DIY सौंदर्य

#WFH मधील आळशीपणा त्वचेसाठी त्रासदायक, जाणून घ्या कसा

Leenal Gawade  |  Oct 22, 2020
#WFH मधील आळशीपणा त्वचेसाठी त्रासदायक, जाणून घ्या कसा

घरात राहून काम करणे हे अनेकांना आवडते. गेल्या काही दिवसांपासून घरातून काम करताना आपल्या अनेक सवयी बदलून गेल्या आहेत. दिवसभर काम आणि घर असे सगळे मॅनेज करताना अनेकांच्या तारेवरची कसरत होत आहे. तर काही जणांना या #WFH ने आळशी करुन टाकले आहे. एका जागी तासनतास बसताना कोणतीही काळजी घेतली जात नाही,असेही अनेकांच्या बाबतीत होत आहे. केस न विंचरणे, कोणतेही स्किनकेअर प्रोडक्ट न वापरणे असे सगळे सर्रास सुरु आहे. घरात असतानाही अनेकांना त्वचेच्या समस्या भेडसावत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का?तुमच्या या छोट्या छोट्या चुकाच तुमची त्वचा खराब करण्यास कारणीभूत आहेत. जाणून घेऊया कारण आणि उपाय

तुमच्याही स्तनांजवळ येतात पिंपल्स ही आहेत कारणं

या कारणामुळे #WFH त्वचेसाठी पडत आहे भारी

Instagram

परफेक्ट मेनीक्युअरसाठी घरीच बनवा स्क्रब

अशी घ्या त्वचेची काळजी

Instagram

 त्वचेची काळजी घेणे म्हणजे फार फॅन्सी काम नाही. तुम्ही अगदी आरामात त्वचेची काळजी घेऊ शकता. 

  1. सकाळी उठल्यानंतर आठवणीने एकदा तरी फेसवॉश करा. 
  2. त्यानंतर जर तुम्ही आंघोळ करणार असाल तर आंघोळीनंतर एखादे फेस क्रिम किंवा मॉश्चरायझर लावायला विसरु नका. 
  3. फेसऑईल चेहऱ्याला लावणार असाल तर ते काही काळानंतर चेहऱ्याला तेलकट करते. त्यामुळे तुम्ही चेहऱ्याला काही वेळानंतर टिपत राहा. एक स्वच्छ रुमाल किंवा टॉवेल आपल्यासोबत कायम ठेवा. 
  4. प्रत्येकाला साधारण 8 ते 9 तासांची ड्युटी असते. त्यामध्ये तुम्ही दोनवेळा तरी तुमच्या स्किनकेअरसाठी उठा.
  5.  योग्यवेळी फेसवॉश आणि ते नाही जमले तर तुम्ही पाण्याने चेहरा धुवू शकता. 

आता #WFH करत असताना थोडी काळजी घ्या अन्यथा तुम्हाला त्वचेच्या समस्या अधिक जाणवू लागतील.

या रंगाचे कपडे उजळवतात तुमचा स्किनटोन

Read More From DIY सौंदर्य