अक्रोड हे एक चवदार, आरोग्यदायी ड्राय फ्रुट आहे जे तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि उत्साही ठेवण्यास मदत करेल. आणि जेव्हा पावडर बनवून तुमच्या त्वचेला लावली जाते तेव्हा या प्रभावी सुपरफूडचे आणखी फायदे आहेत. केवळ अक्रोडच नव्हे तर अक्रोडाचे कवच किंवा अक्रोडाची साल सुद्धा त्वचेसाठी फायदेशीर आहे. अक्रोडाचे कवच किंवा साल कुटून बारीक करून त्याची पावडर बनवून ती त्वचेवर व केसांना लावल्यास त्याने अनेक फायदे मिळू शकतात. पण या पावडरचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी, ती लावण्याचा योग्य मार्ग जाणून घेणे महत्त्वाचे आहे, तसेच तुम्ही त्याचा अतिवापर केल्यास काय होऊ शकते हे देखील माहित असले पाहिजे आहे. .
अक्रोडाच्या शेलची पावडर बारीक दाणेदार द्रावणात बारीक करून तयार केली जाते. हे एक नैसर्गिक इको-फ्रेंडली एक्सफोलिएंट आहे जे मायक्रोबीड्सच्या जागी अनेक सेंद्रिय स्किनकेअर उत्पादनांमध्ये वापरले जाते. हे आधुनिक स्किन एक्सफोलिएटर्स हळुवारपणे त्वचेतील अशुद्धता तसेच निस्तेज आणि कोरडी त्वचा काढून टाकतात, ज्यामुळे तुम्हाला मऊ आणि तेजस्वी त्वचा मिळते. हे तुमच्या त्वचेचा पोत शुद्ध करून तुमच्या त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते.
चेहरा आणि शरीरासाठी वेगवेगळ्या आकाराचे ग्रॅन्युल वापरावे
अक्रोड शेल पावडरचे फायदे केवळ चेहऱ्यावरच नाही तर तुमच्या शरीराच्या इतर भागाच्या त्वचेसाठीही होतात. ते बॉडी स्क्रब किंवा लोशन म्हणून सहज लावता येते.चेहऱ्यावरील त्वचा अधिक संवेदनशील असते, त्यासाठी लहान ग्रॅन्युल असावे लागतात. तर बॉडी स्क्रब म्हणून वापरायचे असेल तर मोठे ग्रॅन्युल्स लागतात. बर्याचदा, अक्रोड शेल पावडरमध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि रासायनिक संयुगे मिसळले जातात ज्यामुळे तुमची त्वचा पूर्वीपेक्षा मऊ आणि उजळ होते. अक्रोड शेल पावडर इतर exfoliants पेक्षा पर्यावरणासाठी खूप चांगली आहे. ते पूर्णपणे इको फ्रेंडली आणि जैवविघटन करण्यायोग्य असून मायक्रोबीड्ससाठी एक चांगला पर्याय आहे .ब्युटी रुटीनमध्ये याचा समावेश केल्यानंतर तुम्हाला इतर कशाचीही गरज भासणार नाही.
स्क्रब म्हणून वापरा
अक्रोडाची साल स्क्रब म्हणूनही वापरली जाऊ शकते. यासाठी प्रथम त्याची पावडर करून घ्यावी. लक्षात ठेवा की ही साले खूप कडक असतात, म्हणून त्यांना काही काळ कडक उन्हात सुकवून घ्या आणि नंतर त्यांचे लहान तुकडे करा. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. चेहऱ्याला लावण्यासाठी ही पावडर एका भांड्यात घ्या आणि त्यात एलोवेरा जेल मिक्स करा. आणि चेहेऱ्यावर हळुवारपणे घासून घ्या. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर यात ग्लिसरीन मिसळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे स्क्रब बॉडी स्क्रब म्हणूनही वापरू शकता.
केसांसाठी उत्तम तेल
अक्रोडाच्या सालीपासून बनवलेले घरगुती तेल तुमचे केस निरोगी ठेवते. केसगळतीची समस्या किंवा कुरळे केस. यासाठी थोडेसे नियमित तेल कढईत घ्या आणि गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात सुका आवळा आणि अक्रोडाची साले मिसळा. दोन्ही नीट शिजल्यावर त्यांचा रंग बदलला की गॅस बंद करून गाळून बाटलीत भरून ठेवा.या तेलाचा नियमित वापर करा. यामुळे तुमचे केस मजबूत व चमकदार होतील.
मृत त्वचा काढून टाकते
अक्रोडाच्या सालीच्या पावडरचा एक फायदा म्हणजे ते मृत त्वचा काढून टाकते. त्यामुळे त्वचेच्या नवीन पेशी तयार होतात. कारण मृत त्वचेच्या पेशी नेहमी स्वतःहून बाहेर पडत नाहीत, याचा अर्थ अक्रोडाच्या सालीची पावडर तुम्हाला फ्लॅकी पॅच किंवा कोरडेपणा टाळण्यास मदत करू शकते. हे तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल देखील साफ करू शकते, ज्यामुळे बंद झालेली छिद्रे, तेलकट त्वचा आणि डागांच्या समस्येपासून सुटका मिळते.
निरोगी त्वचा व केसांसाठी हे इको फ्रेंडली स्क्रब नियमितपणे वापरा.
Photo Credit- istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक