Dating

साजरा करा यंदाचा व्हॅलेंटाईन वीक रोमँटीक (Valentine’s Week List In Marathi)

Leenal Gawade  |  Jan 6, 2021
Valentine's Week List In Marathi

14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. हे आतापर्यंत सगळ्यांनाच माहीत आहे. पण हा दिवसच नाही तर त्याची तयारी अगदी आठवड्याभरापासून सुरु असते. याला प्रेमाचा आठवडा किंवा ‘व्हॅलेंटाईन वीक’ म्हणतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा एकदम रोमँटीक काळ आहे असे म्हणतात. म्हणूनच ज्यांना आपल्या प्रेम भावना व्यक्त करायच्या आहेत ते खास या दिवसाचा मुहूर्त साधत आपले प्रेम व्यक्त करतात. हा दिवस ख्रिश्चन परपंरेतील असून संत व्हॅलेंटाईनच्या आठवणीत हा दिवस साजरा केला जातो. काळ बदलला तसे प्रेम व्यक्त करण्याच्या अनेकांच्या पद्धती बदलल्या आहेत. प्रेम व्यक्त करण्यासारखे सोपे काम आता फारच कठीण झालेले आहे. कारण सेलिब्रेशन करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. व्हॅलेंटाईन डे हा आता एक दिवस म्हणून साजरा केला जात नाही तर आता तो आठवडाभर साजरा करण्याचा सण झाला आहे. त्यामुळेच हल्ली व्हॅलेंटाईन वीक अगदी उत्साहात साजरा केला जातो. यंदा तुम्हीही हा आठवडा तुमच्या प्रेमासाठी साजरा करण्याचा विचार करत असाल तर या ‘व्हॅलेंटाईन वीक’ची माहिती तुम्हाला हवी.

व्हॅलेंटाईन वीक म्हणजे काय? (What is Valentine Week)

Instagram

व्हॅलेंटाईन वीक म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या आधी आठवडाभर वेगवेगळे दिवस साजरे करणे. साधारण 7 फेब्रुवारीपासून वेगवेगळे दिवस साजरे करण्याची सध्या सगळीकडेच पद्धत आहे. या आठवड्याची सुरुवात रोझ डे अर्थात गुलाबाच्या फुलाने करायची असते असे म्हणतात. तुम्ही या आठवड्याच्या प्रत्येक दिवशी काहीना काही करायला हवे. तुमच्या प्रेमाला स्पेशल वाटायला हवे. यासाठी रोझ डे, प्रपोझ डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे,  किस डे असे काही दिवस साजरे केले जातात. हे दिवस साजरे करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी आहे. यंदा तुम्हीही हा व्हॅलेंटाईन आठवडा साजरा करण्याचा विचार करत असाल तर  तुम्ही प्रत्येक दिवसाचे महत्व आणि तुम्हाला या दिवशी नेमके काय करता येईल ते जाणून घेऊ

असा साजरा करा तुमचा व्हॅलेंटाईन वीक (Valentine’s Week & Ideas To Celebrate It)

वर सांगिल्याप्रमाणे व्हॅलेंटाईनचा आठवडा साजरा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या दिवशी मस्त प्लॅन करु शकता. फक्त मुलींना सरप्राईज देण्यासाठीच नाही तर कधी कधी तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडलाही अशा प्रकारे सरप्राईज देऊ शकता. आता या व्हॅलेंटाईन वीकमध्ये येणारा प्रत्येक दिवस आणि तो साजरा करण्याची आयडिया जाणून घेऊया.

रोझ डे (Rose Day)

Instagram

व्हॅलेंटाईन वीकमधील तुमचा पहिला दिवस असतो तो म्हणजे ‘रोझ डे’. प्रेमाचे प्रतिक म्हणून लाल गुलाबाचे फुल देण्याची आजही पद्धत आहे. दरवर्षी हा दिवस 7 फेब्रुवारीला साजरा केला जातो. पूर्वी कोणाच्या हाती गुलाबाचे लाल फुल असेल तर ते कोणीतरी खास व्यक्तीने दिले यावर शिक्कामोर्तब व्हायचे. आता लाल गुलाबाचे फुल आणि व्हॅलेंटाईन असे एक समीकरणच बनून गेले आह. मनातील भावना सांगण्याआधी त्याची सुरुवात करण्यासाठी गुलाबाचे फुल देऊन तुम्ही थोडासा अंदाज तुमच्या जोडीदाराला नक्की देऊ शकता. त्यासाठीच हा खास दिवस असतो. व्हेलेंटाईन वीक साजरा करताना प्रपोझ करायचा विचार असेल तर प्रपोझ शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही मनातील भावना व्यक्त करायला हव्यात

असे करा प्लॅनिंग :

प्रपोझ डे (Propose Day)

Instagram

व्हॅलेंटाईन वीकमधील दुसरा दिवस म्हणजे ‘प्रपोझ डे’ प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे प्रपोझ डे.  हा दिवस 8 फेब्रुवारी रोजी येतो. पहिल्या दिवशी गुलाबाचे फुल देऊन जरी तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त केले असले तरी त्याला शब्दबद्ध करणे किंवा तो खास करण्यासाठी प्रपोझ महत्वाचा असतो. अनेकदा काही गोष्टी या आपोआप घडत असतात. कोणी प्रेमात पडले हे एकमेंकाना सांगण्याची फारशी गरज अनेकांना वाटत नाही. पण जर तुमच्या प्रेमाच्या भावनेला शब्दाची जोड मिळाली तर तो दिवस अधिक खास होऊन जातो. त्यामुळे या दिवशी तुम्ही प्रपोझ करा.प्रपोझ करण्यासाठी हा दिवस एकदम उत्तम आहे असं समजून आपल्या भावना व्यक्त करा. जर एखादी मुलगी तुमच्यावर प्रेम करत असेल तर मुलीही प्रेमाचे काही संकेत देतात.

असे करा प्लॅनिंग :

चाॉकलेट डे (Chocolate Day)

Instagram

कोणत्याही नात्याची सुरुवात ही गोड खाऊन करायची असते. ज्यावेळी एखादे रिलेशनशीप किंवा प्रेमाचे नाते येते त्यावेळी चॉकलेट देऊन हा आनंद साजरा केला जातो. तुमच्या जोडीदाराला चॉकलेट देऊन तुम्ही हा दिवस साजरा करायला हवा. तुम्ही किती मोठं चॉकलेट देता यापेक्षा चॉकलेट देणं आणि आपली भावना महत्वाची त्यामुळे जर तुम्ही हा दिवस साजरा करायचा विचार करत असाल तर तुम्ही काही सोपे प्लॅन्स करु शकता. हा दिवस 9 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

असे करा प्लॅनिंग :

टेडी डे (Teddy Day)

Instagram

चॉकलेट डे नंतर जो दिवस साजरा केला जातो तो म्हणजे टेडी डे. गुलाबी प्रेमामध्ये येणारी आणखी एक गोष्ट म्हणजे टेडी. टेडी हे एक सॉफ्ट टॉय असून त्याच्याप्रमाणेच प्रेमाच्या भावना या कोमल आणि नाजूक असतात. हा दिवस 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. अशा प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचे प्रतीक म्हणजे टेडी. टेडी हे वेगवेगळ्या आकारात मिळतात. अगदी छोटासा टेडी घेऊनही तुम्हाला असे प्रेम व्यक्त करता येईल. जर तुम्हाला बॉयफ्रेंडला काय द्यावे सुचत नसेल तर बॉयफ्रेंडला गिफ्ट देण्याच्या आयडियाज माहीत हव्यात

असे करा प्लॅनिंग :

प्रॉमिस डे (Promise Day)

Instagram

प्रेम व्यक्त करण्यासोबतच त्या नात्यामध्ये विश्वास निर्माण करणे महत्वाचे असते. त्यानंतरच हे नाते पुढे जाऊ शकते. जर तुम्ही नात्यात पुढचे पाऊल टाकण्याचा विचार करत असाल तर त्या नात्याची सुरुवात विश्वास देऊन करा. नात्यात राहताना तुम्ही एकमेकांना मान देऊन कधीच साथ सोडणार नाही हा विश्वास देणे महत्वाचे असते. हा प्रॉमिस डे हाच विश्वास निर्माण करण्याचा दिवस आहे. दरवर्षीचा 11 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

असे करा प्लॅनिंग:

हग डे (Hug Day)

Instagram

प्रेम करणाऱ्यांच्या मिठीत विसावण्याचे सुख काही वेगळेच असते. एक प्रेमाची मिठी प्रत्येकाला जगण्याची एक वेगळी उमेद देते. हग डे अर्थात मिठीचा दिवस तुमच्या नात्यामधील ही जवळीक वाढवण्यासाठी मदत करु शकतो. हग डे हा अत्यंत रोमँटीक असा दिवस आहे. जो  12 फेब्रुवारीला सेलिब्रेट करतात. हा दिवस दोघांनी एकमेकांसोबत घालवायला पाहिजे. या दिवसाचे प्लॅनिंग करण्याचा विचार करत असाल तर थोडा खास करा. कारण या दिवसामुळे तुमचे प्रेम जास्त वाढू शकते.

