लग्नसराई

कतरिना आणि विकीच्या लग्नात कोणाकोणाला आहे खास आमंत्रण

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Dec 7, 2021
कतरिना आणि विकीच्या लग्नात कोणाकोणाला आहे खास आमंत्रण

कतरिना कैफ आणि विकी कौशलचे सोहळा 9 डिसेंबरला लग्न होणार आहे. 10 डिसेंबरला लग्नाचे ग्रॅंड रिसेप्शनही असणार आहे.  कतरिना आणि विकीने त्यांच्या नात्याबद्दल आणि लग्नसोहळ्याबद्दल आजवर काहीच खुलासा केला नाही. अचानक आणि अगदी गुपचूप पद्धतीने ते लग्न करणार आहेत हे पक्कं झालं आहे. कतरिना आणि विकीच्या शाही लग्नाचा थाटमाट राजस्थानमधील सिक्स सेंट फोर्टमध्ये पार पडणार आहे. लग्न हिंदू पद्धतीने आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे. सहाजिकच काही मोजके नातेवाईक आणि व्हिआयपी पाहुणेही लग्नात सहभागी होणार आहेत. या शाही विवाह सोहळ्यासाठी फक्त मोजक्याच म्हणजेच 120 लोकांनाच आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे या लग्नात नेमकं कोणा कोणाला आमंत्रण आहे याची चर्चा सुरू आहे.

दीवमध्ये ‘राम सेतु’चं शूटिंग पूर्ण, अक्षय कुमार शेअर ही केली खास गोष्ट

कोणाकोणाला आहे विकी-कतरिनाच्या लग्नाचे आमंत्रण

कतरिना आणि विकीच्या लग्नात फक्त जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि काही व्हिआयपी पाहुण्यांना आमंत्रण आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही बॉलीवूड कलाकारही हे लग्न अटेंड करणार आहेत. पाहुण्यांच्या लिस्टमध्ये करण जौहर, आलिया भट्ट, सलमान खान, बोस्को मार्टिस, कबीर खान आणि काही मोजक्या सेलिब्रेटींजना आमंत्रण दिलेलं आहे. मात्र सलमान खान सौदीला एका इव्हेंटमध्ये सहभागी होत आहे. त्यामुळे तो कतरिनाच्या लग्नात उपस्थित राहू शकत नाही. मात्र असं असलं तरी त्याने कतरिनाच्या लग्नाच्या तयारीत तिला खास मदत नक्कीच केली आहे. कारण कतरिनाच्या लग्नातील सिक्युरिटीसाठी सलमानचा बॉडीगार्ड शेराच्या कंपनीने जबाबदारी स्वीकारलेली आहे. सलमानमुळे त्याचा बॉडीगार्ड शेराही लग्नाला जाऊ शकणार नाही.

नवा कोरा कॉमेडी शो ‘हे तर काहीच नाय’ म्हणत स्टार्स घालणार धुमाकूळ

सलमानच्या कुटुंबातूनही कोणीच का जाणार नाही या लग्नाला

सलमान खान त्याच्या शोमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याची खास मैत्रिण कतरिनाच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही. मात्र विशेष म्हणजे त्याच्या कुटुंबातील कोणीच या लग्नात उपस्थित राहणार नाही. सर्वांनाच माहीत आहे की, सलमान आणि कतरिनाचे अफेअर होते आणि त्यानंतरही कतरिनाचे आणि सलमानच्या कुटुंबाचे एक खास नाते निर्माण झाले होते. कतरिना नेहमीच खान परिवाराच्या घरात मनमोकळेपणे वावरताना दिसत असे. सलमानची बहीण अर्पिता खान आणि अलवीराची कतरिना अगदी जवळची मैत्रीण झाली होती. मात्र असं असूनही आता सलमानच्या घरातील कोणीच कतरिनाच्या लग्नाला जायला तयार नाहीत. याचाच अर्थ त्यांना आजही कतरिनाने खान कुटुंबाची सून व्हावी असं वाटत होतं. पण आता ते होऊ शकत नसल्यामुळे कदाचित कतरिना आणि विकीच्या लग्नाला जाण्याची कोणालाच इच्छा होत नसावी. 

अभिनेत्री प्रीतम कागणेने ‘विजेता’ चित्रपटासाठी केले तब्बल 6 किलो वजन कमी

Read More From लग्नसराई