नातीगोती

Valentines day: तुमच्या व्हेलेंटाईनला द्या युजफुल गिफ्टस (Gifts To Give On Valentines Day In Marathi)

Leenal Gawade  |  Feb 7, 2019
Valentines day: तुमच्या व्हेलेंटाईनला द्या युजफुल गिफ्टस (Gifts To Give On Valentines Day In Marathi)

गुलाबाची फुले, चॉकलेट, फुगे असं काही देऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्कीच काहीतरी युनिक गिफ्ट तुमच्या व्हेलेंटाईनला द्यायला हवे. असे गिफ्टस ज्यांचा काहीतरी उपयोग असेल. हा म्हणजे तुम्ही इतका विचार करुन तुमच्या प्रियकराला / प्रेयसीला काहीतरी घेत असता पण त्याचा उपयोग त्यांना काहीच नसेल तर काय फायद्याचे… नाही का? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असेच काही युजफुल गिफ्टस सांगणार आहोत. जे तुमच्या इतर गिफ्टसपेक्षा नक्कीच वेगळे असतील आणि महत्वाचे म्हणजे ते तुमच्या पार्टनरला त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल. त्यामुळे व्हेलेंटाईन्स डेला बाहेर दिसणाऱ्या गुलाबी गुलाबी गिफ्टपेक्षा मस्त आणि टिकाऊ असे हे गिफ्टस नक्की द्या.

इनरवेअर

हेअर रिमुव्हल मशीन

पार्लर मेंबरशीप

प्रोटीन बार

स्किन केअर किट (Skin Care Gifts)

हल्ली त्वचेची काळजी घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. स्किन टाईप ओळखून फेसवॉश, टोनर, मॉश्चरायझर्स असा किट गिफ्ट करणे नक्कीच चांगली आयडिया आहे. आज नाही म्हटलं तरी सगळ्यांना छान दिसायचे असते. प्रेझेंटेबल राहायचे असते. कोणी काय कपडे घातले या आधी आपले लक्ष चेहऱ्यावर जाते. जर चेहरा प्रसन्न असेल तर समोरच्या व्यक्तीच्या तोंडावर नक्कीच हसू येते. त्यामुळे मुल काय किंवा मुली काय  त्वचेची अधिक काळजी घेत स्किन केअर किट वापरत असतात. हे गिफ्ट एक्सपेंसिव्ह आहेच. शिवाय डे टु डे लाईफमध्ये उपयोगी पडणारे. ती वस्तू वापरताना प्रत्येकवेळी तुमची आठवण आल्यावाचून राहणार नाही. शिवाय स्वत:ला पॅमपरींग करणाऱ्या गोष्टी कितीही नाही म्हटले तरी लोकांना आवडत असतात.

व्हेलेंटाईन्ससाठी काही खास प्लॅन करायचं आहे? पाहा ही काही रोमँटिक ठिकाणे

इनरवेअर (Innerwear)

यावर इतकं रिअॅक्ट करण्याची काहीच गरज नाही. कारण कपड्यांमधील सगळ्यात महत्वाची अशी ही वस्तू आहे. खूप जणांना चांगले आणि वेगळे इनरवेअर घालायला आवडत असतात. जर तुमच्याही प्रेयसीला किंवा प्रियकराला इनरवेअरची आवड असेल तर तुम्ही ते देखील देऊ शकता.मुलींच्या वेगवेगळ्या ड्रेसचा विचार करता त्यांना तितक्याच वेगवेगळ्या ब्रा आणि पँटी लागत असतात. ऑफ शोल्डर, सिंग्लेट,शॉर्ट स्कर्ट, टाईट पँडस या सगळ्यावर वेगवेगळ्या इनरवेअर हल्ली आवर्जून घातल्या जातात. जितके कपड्यांचे रंग त्या शेड्सला मॅच करणारे इनरवेअर घालण्याची अनेकांना सवय असते. त्यामुळे इनरवेअर देणे हा बेस्ट ऑप्शन आहे. (आता अनेकांना ही फार खासगी वस्तू आहे. अगदी पहिल्याच व्हेलेंटाईनला असे गिफ्ट नको असे वाटत असेल तर ते देऊ नका. कदाचित समोरची व्यक्ती तुमचा ही वस्तू देण्यामागचा हेतू समजू शकणार नाही.

तुमच्या जोडीदारासाठी काय कराल सरप्राईज प्लॅन

हेअर रिमुव्हल मशीन (Hair Removal Machine)

आयत्यावेळी कुठे कार्यक्रमाला जायचे झाले त्यातच जर ड्रेस स्लिव्हलेस, शॉर्ट असेल तर मग लगेच आपले लक्ष हातापायांकडे जाते. हात, पाय, अंडरआर्म्स, अप्पर लीप्स अशा ठिकाणी केस वाढल्यानंतर आयत्यावेळी वॅक्सिंगला जायला अनेकांना आवडत नाही. अशावेळी अशा मशीन्स फार उपयोगाला येतात. अडचणीतून देव वाचवायला आला अशी फिलींग असते. ऑनलाईन सर्च केले तर वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर रिमुव्हल मशीन मिळतात. ज्या गिफ्टसाठी बेस्ट ऑप्शन आहेत. पुरुष आणि महिला दोघांसाठी हे प्रोडक्ट मिळते. मुलांच्या हेअर रिमुव्हल किटमध्येही अनेक प्रकार आहेत.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणं अशी आहेत जी तुम्हाला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी फिरता येतील

हेअर ग्रुमिंग किट (Hair Trimming Kit)

जसा ड्रेस तसे केस अशी हल्ली फॅशन झाली आहे. त्यामुळे हेअरस्टाईलमध्ये सतत व्हरायटी करायला अनेकांना आवडत असते. कधी कर्ल्स, कधी स्ट्रेट, कधी काय आणि कधी काय असं सतत चालूच असतं. अशावेळी असे ग्रुमिंग सेट नक्की द्या. कारण त्याचा खूप उपयोग मुलींना होतो.  त्यातच जर तुमची प्रेयसी स्टाईल एक्सपर्ट असेल तर तिच्यासाठी हेअर ग्रुमिंग सेट सर्वोत्तम पर्याय आहे. मुलांचेही ग्रुमिंग हल्ली चांगलेच वाढले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठीही ग्रुमिंगचे चांगले किटस मिळतात.

पार्लर मेंबरशीप (Parlour Membership)

मुल काय किंवा मुली काय? पार्लरमध्ये तासनतास घालवायला आवडत असते. पार्लरमधल्या मूळ किमतीत जराही सूट मिळाली कि तो आनंद परामंद असतो. त्यामुळे चांगल्या पार्लरची छान वर्षभराची मेंबरशीप घ्या. अशा काही दिवसांमध्ये चांगली ऑफरसुद्धा असते. याचा फायदा घेऊनच वर्षभराची मेंबरशीप घ्या. तुमच्या पार्टनरला आणि तुम्हाला चांगले पॅंपर करुन घ्या. 

एवढं सगळं करताय पण तुम्हाला व्हेलेंटाईन्स डेचा खरा अर्थ कळला आहे का? 

जीम वेअर अॅण्ड अॅसेसरीज (Gymwear And Accessories)

हल्ली जीमला जाण्याची क्रेझ वाढत आहे. जर तुमच्या आवडणाऱ्या माणसाला जीमला जाण्याची फारच आवड असेल त्यांना थोडं ट्रेंडी करा. जरा नव्या स्टाईलच्या टाईट्स, टिशर्ट, शॉर्टस, स्पोर्टस ब्रा असे हल्ली बरेच काही मिळते. आता जीम म्हणजे जाऊन नुसता व्यायाम करणे नाही तर तुम्हाला तितकेच चांगले कपडेही जीममध्ये हवे असतात. त्यातच जर तुमची फिगर चांगली असेल तर ते दाखवण्यासाठी तुमचे कपडेही तसेच हवे ना ? म्हणून जीमवेअरसुद्धा चांगला पर्याय आहे. या शिवाय जीमसाठी लागणाऱ्या बॅग्स,शेकर्स, वॉटर बॉटल असेही काही देता येऊ शकते.

