Sex Education

तुमच्या पार्टनरला माहीत असायला हव्या व्हजायनाबाबतच्या ’11’ गोष्टी

Aaditi Datar  |  May 16, 2019
तुमच्या पार्टनरला माहीत असायला हव्या व्हजायनाबाबतच्या ’11’ गोष्टी

व्हजायनाबाबतची पूर्ण नाही पण थोडीफार माहिती आपल्या सर्व मैत्रिणींना नक्कीच असेल. प्रत्येक स्त्रीला आपल्या व्हजायनाबाबत आकर्षण असतं. पण आपल्यापेक्षा आपल्या व्हजायनाबाबत अधिक आकर्षण असते ते आपल्या पार्टनरला. कारण सेक्समध्ये मिळणारा आनंद आणि वेदना (तुमच्या पीरियडच्या काळात तुम्हाला होणारा त्रास ) एकाच वेळी आपलं व्हजायना सहन करत असतं. पण आपल्या व्हजायनाबाबत तरीही आपल्याला पुरेशी माहीती असेलच असं नाही. आपल्या व्हजायनाबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यालाही माहीत नाहीत. एकवेळ आपल्याला जरी माहीत असल्या तरी त्या आपल्या पार्टनरला माहीत असतीलच असं नाही. (जोपर्यंत आपण त्यांना सांगत नाही.) मग या आहेत त्या व्हजायनाबाबतच्या महत्त्वाच्या 11 गोष्टी ज्या तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरलाही माहीत असल्याच पाहिजेत. कदाचित या गोष्टी जाणून घेतल्यावर तुमच्या सेक्सचा आनंदही अजून वाढेल.

1. तुम्ही व्हजायना पाहू शकत नाही

व्हजायनाबद्दल आपल्याला कितीही आकर्षण असलं तरी स्वतःला कधीच तो पाहता येत नाही आणि ज्या वरील भागाला लोकं व्हजायना असं समजतात ते व्हजायना नसून ते व्हल्वा आहे. जो बाहेरील भाग आपण पाहतो त्यालाच व्हल्वा असं म्हणतात. खरंतर व्हजायना म्हणजे एक ट्यूब आहे जी आपल्या गर्भाशयाच्या मुखाला (cervix) जोडलेली असते. त्यामुळे सर्वात आधी तुम्ही आणि नंतर तुमच्या पार्टनरने हा फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण ज्याला व्हजायनल हायजीन म्हणतो ते खरंतर व्हल्वोजायनल हायजीन आहे.

2. प्रत्येक मुलीला हिमेन असेलच असं नाही

जगभरात चर्चांची वादळ सुरू आहेत ती एका शब्दांमुळे तो म्हणजे व्हर्जिनिटी. हिमेन हा शब्द तुम्ही फार कमी ऐकला असेल त्यापेक्षा तुम्ही सर्वात जास्त ऐकलेला शब्द असेल तो म्हणजे व्हर्जिनिटी. पण व्हर्जिनिटी ज्यावरून कळते तो भाग म्हणजे हिमेन. हिमेन म्हणजे व्हजायनाआधीचा नाजूकसा पडदा समजा. काही देशात तर यासाठी खास शस्त्रक्रियाही करून घेतली जाते. असो तो जर वेगळाच विषय आहे. आपण पुन्हा व्हजायनाकडे वळूया. तर प्रत्येक मुलीला हिमेन असेलचं असं नाही. काही जणींना ते असतं तर काहींना फिजिकल अॅक्टीव्हीटी जसं सायकलिंग किंवा वर्कआऊट केल्यामुळे हा पडदा फाटू शकतो. त्यामुळे हे गरजेचं नाही की, प्रत्येक मुलीला पहिल्या सेक्सनंतर ब्लीडींग होईलच. जरी तिला ब्लीडींग झालं नाही तरी ती व्हर्जिन नाही असा अर्थ लावू नये..  

व्हजायनल हेअर स्वच्छ करण्याचे घरगुती उपाय

3. व्हजायनालाही असतो वास आणि चव

हो…वाचून आश्चर्य वाटलं ना. पण हे खरं आहे की, जे तुम्ही खाता त्याचा वास तुम्हाला व्हजायनामध्ये जाणवतो. मग तो चांगला-वाईट काहीही असू शकतो. उदाहरणार्थ भाज्या, हर्ब्स आणि फळ यामुळे तुमच्या व्हजायनाला एक गोडसर चव येते, असं म्हणतात. पण हे फक्त काही काळासाठी असतं. तुमच्या डाएटप्रमाणे हा वासही बदलत असतो.  आहे ना ऐकावे ते नवलच. आता या वासाबद्दल किंवा चवीबद्दल तुमच्यापेक्षा जास्त नक्कीच तुमच्या पार्टनरला माहीत असेल नाही का.

4. प्रत्येक व्हल्वाचा आकार असतो वेगळा

जर तुम्ही आधी व्हजायनाबाबत वाचलं असेल तर तुम्हाला व्हजायनाच्या म्हणजेच व्हल्वाच्या विविध आकाराबद्दल माहीत असेलच. जगभरातल्या कलाकारांनी आपापल्या कल्पनाशक्तीप्रमाणे व्हजायनाच्या व्हल्वाचे अनेक आकार आपल्या कल्पनाशक्तीतून साकारले आहेत. काहींच्या व्हल्वाचा आकार हा गुलाबाच्या फुलांप्रमाणे असतो तर काहींचा सफरचंदाच्या फोडींप्रमाणे असतो. प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीनुसार आणि शारीरिक रचनेनुसार व्हल्वाचा आकार ठरतो. काही स्त्रियांनी तर परदेशात आपल्या व्हल्वाची सुंदर चित्रकलाकृती साकारून घेतली आहे.व्हल्वाच्या सुंदरता ठरवण्यासाठी कोणतंही परिमाण नाही. त्यामुळे आपल्या प्रत्येकीचा व्हजायनाचा आकार एकमेंकीपेक्षा वेगळा असतो.  

