xSEO

ई  जीवनसत्व असणारे पदार्थ | Vitamin E Foods in Marathi

Trupti Paradkar  |  Apr 20, 2022
Vitamin E Foods in Marathi

निरोगी राहण्यासाठी पुरेसा व्यायाम, योग्य जीवनशैलीसोबत गरजेचा आहे संतुलित आहार. पौष्टिक आणि संतुलित आहार म्हणजे ज्यामध्ये शरीराचे पोषण करणारे सर्व पदार्थ असतील. यासाठी असे पदार्थ खा ज्यामधू प्रोटीन्स, कॅल्शिअम, मिनरल्स, व्हिटॅमिन्स तुमच्या शरीराला मिळतील. निरनिराळ्या पदार्थांमध्ये निरनिराळे व्हिटॅमिन्स असतात. जेव्हा एखाद्या व्हिटॅमिनचा अभाव शरीरात होतो तेव्हा त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसू लागतात. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता असेल तर तुम्ही आहारात काही विशिष्ट पदार्थ (Vitamin E Foods in Marathi) वाढवायला हवेत. व्हिटॅमिन ई मध्ये टोकोफेरॉल आणि टोकोट्रॉयनॉल असे दोन घटक असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरात पेशी निर्माण होण्यास मदत होते. व्हिटॅमिन ईमुळे तुमची त्वचा निरोगी राहते, शरीराला ऑक्सिजनचा पूरवठा करणाऱ्या लाल रक्तपेशींच्या निर्मितीला मदत होते. यासाठीच माणसाला दररोज कमीत कमी पंधरा मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई आहारातून मिळायला हवे. जर तसे झाले नाही तर औषधांच्या माध्यमातून व्हिटॅमिन ईचा पूरवठा करावा लागतो. यासाठी जाणून घ्या कसा असावा तुमचा आहार… यासोबतच वाचा निरोगी जीवनशैलीसाठी ‘व्हिटॅमिन बी 6’ आहे गरजेचं (Benefits of Vitamin B6 In Marathi)

ई  जीवनसत्व असणारे पदार्थ यादी – List Of vitamin E foods in marathi

आपण नियमित खात असलेल्या अनेक पदार्थांमधून तुमच्या शरीराला पुरेसं व्हिटॅमिन ई मिळत असतं. मात्र यासाठी तुम्हाला ई जीवनसत्वाचा पूरवठा करणारे पदार्थ (Vitamin E Sources In Marathi)  माहीत असायला हवे. 

बदाम आहे ई  जीवनसत्व असणारे पदार्थ

 Vitamin E Foods in Marathi

बदाम खाणं आरोग्यासाठी अतिशय फायद्याचं आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना यासाठी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. स्मरणशक्ती वाढण्यासाठी, मेंदूचा विकास होण्यासाठी, शरीर बळकट होण्यासाठी बदाम उपयुक्त ठरतात. शंभर ग्रॅम बदामामधून पंचविस मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई शरीराला मिळते. यासाठी प्रत्येकाने नियमित चार ते पाच बदाम खायला हवेत. बदाम रात्रभर पाण्यात भिजवून खाण्यामुळे अधिक चांगला फायदा मिळतो. 

सूर्यफुलाच्या बिया – Vitamin E Foods in Marathi

(Sunflower Seeds) सूर्यफुलांच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई  असतं. शंभर ग्रॅम सूर्यफुलाच्या बियांमधून कमीत कमी पस्तीस मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई मिळू शकतं. सहाजिकच आहारातून व्हिटॅमिन ई मिळण्यासाठी सूर्यफुलाच्या बिया हा एक चांगला स्त्रोत आहे. सूर्यफुलाच्या बियांचा वापर मुखशुद्धी, सलाडमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. ज्यामुळे नियमित तुमच्या शरीराला व्हिटॅमिन ई मिळू शकते. 

