कितीही म्हटलं महिला स्वतंत्र आहेत आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी तितकाच सन्मान मिळतो. तरीही अनेक ठिकाणी आजही महिलांवर अनेक अत्याचार होताना दिसून येते. कोणती ना कोणती तरी बातमी कानावर येतेच. महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार या घटना कुठेतरी घडत असतातच. त्यामुळेच महिलांना अगदी लहानपणापासूनच स्वतःचे संरक्षण देण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. जर महिलांना असे प्रशिक्षण देता येत नसेल तर किमान एका वयात आल्यानंतर त्यांच्याकडे त्यांच्या संरक्षणासाठी स्प्रे पर्समध्ये असणंही गरजेचे आहे. आता हा नक्की स्प्रे म्हणजे कोणता स्प्रे आणि त्याचा कसा उपयोग होईल याबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत. हा एकमेव स्प्रे तुमचे संरक्षण करण्यासाठी योग्य आहे. याचा कसा उपयोग करावा याबाबत तुम्हाला माहीत असायला हवे.
सिरोना इम्पॉवर पेपर स्प्रे (Sirona Impower Pepper Spray)
आपल्याकडे अनेक महिला आहेत ज्या आता रात्रपाळीही करतात अथवा अनेक ठिकाणी रात्री ऑफिसला जातात. अशावेळी अनेक ठिकाणी महिलांना एकांतात रस्त्यातून प्रवास करावा लागतो. पण मग अशावेळी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारीही येते. संरक्षणासाठी अशावेळी सिरोनाचा इम्पॉवर डिफेन्स पेपर स्प्रे नक्कीच उपयोग ठरतो. या स्प्रे च्या बाटलीचं वजन हलकं आहे. त्याशिवाय तुमच्यावर कोणीही हल्ला केल्यास, तुमच्यासाठी हा अत्यंत परिणामकारक स्प्रे आहे. साधारण 12 फूटांपासून याचा परिणाम होतो हे महत्त्वाचे. यामध्ये असणारे घटक हे हल्लेखोराच्या डोळ्यावर चांगलाच परिणाम करतात आणि त्याशिवाय या स्प्रे मुळे हल्लेखोराच्या त्वचेवर जळजळ होण्यास मदत मिळते. साधारण पाऊण तास अर्थात 45 मिनिट्स या स्प्रे चा परिणाम समोरच्या व्यक्तीवर होत राहातो. हा स्प्रे 100 टक्के विषारी नाही अर्थात यामध्ये कोणत्याही पद्धतीने विष मिक्स करण्यात आलेले नाही. तसंच तुम्ही ज्या व्यक्तीवर हा वापरणार आहात, त्या व्यक्तीला कायमचा त्रास होत नाही. काही वेळापुरतेच समोरच्या व्यक्तीला हा स्प्रे त्रासदायक ठरतो. जेणेकरून तुम्हाला त्यातून सुटून जाता येईल यासाठीच या स्प्रे चे उत्पादन तयार करण्यात आले आहे. तसंच हा स्प्रे घेऊन जाणेही सोपे आहे आणि तुम्हाला फायदेशीरही ठरतो.
कसा करावा याचा उपयोग
- रात्रीच्या प्रवासात कायम बॅगेत हाताशी येईल अशाच ठिकाणी हा स्प्रे ठेवावा
- हा स्प्रे हल्लेखोराच्या डोळ्यावर मारावा. यामुळे साधारण पाऊण तास डोळ्यांची जळजळ होत राहाते आणि हल्लेखोरांना स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही
- तसंच स्प्रे डोळ्यात गेल्यानंतर सतत पाणी येत राहाते आणि समोरच्या व्यक्तीला त्रास देणं हे हल्लेखोरांना जमत नाही
- स्प्रे मारल्यानंतर समोरच्या व्यक्तीला श्वास घेण्यासही त्रास होतो. त्यामुळे तुम्ही पटकन मोकळे होता आणि तुम्हाला तिथून पळ काढता येतो
- याशिवाय हा स्प्रे मारल्यानंतर समोरच्या व्यक्तीला खूपच जोरात खोकला लागतो. त्यामुळे तुमच्यावरील त्यांचे लक्ष पटकन हटण्यास मदत मिळते. तसंच तुम्हाला पुढचं पाऊल उचलण्यास वेळ मिळतो
- स्प्रे पटकन डोळ्यावर मारावा आणि आपण बाजूला व्हावे. जेणेकरून आपल्या डोळ्यात या स्प्रे चा परिणाम होऊ देऊ नका
- याशिवाय तुम्ही तुमच्यासह स्प्रे बरोबरच लाल तिखट पावडरदेखील पर्समध्ये ठेऊ शकता. तुम्हाला कुठेही काहीही चुकीच्या हालचाली जाणवल्यानंतर तुम्ही याचा हमखास उपयोग करा आणि स्वतःचे संरक्षण करा
तुम्हीही जर रात्रीच्या वेळी प्रवास करत असाल तर तुम्हाला हमखास या स्प्रे चा तुमच्या सामानामध्ये समावेश करून घ्यायला हवा. तुम्हीही तुमच्या संरक्षणासाठी याचा वापर करावा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक