्लिसरिन वापरलं जातं. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी जाणून घ्या कसं आणि का वापरावं  ग्लिसरिन

ग्लिसरिनचा वापर करा क्लिंझरप्रमाणे

डेली स्किन केअर रूटिनमध्ये सर्वात महत्त्वाचं असते ते म्हणजे क्लिंझर. तुम्ही ग्लिसरिन एखाद्या क्लिंझरप्रमाणे वापरू शकता. यासाठी एका भांड्यात दोन चमचे दूध आणि एक चमचा ग्लिसरिन मिक्स करा.जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर तुम्ही त्यामध्ये मधही मिसळू शकता. कॉटन पॅडच्या मदतीने हे मिश्रण त्वचेला लावा आणि त्वचा क्लिन करा. 

त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी

चेहऱ्यावरील डेडस्किन काढण्यासाठी आणि त्वचेचे पोअर्स मोकळे करण्यासाठी तुम्ही ग्लिसरिन वापरू शकता. यासाठी आठवड्यातून एकदा त्वचेवर ग्लिसरिनचा स्क्रबप्रमाणे वापर करा. यासाठी एक चमचा साखर, दोन चमचे ग्लिसरिन आणि तुमच्या आवडीचे इसेंशिअल ऑईल मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. हलक्या  हाताने चेहऱ्यावर मसाज करा आणि मग चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.

चेहरा मॉईस्चराईझ करण्यासाठी

ग्लिसरिनमुळे त्वचेला पोषण आणि मऊपणा  येत असल्यामुळे तुम्ही ग्लिसरिनचा वापर मॉईस्चराईझरप्रमाणे नक्कीच करू शकता. यासाठी एका भांड्यात ग्लिसरिन आणि व्हिटॅमिन ईची कॅप्सुल एकत्र करा. रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर या मिश्रणाने मसाज करा. दिवसभरात दोनदा वापरल्यास याचा चांगला परिणाम तुमच्या त्वचेवर दिसू लागेल.

ग्लिसरिन एक उत्तम टोनर

तुमची त्वचा कोरडी असो वा तेलकट तुम्ही चेहऱ्यावर ग्लिसरिनचा वापर टोनरप्रमाणे नक्कीच करू शकता. ग्लिसरिन आणि गुलाबपाणी एकत्र मिक्स करा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून चेहऱ्यावर स्प्रे करा. ज्यांची त्वचा कोरडी आहे अशा लोकांसाठी हे टोनर खूप उपयोगी आहे. कारण यामुळे तुमची  त्वचा नियमित हायड्रेट राहिल.

ग्लिसरिन वापरताना लक्षात ठेवा या गोष्टी

ग्लिसरिन त्वचेवर लावण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्या.

फोटोसौजन्य – 

अधिक वाचा –

मिरर स्किन ट्रेंडची इतकी क्रेझ का, मग तुम्ही जाणूनच घ्या

अॅव्होकॅडो तेलाचे आहेत अद्भूत फायदे, सौंदर्यासाठी करा असा वापर

उर्वशी ढोलकियाप्रमाणे घ्याल त्वचेची काळजी तर चाळीशीतही दिसाल सुंदर

Read More From त्वचेची काळजी