Sex Education

सेक्समुळे सौंदर्य खुलते, फायदे घ्या जाणून

Dipali Naphade  |  Jul 23, 2020
सेक्समुळे सौंदर्य खुलते, फायदे घ्या जाणून

तुझे ओठ गुलाबाच्या पाकळीप्रमाणे आहेत किंवा चेहऱ्यावर चंद्रासारखा नूर आला आहे अशी वाक्य आपण चित्रपटांमध्ये नक्कीच ऐकली आहेत. पण तुम्हाला तुमच्या सौंदर्याबाबत अथवा तुमच्या रूपाबाबत अशी वाक्य ऐकायला मिळाली तर नक्कीच आवडेल ना? पण सौंदर्य जपण्यासाठी केवळ तुम्ही घेतलेली त्वचेची काळजी अथवा सौंदर्य उत्पादनच कामी येतात असं नाही. आता तुम्हाला हे वाचून नक्कीच प्रश्न पडला असेल की अरे असं कसं? तुमचे सौंदर्य हे तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमामुळे अर्थात तुम्ही सेक्समध्ये समाधानी असाल तर त्यामुळेही चेहऱ्यावर दिसून येते. सेक्स केल्यामुळे सौंदर्य खुलते. अर्थात कसे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  हे खरं आहे. तुम्ही जर नियमित आणि निरोगी सेक्स करत असाल आणि समाधानी असाल तर तुमच्या सौंदर्यासाठी हे फायदेशीर ठरते. जाणून घेऊया काय आहे याचे रहस्य.  

त्वचा आणि केसांसाठी ठरते फायदेशीर

Shutterstock

जर्नल ऑफ सेक्सुअल मेडिसिनच्या एका अहवालानुसार, ऑर्गेजमच्या कारणामुळे शरीरामध्ये अॅस्ट्रोजनची पातळी वाढते. ज्यामुळे आपली त्वचा आणि केस हे अधिक हेल्दी अर्थात निरोगी होण्यास मदत मिळते. अॅस्ट्रोजनमुळे तुमची त्वचा अधिक चांगली मॉईस्चराईज होते आणि सुरकुत्याही त्वचेवर येत नाहीत. तसंच त्वचेतील कोलाजनची पातळीदेखील सेक्समुळे राखली जाते. यामुळेच त्वचा अधिक मऊ आणि मुलायम दिसते आणि तुम्ही नेहमी ताजेतवाने आणि अधिक सुंदर दिसता. 

चेहऱ्यावर येते चमक

Shutterstock

सेक्स केल्यामुळे हार्ट रेट आणि रक्तप्रवाह वाढतो. तसंच यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळीही वाढते आणि ऑक्सिजनचा पुरवठा अधिक चांगला होतो. त्यामुळे चेहऱ्यावर अधिक चमक येते आणि सेक्स केल्यानंतर चेहरा अधिक चमकदार आणि तजेलदार दिसतो. 

तुम्हाला नक्की कसं सेक्स करायचं आहे हे सांगते तुमची रास

तरूण आणि तजेलदार त्वचा

Shutterstock

साधारण तीन हजार महिला आणि पुरुषांवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, ज्या व्यक्ती आठवड्यातून तीन वेळा सेक्सुअल संबंध ठेवतात, त्या व्यक्ती आपल्या वयापेक्षा किमान 7 -12 वर्ष अधिक तरूण दिसतात. त्यांची त्वचा अधिक तजेलदार असून सुरकुत्या नसल्यामुळे त्वचा तरूण दिसते. 

सेक्स करताना नक्की का दुखतं, जाणून घ्या याची महत्त्वाची कारणं

ऑर्गेजम मूड बनवतो अधिक चांगला

Shutterstock

तुम्हाला माहीत नसेल पण ऑर्गेजम होताना शरीरातून सेराटोनिन आणि डीएचईएचा स्राव येत असतो. सेराटोनिन एक न्यूरोट्रान्समीटर असून  तुम्हाला अधिक उल्हासित आणि आनंदी ठेवण्यासाठी उपयोगी ठरतो. यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्तीही वाढते. तुम्ही आनंदी राहण्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर आणि चेहऱ्यावर दिसून येतो. 

प्रत्येक पुरुषाला वाटते महिलेला या 5 सेक्स ट्रिक्स माहीत असाव्यात

सेक्स केल्याने तुम्हाला प्रसन्न वाटत राहाते

Giphy

ऑर्गेजममुळे तुमच्या शरीरात फील गुड हार्मोन्स डोपामाईन आणि ऑक्सिटॉसिनचा स्राव चालू राहतो. ऑक्सिटॉसिन  तुम्हाला अधिक आरामदायी जाणीव करून देतो. ज्यामुळे तुम्हाला स्वतःलाच नाही तर तुमच्यामुळे इतरांनाही तुम्ही आनंदी आणि उल्हासित ठेऊ शकता. तुम्ही नेहमी आनंदी राहण्याचा परिणाम हा तुमच्या सौंदर्यावर होत असतो. 

सेक्स करताना सर्वात पहिले फिलिंग जाणवतं ते स्तनांना

आत्मविश्वास वाढविण्यास कारणीभूत

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, सेक्स आणि मेडिटेशन ब्रेन हे एकमेकांत गुंतलेले आहे. मेडिटेशनचा प्रभाव आपल्या मेंदूवर अधिक परिणाम करत असतो. सेक्स केल्यानेही तोच परिणाम होतो. तुमचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत मिळते. आंतरिक अनुभव मिळून तुम्हाला इतर समस्यांपासून दूर ठेवण्यासही याची मदत मिळते.

Read More From Sex Education