असे करा प्लॅनिंग :

किस डे (Kiss Day)

Instagram

एका मिठीच्या पुढे जाऊन ज्यावेळी नाते अधिक दृढ आहे असा विश्वास निर्माण होतो. त्यावेळी एकमेकांचे चुंबन घेण्याची इच्छा होते. तुमचे प्रेम सगळ्या अडचणी आणि पायऱ्या पार पाडत पुढे गेले असेल आणि आता तुम्हाला थोडे आणखी पुढे जायचे असेल. आयुष्यातील पहिली किस करण्यासाठी तुम्ही तयार असाल तर हा दिवस तुम्ही साजरा करायलाच हवा. व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

असे करा प्लॅनिंग :

व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day)

Instagram

व्हॅलेंटाईन अर्थात हाच तो दिवस जो असतो सगळ्यात महत्वाचा. 14 फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे या दिवासाची उत्सुकता अनेकांना असते. जर आठवड्याभरात काहीही वेगळे प्लॅन करता आले नसतील तर तुम्ही या दिवशी मस्त प्लॅन करु शकता.या दिवशी बाहेर छान वातावरणही असते. तुम्हाला अनेक गोष्टी करता येऊ शकतात. प्रेमाचा दिवस अशी या दिवसाची ओळख आहे. पण हल्ली आठवडाभर हा फेस्टिवल सारखा सेलिब्रेट करावा लागत असल्यामुळे या व्हॅलेंटाईन वीकची सांगता या दिवसाने होते. या दिवशी तुम्ही काहीतरी मोठे करण्याचा विचार करत असाल तर जोडीदाराला प्रेमाचे संदेश नक्की पाठवत आपले प्रेम पाठवून द्या

असे करा प्लॅनिंग:

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ)

1. व्हॅलेंटाईनमधील 14 दिवस काय असतात?

व्हॅलेंटाईन वीक वगळता त्यानंतर ही काही काळ हा दिवस साजरा केला जातो असे म्हणतात. म्हणजे प्रेमाची कबुली दिल्यानंतर हे नाते टिकतेच असे नाही. त्यामुळे त्याच्या पुढे जाऊन स्लॅप डे, ब्रेकअप डे असे काही दिवस असतात असे म्हणतात. पण हा सगळा सोशल मीडियावरील खेळ आहे. प्रत्यक्षात असे काही दिवस साजरे केले जात नाहीत. हा आठवडा साजरा करणे अनेकांना आवडत नाही. म्हणूनच या आठवड्यानंतरही उपहासाने काय काय साजरे करायला हवे त्याचे काही दिवस तयार केलेले दिसतात. पण यात काही तथ्य नाही.

2. प्रेयसीला देण्यासाठी गुलाबाचे फुल हा उत्तम पर्याय आहे का?

गुलाबाचे फुल हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच प्रेम व्यक्त करण्यासाठी या फुलांचा उपयोग होतो. गुलाबामध्येही वेगवेगळे रंग असतात. पांढरा रंग हा शांततेसाठी, पिवळा रंग हा मैत्रीसाठी आणि लाल रंग हा प्रेमासाठी दिला जातो. गुलाबाव्यतिरिक्त असे कोणतेही फुल नाही जे प्रेम व्यक्त करण्याचा तो फिल आणू शकेल. म्हणूनच कदाचित गुलाब देणेच योग्य राहील.

3. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी संपूर्ण आठवडा साजरा करणे गरजेचे असते का? (Is it compulsory to celebrate all days of the valentines week)

व्हॅलेंटाईन डे हा साजरा करण्यासाठी संपूर्ण आठवडा साजरा करण्याची मुळीच गरज नाही. 14 फेब्रुवारीला देखील तुम्ही तो साजरा करु शकता. सात दिवस साजरा करण्याची ही पद्धत जास्त करुन तरुणांमध्ये दिसून येते. त्यामुळे तुम्ही तुम्हाला अगदी हवा त्या पद्धतीने हा दिवस किंवा जमेल तसा आठवडा साजरा करु शकता. यामध्ये कोणत्याही प्रकारे जबरदस्ती नाही.

यंदाचा प्रेमाचा आठवडा अर्थात तुमचा व्हॅलेंटाईन करा एकदम खास. बनवा छान छान प्लॅन. मुंबईत राहूनही तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन डे साजरा करु शकता. मुंबईत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी चांगल्या जागा आहेत. त्यामुळे मुंबईत व्हॅलेंटाईन डे साजरा करा. टॅग करा तुमच्या अशा मित्रमैत्रिणींना ज्यांना खरंच आहे हा दिवस साजरा करण्याची गरज. 

Read More From Dating