सकाळचा नास्ता आणि दोन वेळचं जेवण वेळेवर खाणं फार गरजेचं आहे. अन्नामुळे आपल्या शरीराची चयापचय क्रिया सुरळीत सुरू राहते. मात्र आजकाल कामाच्या गडबडीत आपण जेवणाची वेळ बऱ्याचदा विसरून जातो. कामातून आठवण झाल्यावर मग काहीतरी इतर पदार्थ खाऊन ती वेळ मारून नेतो. आजकाल डाएटच्या नावाखाली दुपारचं अथवा रात्रीच जेवण टाळण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. जर तुम्हीदेखील अशा प्रकारे तुमचे जेवण टाळत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की जेवण टाळल्यामुळे शरीरावर जे परिणाम होतात त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वजन दुपटीने वाढू शकतं.
जेवण टाळल्यामुळे वाढू शकतं तुमचं वजन
जर तुम्ही डाएट करण्यासाठी म्हणजेच वजन कमी करण्यासाठी एक वेळचं जेवण टाळत असाल तर सावध व्हा. कारण यामुळे तुमचं वजन कमी होण्याऐवजी अधिकच वाढण्याची शक्यता आहे. एका संशोधनानुसार जे लोक वेळेवर जेवत नाहीत त्यांचं वजन झपाट्याने वाढू शकतं. कारण जेवण न घेतल्यामुळे तुमची चयापचय प्रक्रिया कोलमडते. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी असतुंलित होते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील बेली फॅट मोठ्या प्रमाणावर वाढते आणि तुमचं वजन वाढू लागतं. वाढणाऱ्या वजनासोबतच तुम्हाला अनेक आरोग्यसमस्यांचा सामनादेखील करावा लागतो. वेळेवर न खाण्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताची साखरेची पातळी कमी होते. रक्तातील साखर कमी झाल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू लागतं. थकवा आणि चक्कर येऊ शकते. यासाठीच ठराविक वेळी जेवणं फार गरजेचं आहे.
Shutterstock
वेळेवर न जेवल्यास बिघडू शकते मेंदूचे कार्य
तुमच्या मेंदूला फ्रेश आणि तल्लख राहण्यासाठी पुरेशा ऊर्जेची गरज असते. मेंदूला या ऊर्जेचा पूरवठा करण्यासाठी शरीरात पुरेशा कॅलरिज असणं गरजेचं असतं. या कॅलरिज तुम्हाला तुम्ही खात असलेल्या अन्नातून मिळतात. विचार करणं, ताणतणावाला सामोरं जाणं, महत्त्वाचे निर्णय घेणं, सारासार विचार करण्यासाठी लागणारी पुरेशी ऊर्जा मेंदूला या अन्नाद्वारे मिळत असते. मात्र जर तुमच्या मेंदूला पुरेशी ऊर्जा मिळाली नाही तर या गोष्टींवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. ऊर्जेची गरज भागवण्यासाठी मेंदूकडून सतत भुक लागल्याचे संकेत मिळतात. ज्यामुळे शरीर जास्तीच्या कॅलरिज साठवून ठेवू लागते आणि तुमचे वजन वाढू लागते. शिवाय खाण्याची तीव्र इच्छा झाल्याने तुम्ही चुकीचे पदार्थ वेळी-अवेळी खाता आणि तुमच्या वजनावर त्याचा परिणाम होतो. वजन कमी होण्याऐवजी ते अधिकच वाढते. शिवाय मेंदूला ऊर्जा न मिळाल्याने सतत थकल्यासारखे आणि निरूत्साही वाटू लागते. ज्याचा परिणाम तुमच्या काम आणि वैयक्तिक आयुष्यावर होऊ शकतो.
जेवणाची वेळ न चुकण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स
- जर तुमचे कामाचे शेड्यूल फारच बिझी असेल तर दिवसभरात सकाळचा नास्ता, दोन वेळचे जेवण वेळेवर खाण्यासाठी अर्लामचा वापर करा आणि ठरवलेली वेळ पाळण्याचा प्रयत्न करा.
- दुसऱ्या दिवशीच्या नास्ता आणि जेवणाचे प्लॅनिंग आदल्या दिवशी झोपण्यापूर्वीच करून ठेवा. ज्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी खाण्या-पिण्याचे पदार्थ तुम्हाला सोबत नेणे शक्य होईल.
- जर तुम्हाला दोन वेळ व्यवस्थित जेवण घेणं शक्य नसेल तर दिवसातून चार ते पाच वेळा ठरवून ठराविक प्रमाणात आणि पोष्टिक पदार्थ खा.
- घराबाहेर पडताना वेळ पडल्यास खाण्यासाठी सुकामेवा, एखादे सिझनल फळ, राजगिराचा लाडू अथवा चिक्की असे पदार्थ जवळ ठेवा.
- सकाळचा नास्ता जास्तीत जास्त प्रोटिन्स आणि फारबर्स असे अन्नघटक असतील असा करा.
- आठवड्याच्या नास्ता आणि जेवणाचे नियोजन करून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला कामाच्या गडबडीत जेवणाचा विसर पडणार नाही.
- शक्य असल्यास उपवास करताना काहीतरी चांगले आणि पौष्टिक पदार्थ खा.
आम्ही दिलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
हेल्दी राहण्यासाठी साखरेऐवजी ‘या’ नैसर्गिक गोड पदार्थांचा करा वापर
जेवणानंतर दुपारी झोपण्याआधी जाणून घ्या त्याची योग्य पद्धत
सकाळी उठल्याबरोबर प्याल हे तर होईल फायदाच फायदा