प्रोटीन बार (Protein Bar)

ह आयुष्य इतकं धकाधकीचे झालेले आहे की, पौष्टिक पदार्थ प्रत्येकवेळी खाता येतेच असे नाही. अशावेळी अरबट चरबट खाण्याची सवय लागते. आपल्या पार्टनरने फिट आणि फाईन राहायला हवे असे वाटत असेल तर छान प्रोटीन बार द्या. हल्ली वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये प्रोटीन बार मिळतात. एकाचवेळी महिन्याभर पुरतील इतके प्रोटीन बार छान पॅक करुन गिफ्ट द्या. रोज बॅगमध्ये एक प्रोटीन बार कॅरी करणार म्हटल्यावर तुमची आठवण नक्कीच येणार.शिवाय तुम्ही त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहात हे देखील लक्षात येईल.

वाचा : व्हॅलेंटाईन डे साठी ड्रेस

फुट स्पा किट (Foot Spa Kit)

चेहऱ्यासोबत पायांची काळजी घेणे ही गरजेचे असते. त्यामुळे फुट स्पा किट द्या. आता अनेक ऑनलाईन स्टोरमध्ये असे फुट स्पा किट आहेत. फुट स्पा किटमध्ये क्लिंझिंग, स्क्रबिंग, मसाज क्रिम असे सगळे काही असते. आठवड्यातून एकदा छान गरम पाण्यात पाय बुडवून बसायला आणि पाय स्वच्छ करण्यासारखे चांगले सुख नाही. ते दुसऱ्यांनी करुन दिल्यास उत्तम हा विनोदाचा भाग झाला. पण अगदी त्याच पद्धतीने तुम्ही वेगवेगळे स्पा किट भेट म्हणून देऊ शकता. 

बॉडी मसाजर (Body Massager)

बॉडी मसाजर हे देखील चांगले गिफ्ट असू शकते. सेलवर चालणारे मसाजर खूप आरामदायी असतात. विशेष म्हणजे ते ऑफिसमध्येदेखील ठेवता येऊ शकते. बसून बसून कंटाळा आला किंवा पाठ दुखू लागली की, या मसाजरची नक्कीच आठवण येईल. अरे रिलॅक्स व्हायला प्रत्येकाला आवडत असते. तुम्ही एका दिवसाच्या स्पाची ट्रिट देण्यापेक्षा त्यांच्यासोबत कायम असलेला मसाजर हा बेस्टच आहे. त्यामुळे हे गिफ्टसुद्धा उपयोगाचे आहे आणि एकमेकांना देण्यासाठी एकदम परफेक्ट आहे.

महिला दिनानिमित्त तुमच्या सहकाऱ्यांना पाठवा हे

ऑरगनायझर (Organiser)

कपडे कपाटात कोंबण्याची सवय अनेकांना असते. अशावेळी थोडी शिस्त लागण्यासाठी आणि कपाट चांगले दिसण्यासाठी चांगल्या ऑरगनायझर  पाऊच द्या. मेकअप किट, ज्वेलरी, ब्लाऊज, नव्या साड्या, ब्रा , शूज असे बरेच काही ठेवण्यासाठी हे ऑरगनायझर उपयोगाचे असतात. वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी इतके सुंदर ऑरगनायझर बाजारात मिळतात की, तुम्ही ते नक्कीच देऊ शकता. अशा ऑरगनायझर पाऊचेसमुळे तुमच्या पार्टनरला कपडे नीट कपाटात लावण्याची सवय सुद्धा लागेल.

वेबसिरिजची सबस्क्रिप्शन (Webseries Subscription)

हल्लीचा जमाना हा वेबसिरिजचा आहे. त्यामुळे हल्ली अनेक जण वेबसिरिज हमखास पाहात असतात. त्यामुळे अशावेळी या वेबसिरिज इतर कुठूनही डाऊनलोड करण्यापेक्षा एकमेकांना छान वेबसिरिजची ट्रिट द्या. ही तर अगदीच आवडण्यासारखी गोष्ट आहे. कारण वर्षभरात अनेक चांगल्या सिरीज येणाऱ्या असतील त्यामुळे या वेबसिरिजचा चांगला फायदा होईल. अमेझॉन,नेटफ्लिक्स, अल्ट बालाजी यांसारख्या वेबसाईटवर खूप वेगवेगळ्या विषयाचा वेबसीरिज येत असतात.

वाचा – व्हॅलेंटाईन डे साठी उत्कृष्ट

 (सौजन्य-Instagram)

Read More From नातीगोती