शेंगदाणे मध्ये व्हिटॅमिन ई असते

(Peanuts) शेंगदाणे हे गरीबाचे बदाम आहेत असं म्हटलं जातं. कारण सुकामेवा महाग असल्यामुळे अनेकांना तो परवडत नाही. मात्र शेंगदाणे प्रत्येकाच्या घरी असतात. कारण तुलनेने शेंगदाणे स्वस्त असतात. भारतीय स्वयंपाकात शेंगदाणे मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. शंभर ग्रॅम शेंगदाण्यामधून तुम्हाला पाच मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई मिळू शकते.शिवाय यामध्ये असलेल्या इतर पोषक गुणधर्मांमुळे तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो. 

अवकॅडो आहे व्हिटॅमिन ई ने भरपूर असलेले पदार्थ

 Vitamin E Foods in Marathi

अवकॅडो (Avocados) हे भारतीय फळ नसलं तरी आजकाल भारतात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतं. वरून कठीण आणि आतून एखाद्या क्रिमप्रमाणे मृदू असलेल्या फळाचा वापर तुम्ही सलाड, स्मुदी, ज्युस, गोड पदार्थांमध्ये करू शकता. एका मध्यम आकाराच्या अवकॅडोमधून तुम्हाला तीन मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई मिळू शकते. यासाठी नियमित या फळाचे सेवन करणं फायद्याचं ठरू शकतं. 

जाणून घ्या सी जीवनसत्व असणारे पदार्थ कोणते आहेत

पालक– ई  जीवनसत्व असणारे पदार्थ

(Spinach) पालक ही सर्वत्र उपलब्ध असणारी आणि भारतीय खाद्यसंस्कृतीत मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी भाजी आहे. पालकपासून निरनिरळ्या भाज्यांचे प्रकार, सूप, करी, कटलेट असं बरंच काही बनवता येतं. एका पालकच्या जुडीत दोन ते तीन मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई असतं. शिवाय पालक हा लोहचा एक चांगला स्त्रोत आहे. यासाठीच प्रत्येकाने पालक खायला हवा. 

हेझलनट आहे व्हिटॅमिन ई ने भरपूर असलेले पदार्थ

(Hazelnuts) सुकामेव्यामध्ये आजकाल हमखास आढणारा एक पदार्थ म्हणजे हेजलनट… चॉकलेट, आईस्क्रिम, केक, बिस्किटे अशा अनेक पदार्थामध्ये हेजलनट वापरले जाते. या सुकामेव्यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर असते. शंभर ग्रॅम हेझलनटमधून तुम्हाला पंचेचाळीस मिलीग्रॅम व्हिटॅमिनचा पूरवठा होतो. याशिवाय यातून तुमच्या शरीराला इतर अनेक पोषक घटक मिळतात. 

किवी – Vitamin E Foods in Marathi

(Kiwi) आजकाल भारतीय बाजारपेठांमध्ये किवी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतं. रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी व्हिटॅमिन ईची खूप गरज शरीराला असते. दोन मध्यम आकाराचे किवी खाण्यामुळे तुमच्या शरीराला तीन मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई मिळू शकतं. ज्यांना व्हिटॅमिन ई ची कमतरता आहे अशा लोकांना किवी खाण्याचा सल्ला दिला जातो. 

पपई मध्ये व्हिटॅमिन ई आहे भरपूर

 Vitamin E Foods in Marathi

(Papaya) पपई मध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे पपईला सूपरफूड असंही म्हटलं जातं. पपईमध्ये व्हिटॅमिन ई तर भरपूर असतंच, शिवाय यामधील अॅंटि ऑक्सिडंट्समुळे आजारपण तुमच्यापासून दूर राहतं. रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी, अपचनाचा त्रास कमी करण्यासाठी, शरीराची वाढ होण्यासाठी पपई खायला हवा.एका मध्यम आकाराच्या पपईतून तुमच्या शरीराला दोन ते तीन मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई मिळू शकतं. 

