बॉलीवूड

वर्षात ‘विरूष्का’ची कमाई होते इतकी, ऐकाल तर व्हाल अवाक

Dipali Naphade  |  Jan 27, 2020
वर्षात ‘विरूष्का’ची कमाई होते इतकी, ऐकाल तर व्हाल अवाक

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कप्तान असणारा विराट कोहली हे नेहमीच चर्चेत असतात. इतकंच नाही ही जगभरातील सर्वात लोकप्रिय जोडीदेखील आहे. लोकप्रिय असले तरीही यांची नक्की किती कमाई आहे याची चर्चाही नेहमीच रंगते. क्रिकेट आणि बॉलीवूडमध्ये विराट आणि अनुष्काचं नाव अनेक यादीमध्ये समाविष्ट आहे. विराट कोहली हा वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये अव्वल बॅट्समन तर आहेच शिवाय जगभरातील उत्कृष्ट बॅट्समनपैकी एक आहे. तर अनुष्का शर्माने बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा एक दबदबा निर्माण केला आहे. या इंंडस्ट्रीतील नसूनही अनुष्काने कमी वेळात आपलं नाव निर्माण केलं. विराट आणि अनुष्का हे देशातील श्रीमंत सेलिब्रिटीजपैकी एक जोडी आहे. विराटने नुकतीच फोर्ब्स सेलिब्रिटीज 100 च्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. तर अनुष्का शर्माचं या यादीत 21 व्या स्थानावर नाव आहे. दोघेही आपापल्या क्षेत्रात अव्वल स्थानावर आहोत. GQ इंडियाने नुकताच या दोघांची वर्षभराची किती कमाई आहे याचा खुलासा केला आहे. शिवाय हे दोघं इतके पैसे कसे कमावतात याचीही माहिती दिली आहे. 

विराट आणि अनुष्काची किती आहे वर्षभराची कमाई

रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार विराट कोहलीने मागील वर्षी 252.72 कोटी रूपये कमावले. टीम इंडियाचा कप्तान विराटची संपत्ती एकूण 900 कोटी रूपये आहे. तर अनुष्का शर्माने मागच्या वर्षी 28.67 कोटी रूपये कमावले. अनुष्काची एकूण संपत्ती 350 कोटी रूपये आहे. कोहली आणि अनुष्काची मिळून एकूण संपत्ती आहे 1,200 कोटी रूपये. हे ऐकून नक्कीच तुम्ही बोटं तोंडात घातली असणार. 

विराटची कमाई

या दोघांची कमाई नक्की कशी होते ते जाणून घेण्यात तुम्हाला इंटरेस्ट असेलच. तर विराटच्या कमाईचा मोठा हिस्सा जो आहे तो मिळतो जाहिरातींमधून. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या या खेळाडूला 17 कोटी रूपये मागच्या वर्षी मिळाले. तर आयपीएलमध्ये सर्वात जास्त कमावणारा हा एकमेव खेळाडू आहे. तसंच विराटला मागच्या वर्षी बीसीसीआयकडून 7 कोटी रूपयांची कमाई मागच्या वर्षात झाली. मिंत्रा, उबर, ऑडी, एमआरएफ, मान्यवर आणि टिसॉट अशा अनेक जाहिरातींमधून कोहली काम करतो. अर्थात या आणि अशा अनेक ब्रँड्सचा विराट ब्रँड अॅम्बेसेडर आहे. प्यूमा या मोठ्या कंपनीसह विराटचं टायअप आहे. त्याशिवाय विराटचं दिल्लीमध्ये स्वतःचं रेस्टॉरंट आहे ज्यातून त्याचा फायदा होतो. 

…आणि भावुक झालेल्या विराटला अनुष्काने सावरले

अनुष्काची कमाई

तर अनुष्का शर्मा प्रत्येक चित्रपटासाठी साधारण 12-15 कोटी रूपये फी आकारते. तिने आतापर्यंत 19 चित्रपटात काम केले आहे.  तसंच तिचे स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस आहे. 2014 मध्ये आपल्या भावासह तिने हे प्रॉडक्शन हाऊस लाँच केलं असून तिने यातून अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. या अभिनेत्रीने मान्यवर, मिंत्रा, निव्हिया, रजनीगंधा, श्याम स्टील, लेव्ही, कॉक्स अँड किंग्ज, पँटीन, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, गुगल पिक्स आणि अन्य जाहिरातीतून काम केलं असून ती यांची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तसेच अनुष्काचा नुश नावाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रंँडदेखील आहे. ज्यातून तिचा व्यवसाय चालू आहे. 

जेव्हा विराट-अनुष्काला त्या कुटुंबाने ओळखलंच नाही

विरूष्काचे घर

विरुष्काने आपलं घर घेतलं असून त्याचीही किंमत महाग आहे. 2017 मध्ये लग्नानंतर दोघांनी मुंबईतील वरळीमध्ये घर घेतलं. या दोघांच्या घराची किंमत 34 कोटी रूपये आहे. इतकंच नाही तर विराट आणि अनुष्काने गुरुग्राममध्येही घर घेतलं असून या घराची किंमत साधारण 80 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

Read More From बॉलीवूड