आधुनिक काळात जागेअभावी घराचा आकार दिवसेंदिवस कमी कमी होत चालला आहे. त्यामुळे वास्तूशास्त्रानुसार तुमच्या घराची रचना योग्य आहे का हे तपासणं काळाची गरज झाली आहे. जर घरात सुथ शांती हवी असेल तर काही गोष्टी योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी असायलाच हव्या. तुमच्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार असेल तर या वास्तूटिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या आहेत. यासाठीच आज आपण घरातील बाथरूमविषयी वास्तूशास्त्र काय सांगतं हे पाहणार आहोत.
बाथरूमविषयी वास्तूटिप्स –
घरातील बाथरूम कसं असावं आणि त्याबाबत वास्तूशास्त्र नेमकं काय सांगतं हे जाणून घ्या.
- घरातील प्रत्येक गोष्ट कोणत्या दिशेला आहे हे खूप महत्त्वाचं आहे. बाथरूम नेहमी नैऋत्य अथवा वायव्य दिशेला असावं. मात्र ते कधीच ईशान्य दिशेला असणार नाही याची काळजी घ्या. उत्तर आणि पूर्व दिशेच्या मधल्या कोपऱ्याला ईशान्य दिशा म्हणतात. ईशान्य दिशेला बाथरूम असेल तर आरोग्याबाबत समस्या निर्माण होतात.
- घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तर घरात वास्तूदोष होऊ नये यासाठी बाथरूममध्ये काचेच्या भांड्याच जाडे मीठ भरून ठेवा. दर आठवड्याने हे मीठ बदलत राहा.
- बाथरूममध्ये पाण्याचे ठिकाण म्हणजे नळ आणि पाण्याची रचना नेहमी उत्तर अथवा पूर्वेला असावी. कारण जर पाण्याचा नळ दक्षिण अथवा पश्चिमेला असेल तर अर्थिक अडचणी येऊ शकतात.
- बाथरूम मध्ये आरसा कधीच दरवाजासमोर असता कामा नये. कारण असं असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते.
- बाथरूममध्ये बादली कधीच रिकामी ठेवू नका ती नेहमी भरलेली असावी. शिवाय निळ्या रंगाची बादली बाथरूममध्ये असेल तर घरात सुख आणि समृद्धी नांदते. कारण निळा रंग संपन्नतेचे प्रतिक आहे.
- बाथरूमच्या दरवाज्यावर क्रिस्टल बॉल लावण्यामुळे घरातील विशेषतः बाथरूममधील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
- बाथरूममध्ये असलेले नळ नियमित तपासून घ्या. कारण जर घरातील बाथरूममध्ये गळणारे नळ असतील तर हा एक खूप मोठा वास्तूदोष असू शकतो.
- घराच्या मुख्य दारासमोर कधीच बाथरूम असू नये. प्रवेश द्वारासमोर बाथरूम असेल तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
- जिन्याखाली कधीच बाथरूम असू नये. त्यामुळे तुम्ही जर बंगला अथवा दोन मजली इमारतीत राहत असाल तर जिन्याखाली तुमचे बाथरूम असता कामा नये.
- बाथरूमच्या दरवाज्याच्या अगदी मागे नळ अथवा सिंक असता कामा नये असं असेल तर हा वास्तूदोष तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो.
- तुमचे बाथरूम प्रशस्त असेल आणि त्यात बाथटब देखील असेल तर टबची दिशी नेहमी उत्तरेकडे असावे.
- बाथरूममध्ये फक्त आवश्यक असतील तेवढ्याच गोष्टी ठेवा. अनावश्यक गोष्टी बाथरूममध्ये भरून ठेवल्यामुळे घरात वास्तूदोष निर्माण होतो.
- आठवड्यातून एकदा अथवा दोनदा बाथरूम डीप क्लिन करणं गरजेचं आहे. नाहीतर घरात आर्थिक अडचणी वाढू लागतात.
- बाथरूममध्ये कधीच गडद रंगाच्या टाईल्स लावू नका. हलक्या रंगाच्या टाईल्समुळे घरात सुखसमृद्धी नांदते.
- बाथरूममधील गीझर अथवा इतर विद्युत उपकरणे ही नेहमी आग्नेय दिशेला असावी.
- बेडरूममधील बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा. असं न केल्यास आरोग्य समस्या वाढू शकतात.
- बाथरूममध्ये नेहमी एक मोठी खिडकी आणि एग्जॉज फॅशन असावा. ज्यामुळे बाथरूममधील नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकली जाते.
- बाथरूमच्या वर पाण्याची टाकी असेल तर ती वेळच्या वेळी स्वच्छ करून घ्या अन्यथा घरात आर्थिक अडचणी येतात.
- बाथरूम आणि खोलीच्या दरवाज्याला नेहमी उंबरठा असावा. ज्यामुळे बाथरूममधील नकारात्मक ऊर्जा खोलीत प्रवेश करत नाही.
- बाथरूममध्ये प्रकाश योजना करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही करत असलेली प्रकाश योजना दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय दिशेला असेल.
फोटोसौजन्य – pexels
अधिक वाचा –
यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स (Goodluck Vastu Tips)
वास्तू टीप्स: चूकून ही तुमच्या बेडजवळ ‘या’ वस्तू ठेऊ नका, होऊ शकतं नुकसान