सिमला मिरची आहे ई जीवनसत्व असणारे पदार्थ

(Capsicum) सिमला मिरचीचा वापर भारतीय जेवणात भरपूर केला जातो. पावभाजी असो वा बिर्याणी, चायनीज असो वा पास्ता सिमला सिमला मिरची जेवणात असतेच. पण एवढंच नाही एका मध्यम आकाराच्या सिमला मिरचीतून तुमच्या शरीराला दोन ते तीन मिलीग्रॅम व्हिटॅमिन ईदेखील मिळत असतं. म्हणूनच शरीर मजबूत राहण्यासाठी नियमित सिमला मिरचीची भाजी खाणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरेल. 

टोमॅटो – Vitamin E Foods in Marathi

(Tomato) टोमॅटोमध्ये अॅंटि ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे अनेक आजारपणं तुमच्यापासून दूर राहतात. दोन मध्यम आकाराच्या टोमॅटोमधून तुमच्या शरीराला दोन ते तीन मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई मिळू शकतं. यासाठीच भारतात प्रत्येक भाजी, सार, आमटीमध्ये टॉमेटोचा वापर केला जातो. नियमित टॉमेटोचं सूप पिणं अथवा सलाडमधून टोमॅटो खाणं यासाठी नक्कीच योग्य ठरेल. 

यासोबतच व्हिटॅमिन D पुरेपूर मिळाले तर तुम्ही कायम राहाल निरोगी (Vitamin D Benefits In Marathi)

ई जीवनसत्व खाण्याचे फायदे – Benefits Of Vitamin E In Marathi

व्हिटॅमिन ई  (Vitamin E Sources in Marathi ) आरोग्य आणि सौंदर्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. शारीरिक कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी तुमच्या शरीराला पुरेसं व्हिटॅमिन ई मिळेल याची काळजी घ्यायला हवी. यासाठीच जाणून घ्या व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ खाण्याचे फायदे (Vitamin E Foods in Marathi)
ई जीवनसत्व असलेल्या पदार्थांचे फायदे सविस्तर जाणून घेण्यासाठी तुम्ही आमची हि पोस्ट वाचू शकतात – ई जीवनसत्व खाण्याचे फायदे

ताणतणाव कमी होतो 

शरीर आणि मनाचे संतुलन बिघडले तर याचा परिणाम तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. आजकाल अनेकांना ताणतणाव योग्य पद्धतीने हाताळता न आल्यामुळे अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. व्हिटॅमिन ई हे एक उपयुक्त असं अॅंटि ऑक्सिडंट असल्यामुळे ताणतणाव हाताळणे सोपे जाते. नैराश्यामुळे होणारी गंभीर आजारपणे यामुळे टाळता येतात.
ई जीवनसत्व असलेल्या पदार्थांचे फायदे काय आहेत.

ह्रदयाचे कार्य सुधारते

ज्यांना रक्तदाब अथवा ह्रदयाच्या समस्या आहेत. त्यांच्या आहारात व्हिटॅमिन ई असायलाच हवं. कारण व्हिटॅमिन ईमध्ये कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की, व्हिटॅमिन ई युक्त आहार घेतल्यामुळे ह्रदयाचे आजार बरे होतात.

मासिक पाळीच्या समस्या कमी होतात

मासिक पाळीच्या काळात जर तुम्हाला नियमित पाठदुखी, कंबरदुखी, पोटात दुखणे असे त्रास होत असतील, तर तुम्ही आहारात व्हिटॅमिन ई वाढवायला हवं. कारण व्हिटॅमिन ई महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय गरजेचं असून त्यामुळे मासिक पाळीच्या समस्या कमी होतात. व्हिटॅमिन ई मुळे मासिक पाळीतील वेदना सहन करण्यास मदत होते. यासाठीच या काळात महिलांनी व्हिटॅमिन ई आणि ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असलेले पदार्थ खावे. 

