“लहाणपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा”
संत तुकारामांच्या अभंगातील या दोन ओळी आपलं जीवन सुसह्य करण्यासाठी मार्गदर्शक आहेत. खरंतर आपल्या प्रत्येकामध्ये एक लहान मुल दडलेलं असतं. मात्र आपण जस जसं मोठं होत जातो तस तसं आपण स्वतःहून त्या निरागसपणाकडे दुर्लक्ष करतो. लहान मुलांना काहीच चिंता, काळजी काळजी नसते, म्हणूनच ते जीवनाचा खरा आनंद घेऊ शकतात. आयुष्यात मोठं होताना अथवा झाल्यावर आनंद व्यक्त करण्याच्या अनेक संधी येतात, त्यावेळी बालपणीसारखाच तो आनंद आपण जगू शकतो, मात्र जगण्याबद्दल असलेल्या अनेक गैरसमजूतींमुळे आपण स्वतःहून त्या दूर सारतो. वास्तविक आपल्यात दडून बसलेलं ते लहानपण खरं असतं. त्यामुळे मोठं झाल्यावरही अधूनमधून बाहेर पडण्याचा ते प्रयत्न करत राहतं. मोठं झाल्यावर लहाणपण जगणं म्हणजे स्वतःच स्वतःची जोडलं जाणं, तुम्ही खरे जसे आहात तसं जगणं. ज्या लोकांच्या लहाणपणीच्या आठवणी कडू असतात ते लोक मुद्दामुन आपल्यातील लहान मुल दडपून टाकतात तर कधी कधी काही माणसं संकोचामुळे लहानमुलांसारखं निरागस वागत नाहीत. पण प्रयत्न केला तर मोठी माणसं देखील असं निरागस आणि स्वच्छंदी आयुष्य जगू शकतात. आयुष्यातील ताणतणाव आणि चिंता काळजी दूर करण्यासाठी याचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी जाणून घ्या स्वतःमधील लहानपण कसं जपावं. तसंच शेअर करा हे बालपण स्टेटस, कोट्स मराठी | Childhood Quotes In Marathi आणि एकमेकांना मनसोक्त हसवणारे मराठी विनोदी मेसेज | Marathi Jokes Sms | Jokes Marathi Sms
प्रामाणिकपणे व्यक्त व्हा
आपण मोठं झाल्यावर समाजाने घालून दिलेल्या पायवाटेवरून चालण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे तुमचं खरं अस्तित्त्व कुठेतरी मागे पडतं. भीती अथवा नकार टाळण्यासाठी मग तुम्ही खोटं आणि बनावट जगू लागता. पण लहानपणी तुम्ही असे मुळीच नसता. बिनधास्तपणे स्वतःचं मत मांडणारी, व्यक्त होणारी माणसं मोठी होताना स्वतःचं बालपण विसरून जातात. खरं तर मोठं झाल्यावर तुम्हाला तुमची मतं मांडण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं असतं. पण स्वतःच स्वतःवर लादलेल्या बंधनांमुळे तुम्ही व्यक्त होत नाही आणि मनात कुढत राहता. ज्यामुळे जगण्याचा आनंद तुम्हाला घेत येत नाही आणि तुमच्या वाट्याला नेहमीच निराशा येते. जर तुम्ही आनंदाने, प्रामाणिकपणे जगू लागला तर तुमच्या आयुष्यात तशीच माणसं जवळ येतील जी तुमच्या मतांचा आदर करतील. तुमच्या आयुष्यात अशाच घटना घडतील ज्या तुम्हाला फक्त आणि फक्त आनंदच देतील.
दररोज एक खेळ खेळा
लहान असताना जेव्हा तुम्ही खेळायला जायचा तेव्हा तुमच्या अभ्यासाच्या अथवा इतर चिंता काही काळासाठी सहज दूर व्हायच्या. तुम्ही खेळताना वर्तमान काळात जगायचा आणि आनंदी राहायचा. म्हणूनच मोठं झाल्यावरही थोडा काळ का होईना असं खेळ खेळता यायला हवं. ज्यामुळे तुम्ही जीवनातील ताणतणाव, चिंतेपासून काही काळ दूर जाल. खेळ खेळण्यामुळे तुम्ही फ्रेश व्हाल ज्यामुळे पुन्हा नव्या जोमाने तुम्हाला जीवन जगता येईल. शारीरिक हालचाल आणि व्यायाम होत असल्यामुळे खेळ खेळणं तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल. लहानपणी कोणते खेळ खेळले जायचे हे आठवणीत असेल तर वाचा Bhatukali Khel In Marathi | भातुकलीचा खेळ – बालपणीच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न
लहान मुलांसोबत वेळ घालवा
आपल्यातील लहानपण जपायचं असेल तर दिवसभरात काही काळ लहान मुलांसोबत घालवायला हवा. तुमची मुलं, इतरांची मुलं अथवा अनाथ मुलं असं कोणासोबतही दिवसाचे काही क्षण तुम्ही घालवले तर तुम्ही देखील त्या मुलांसारखा विचार करू लागाल. लहान मुलांकडे नेहमी नवीन कल्पना, उत्साह, काही तरी सतत करत राहण्याची ऊर्जा असते. ज्यांच्यासोबत राहून तुम्हालाही असं वागण्याची इच्छा होईल आणि तुमचं बालपण आपोआप जपलं जाईल. वर्तमान काळात आनंदी राहण्याचा हा एक छान मार्ग आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक