पालकत्व

चोरओटी म्हणजे काय आणि गरोदरपणात कधी भरावी | Chor Oti Bharan Tradition In Marathi

Dipali Naphade  |  Jun 3, 2021
चोरओटी म्हणजे काय आणि गरोदरपणात कधी भरावी

 

गरोदर महिलांची चोरओटी भरणे कार्यक्रम (3rd Month Baby Shower) ही आपल्याकडे विशेषतः महाराष्ट्रीयन लोकांकडे पद्धत आहे. साधारण गरोदरपणाचे तीन महिने (3 Month Of Pregnancy) पूर्ण झाले की, गरोदर असणाऱ्या महिलेची चोरओटी माहेरच्यांकडे अर्थात आईने भरायची पद्धत आहे. चोरओटी (Chor Oti) अर्थात चोरचोळी असंही याला म्हटलं जातं. पण नक्की याची प्रक्रिया काय आहे याची सर्वांना कल्पना नसते. चोरओटी नक्की केव्हा आणि कशी भरावी याची इत्यंभूत माहिती आम्ही या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्याही घरात नवा लहानसा पाहुणा येणार असेल आणि तुम्हाला चोरओटी भरायची असेल तर तुम्हाला या लेख नक्की वाचायला हवा (Oti Bharan Tradition).

चोर ओटी कधी व कशी भरावी ही ओटी | Chor Oti Kadhi Bhartat

तीन महिने झाल्यानंतर गरोदर महिलांनी छानशी साडी नेसावी. या साडीच्या पदरात अर्थात ज्याला आपल्याकडे ओटी असं म्हटलं जातं. त्यामध्ये (ओटी भरण साहित्य) तांदूळ, हळकुंड, नारळ आणि सुपारी अशा सौभाग्याच्या वस्तूंनी ओटी भरली जाते. तीन महिन्यांनंतर साधारण सातव्या महिन्यापर्यंत आपल्याकडे कोणत्याही कार्यात गरोदर महिलांची ओटी भरण्याची पद्धत नाही. ओटी भरणे म्हणजे सौभाग्य जपणे आणि येणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी एक प्रकारे प्रार्थना करण्याचा हा हेतू असतो. आईचा आशीर्वाद आपल्या मुलीला मिळावा यासाठी ही प्रथा असते. पूर्वीच्या काळी माहेरी जास्त जाण्याची प्रथा नव्हती. त्यामुळे आईकडून मुलीचे लाड करण्यासाठी चोरओटी भरणे हा कार्यक्रम आखला जायचा. ओटी म्हणजे बेंबीखालील गर्भाशयाची जागा. ओटी भरणे म्हणजे बाळाचे सुख मिळणे. सुखप्राप्ती होणे. ओटी भरलेली असली की बाळाचा जन्म व्यवस्थित होतो असं म्हटलं जातं. त्यामुळेच नेहमीच सुवासिनींची लग्न झाल्यानंतर ओटी भरली जाते. ओटीमध्ये भरण्यात येणारे तांदूळ, फळं, फुलं ही संततीचे सूचक अर्थात प्रतीक समजण्यात येते. अर्थात फळाफुलाप्रमाणे बाळाची वृद्धी होवो असं सांगण्यात येते. चोरचोळी म्हणजेच चोरओटी ही चौथा महिना चालू झाल्यावर माहेरी भरण्यात येते. माहेरी ही भरण्याची पद्धत नसेल तर मोठी बहीण, मावशी यादेखील भरू शकतात. आजकाल सासरीदेखील चोरओटी भरण्याची पद्धत सुरू झाली आहे.

वाचा – Dohale Jevan Message In Marathi

चोरओटीचा कार्यक्रम केवळ घरच्या मंडळीच्या उपस्थितीत | Chor Oti Bharne In Marathi

सहसा आपल्याकडे बाळ होणार आहे हे तीन महिन्याच्या आत सांगत नाही. या महिन्यांमध्ये बाळाची वाढ नीट होऊ द्यायची असते. चोरओटी अर्थात ही कोणालाही कळू न देता घरच्या मंडळीच्या उपस्थितीतच केवळ भरली जाते. याचा कोणताही मोठा समारंभ करण्यात येत नाही. त्यामुळेच याला चोरओटी (Oti Bharne In Marathi) असं म्हटलं जातं. यासाठी फुलांचे दागिने अथवा बाकी कोणताही मोठा कार्यक्रम आखण्यात येत नाही. एकदा चोरओटी भरली की सातव्या महिन्यापर्यंत कोणाहीकडून ओटी भरून घेत नाहीत. नंतर डोहाळे जेवणाला सर्वांकडून ओटी भरून घेतली जाते. चोरओटीचा कार्यक्रम हा कोणालाही कळू न देता घरच्या घरात करावा लागतो. तसंच यावेळी दिलेले पंचामृत (दही, दूध, तूप, मध आणि साखर यांचे एकत्र मिश्रण) मुलीला देण्यात येते. ओटी भरल्यावर याने तोंड गोड करून हा कार्यक्रम केला जातो. तीन महिन्यापर्यंत अगदी आपल्या जवळच्या मैत्रिणींनाही याबाबत काहाही सांगितले जात नाही. त्यामुळेच केवळ अगदी कुटुंबातील व्यक्तींसहच हा चोरओटी सोहळा (Chor Oti Tradition) केला जातो.

You Might Like This:

Dohale Jevan Information In Marathi

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From पालकत्व