5. हूबेहूब ‘त्या’च्याप्रमाणेच आपल्या व्हजायनाचाही आकारही वाढतो

साधारणतः व्हजायनाचा आकार हा 3 ते 4 इंच इतका खोल असतो. पण जेव्हा सेक्सदरम्यान स्त्री उत्तेजित होते, तेव्हा हा आकार दुप्पट वाढू शकतो. आहे ना गंमतीशीर. आजपर्यंत तुम्ही आपल्या पार्टनरच्या अवयवाच्या त्या भागाच्या वाढणाऱ्या आकाराबद्दल वाचलं आणि ऐकलं असेल. पण व्हजायनाबाबत आम्हाला खात्री आहे की, पहिल्यांदाच असं काही ऐकलं असेल.

6. व्हजायना होतं आपोआप स्वच्छ

हे वाचूनही तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की, व्हजायना हे आपोआप स्वच्छ होतं आणि आपल्याला जास्त काहीच करण्याची गरज नाही. व्हजायनाच्या गुंतागुंतीच्या रचनेमुळे अनेकदा या भागाच्या स्वच्छतेबाबत आपल्या मनात साशंकता असते. पण चिंता करण्याची गरज नाही. व्हजायनातून एक द्रव्य पदार्थाची निर्मिती होते. हा द्रव्य पदार्थ व्हजायनातील सर्व बॅक्टेरियाची नैसर्गिकरित्या स्वच्छता होते. त्यामुळे तुमचं व्हजायना नेहमी स्वच्छ राहतं. आता हे कळल्यावर तुम्ही आणि तुमचा पार्टनर निर्धास्तपणे सेक्स ती पोझिशन निर्धास्तपणे ट्राय करू शकता.  

7. व्हजायनामुळेच होते आपल्याला ऑर्गेज्मची इच्छा 

पुरूषांना जरी वाटत असलं की स्त्रियांना ऑर्गेज्म हा फक्त त्या ठिकाणीच स्पर्श केल्याने होतो, तर असं नाहीयं. स्त्रियांना व्हजायना आणि त्याच्या आतील भागांमुळे अनेक प्रकारे ऑर्गेज्म अनुभवता येऊ शकतो. विचार करा बुवा यावर. आता याबाबत अजून जाणून घायचं असल्यास तुमच्या मदतीला गुगलबुवा आहेतच.

8. व्हजायनाला नाही लुब्रिकंटची गरज 

व्हजायनाला वेगळ्या अशा बाहेरील लुब्रिकंटची नेहमीच गरज भासेल असं नाही. फक्त तुम्हाला सेक्स करताना जर तिथली त्वचा खूपच कोरडी वाटली किंवा सेक्स करताना दुखत असेल तर तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञाचा सल्ला घेऊन बाहेरील लुब्रिकंटचा वापर करू शकता. नाहीतर व्हजायनामध्ये नैसर्गिकरित्या लुब्रिकेशन होतचं असतं.   

9. गर्भनिरोधक गोळ्या व्हजायनासाठी हानिकारक

जसं तुम्हाला व्हजायनाबद्दलच्या काही गोष्टी ऐकून आश्चर्य वाटलं असेल तसंच ही गोष्टही फार गंभीर आहे. जसं गर्भनिरोधक गोळ्यांचे काही गंभीर साईडईफेक्ट्स तुमच्या शरीरावर जाणवतात. तसंच या गोळ्यांचा परिणाम तुमच्या व्हजायनावरही होऊ शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी गर्भनिरोधक गोळ्या घेताना नक्की विचार करा.

10. व्हजायनाला सहज होऊ शकतं इन्फेक्शन

व्हजायनाच्या क्लिजींगची जरी जास्त काळजी घ्यावी लागत नसली तरी हा भाग फारच सेन्सीटीव्ह असतो. कधी कधी तुम्ही एखाद्या गोळ्यांचा डोस पूर्ण करत असाल किंवा एखाद्या अस्वच्छ बाथरूम वापरण्याचा प्रसंग आल्यास तुमच्या व्हजायनाला लगेच इन्फेक्शन होऊ शकतं. पण व्यवस्थित आणि वेळीच काळजी घेतल्यास ते बरंही होतं.  

11. व्हजायना देतं इन्फेक्शनची सूचना

हो…अगदी खरं आहे. जसं उदाहरण द्यायचं झाल्यास तुम्हाला जर व्हजायनामध्ये रॅश आल्यास किंवा खाज येत असल्यास ही इन्फेक्शन झाल्याची सूचना आहे. मग तुम्ही वेळीच त्यावर उपाय करू शकता आणि गंभीर परिणाम टाळू शकता. बघा तुमचं व्हजायना तुम्हाला किती समजून घेतं ते.

मग आहेत ना व्हजायनाबद्दलच्या या सर्व गोष्टी आश्चर्यचकित करणाऱ्या. आता या गोष्टींची माहिती मिळल्यावर तुमच्या व्हजायनाबाबत काही शंका तर नक्कीच दूर झाल्या असतील आणि काही गमतीदार गोष्टी कळल्यामुळे तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत सेक्सही अजून चांगल्यारितीने एन्जॉय करता येईल.

हेही वाचा 

भारतीय महिला हस्तमैथुन करतात का, 5 महिलांनी दिले उत्तर

Vagina च्या बाबतीत या 10 गोष्टी प्रत्येक महिलेला माहिती हव्यातच!

सेक्स लाईफला स्पाईसअप करणाऱ्या ’10’ सेक्स स्टाईल्स

Read More From Sex Education