Periods

हायजिन जपण्यासाठी कोणते उत्पादन आहे फायदेशीर

Vaidehi Raje  |  Mar 17, 2022
intimate hygiene

कोव्हीडच्या काळात निरोगी राहण्यासाठी हात धुणे ही महत्वाची क्रिया झाली होती. पण हा स्वतःला पूर्णपणे निरोगी ठेवण्याचा एकमेव मार्ग नाही, तर तुमच्या शरीराच्या इतर अवयवांचीही स्वच्छता पाळणे आवश्यक आहे. जरी याबद्दल क्वचितच बोलले जात असले तरी, इंटिमेट हायजिन जपणे अत्यंत महत्वाचे आहे. तुमच्या जननेंद्रियाच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. इंटिमेट हायजिन पाळले नाही तर त्याचा सेक्स ड्राइव्हवर परिणाम होऊ शकतो, प्रजननसंबंधित समस्या निर्माण होऊ शकते आणि काही संसर्ग तुमच्या खाजगी अवयवांपासून  पासून सुरू होतात परंतु हळूहळू ते संपूर्ण शरीरात पसरतात जे घातक ठरू शकतात. 

इंटिमेट हायजिन सर्वांसाठीच महत्वाचे 

बऱ्याच लोकांना असे वाटते की इंटिमेट हायजिन पाळणे केवळ महिलांसाठी महत्वाचे आहे. परंतु आपले खाजगी अवयव स्वच्छ आणि निरोगी ठेवणे पुरुषांसाठीही तितकेच महत्वाचे आहे. हे केवळ लैंगिक आरोग्यासाठीच नाही तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी आहे. इंटिमेट हायजिन पाळणे हे केवळ लैंगिक क्रियाकलापांमध्ये सहभागी होणार्‍या प्रौढांसाठी आवश्यक  नाही तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आवश्यक आहे. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी नियमित काळजी आणि हायजिन रुटीनचे पालन करणेही पुरेसे आहे. 

‘तिथल्या’ स्वच्छतेसाठी केवळ साबण आणि पाणी पुरेसे नाही  

साबण आणि पाणी वापरणे शरीराच्या इतर भागांच्या स्वच्छतेसाठी पुरेसे असू शकते, परंतु आपल्या स्त्रियांच्या खाजगी व नाजूक अवयवांच्या स्वच्छतेसाठी ते पुरेसे नाही. किंबहुना आपण जो साबण अंघोळीसाठी वापरतो तो खाजगी अवयवांच्या स्वच्छतेसाठी मुळीच वापरू नये. कारण  जवळजवळ सगळ्याच अंघोळीच्या साबणांमध्य ग्लिसरॉल सारखी रसायने असतात आणि त्यात सुगंधासाठी केमिकलयुक्त परफ्यूम घातलेले असतात ज्यामुळे तुमच्या खाजगी अवयवांचे (व्हजायनाचे)  पीएच संतुलन बिघडू शकते. यामुळे त्याठिकाणची त्वचा लालसर होणे , त्या ठिकाणी जळजळ होणे असे त्रास होऊ शकतात. आणि पीएचचे संतुलन बिघडल्याने हानिकारक बॅक्टेरियाचे संक्रमण होऊ शकते. 

पुरुष आणि स्त्रिया दोघांच्या शरीरातले पीएच स्तर भिन्न आहेत, जिथे स्त्रियांच्या व्हजायनाचे नॉर्मल पीएच हे 3.5-4.5 असते, तर पुरुषांची पीएच पातळी 5-5.5 असते. स्त्रियांच्या व्हजायनाचे हे ऍसिडिक पीएच हे त्याठिकाणी हानिकारक बॅक्टेरिया व फंगसची वाढ होऊ नये म्हणून असते. हे पीएच मेंटेन झाले नाही तर त्या ठिकाणी जंतूंची वाढ होऊन बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा यीस्ट इन्फेक्शन होऊ शकते.

पीएच मेंटेन होण्यासाठी उच्च गुणवत्तेचे इंटिमेट वॉश वापरा 

उच्च-गुणवत्तेचे आणि त्वचातज्ज्ञांनी चाचणी केलेले इंटिमेट वॉश वापरणे हा व्हजायनाचे पीएच जपण्याचा व इंटिमेट हायजिन जपण्याचा एक उत्तम मार्ग आहे. ऑरगॅनिक हार्वेस्टचे नैसर्गिक घटकांनी बनविलेले ऑरगॅनिक इंटिमेट वॉश वापरल्याने चांगले बॅक्टेरिया टिकून राहण्यास आणि हानिकारक घटक नष्ट करण्यास मदत होते. त्याठिकाणी आर्टिफिशीयल सुगंध असलेला साबण वापरण्याऐवजी हे नैसर्गिक उत्पादन घ्या. 

ऑरगॅनिक हार्वेस्ट इंटीमेट वॉश हे अल्कोहोल-मुक्त फॉर्म्युलेशन आहे. यामध्ये ऑरगॅनिक एलो व्हेरा आणि ऑरगॅनिक टी ट्री एक्स्ट्रॅक्ट आहेत जे जीवाणू आणि संसर्ग दूर ठेवतात. हे इंटिमेट वॉश वापरल्यास त्या ठिकाणी खाज सुटणे,जळजळ, कोरडेपणा हे त्रास कमी होतात तसेच इन्फेक्शन मुळे होणारी दुर्गंधी देखील नियंत्रित राहते  आणि तुम्हाला ताजेतवाने वाटते. हे तुमच्या खाजगी अवयवांचे pH संतुलन देखील राखते आणि तुम्हाला दिवसभर स्वच्छ आणि ताजे ठेवते. हे उत्पादन 100% सेंद्रिय ECOCERT प्रमाणित आहे तसेच हे शाकाहारी आणि क्रुएल्टी फ्री ऑरगॅनिक इंटीमेट वॉश आहे. म्हणूनच केमिकलयुक्त उत्पादने वापरण्यापेक्षा हे नैसर्गिक घटकांनी युक्त ऑरगॅनिक इंटिमेट वॉश वापरा व आपले इंटिमेट हायजिन जपा.

तसेच कोरोना व इतर संसर्गापासून बचावासाठी ऑरगॅनिक हार्वेस्टचे हॅन्ड सॅनिटायझर वापरा. याचा 70% अल्कोहोल आणि टी ट्री एसेंशियल ऑइल युक्त फॉर्म्युला हातावरील जंतू आणि संसर्गजन्य घटक काढून टाकण्यास मदत करतो. आणि रोगांपासून संरक्षण प्रदान करतो. 

ही ऑरगॅनिक उत्पादने वापरून तुम्ही तुमचे हायजिन अगदी सहजतेने जपू शकता. 

फोटो क्रेडिट – istockphoto


तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Periods