त्वचा निरोगी राहते 

त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन ईची गरज असते. व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ खाण्यामुळे अथवा व्हिटॅमिन ई युक्त सौदर्य प्रसादने वापल्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. त्वचेवरील काळेपणा कमी होण्यासाठी,मऊपणासाठी, चमक येण्यासाठी आणि एजिंग मार्क्स कमी होण्यासाठी  व्हिटॅमिन ईचा नक्कीच फायदा होतो. 

केसांच्या वाढीसाठी गरजेचे 

व्हिटॅमिन ई तुमच्या आरोग्य आणि त्वचेप्रमाणेच केसांसाठीही फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन ई युक्त तेलाने केसांना मालिश केल्यास स्काल्पचे आरोग्य सुधारते.यातील नैसर्गिक अॅंटि ऑक्सिडंटमुळे केसांच्या अनेक समस्या कमी होतात आणि केसांची वाढ मजबूत होते. 

विटामिन ई  ची काय आहे गरज?

Vitamin E Foods In Marathi

व्हिटॅमिन ई हे शरीरासाठी लागणारे अतिशय उपयुक्त असं अॅंटि ऑक्सडंट आहे. ज्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते. गंभीर आजारपणापासून दूर राहण्यासाठी तुमच्या आहारात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन ई असायलाच हवं. अनेक पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं आणि असे पदार्थ (Vitamin E Foods List in Marathi ) खाण्यामुळे तुमच्या शरीराला सहज व्हिटॅमिन सी मिळू शकतं. पण आहारात व्हिटॅमिनचा अभाव असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला सप्लीमेंटमधून व्हिटॅमिनचा पूरवठा शरीराला करावा लागतो. अति प्रमाणात व्हिटॅमिन ई शरीरात गेल्यास त्याचेही अनेक दुष्परिणाम आहेत. यासाठीच योग्य आहार घ्यावा आणि शरीराला पुरेसं पोषण मिळेल याची काळजी घ्यावी. यासाठी जाणून घ्या प्रतिकार शक्ती कमी आहे हे ओळखण्याची लक्षणे (Signs Of A Weak Immune System In Marathi)

FAQsव्हिटॅमिन ई आणि प्रश्न

प्रश्न – नैसर्गिक पद्धतीने शरीरातील व्हिटॅमिन ई कसे वाढवावे ?

उत्तर – शरीराला सर्व क्रिया सुरळीत करण्यासाठी अनेक पोषक घटकांची गरज असते. व्हिटॅमिन ई शरीराला पुरेसं मिळण्यासाठी तुम्ही वर दिलेले ई जीवनसत्व असलेले पदार्थ खायला हवेत.

प्रश्न – सर्वात जास्त व्हिटॅमिन ई कोणत्या पदार्थातून मिळते ?

उत्तर – सूर्यफुलाच्या बिया आणि हेजलनट मधून सर्वात जास्त व्हिटॅमिन ई तुमच्या शरीराला पटकन मिळू शकते. यासाठी या पदार्थांचा नियमित आहारात समावेश करा.

प्रश्न – व्हिटॅमिन ईची कमतरता असल्यास काय होते ?

उत्तर – शरीरात जर व्हिटॅमिन ईची कमतरता असेल तर त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर होतो. कारण यामुळे मज्जातंतू आणि स्नायूंचे कार्य मंदावते, दृष्टी कमकुवत होते आणि आजारपणे वाढू लागतात. 

Conclusion – 

शरीराला ई जीवनसत्त्व मिळण्यासाठी व्हिटॅमिन ई मिळणारे पदार्थ (Vitamin E Foods in Marathi) खाणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही घेतलेला आहार हा (Vitamin E Sources in Marathi) युक्त आहे का हे अवश्य तपासा. तुमच्या आहारात (Vitamin E Foods List in Marathi) समावेश करा आणि निरोगी आणि आनंदी राहा. 

Read More From xSEO