ज्योतिषशास्त्र ही एक प्राचीन भाषा आहे. ही भाषा आपली जन्मपत्रिका म्हणून ओळखल्या जाणार्या अद्वितीय कॉस्मिक सिग्नीचरचा अर्थ लावण्यासाठी ग्रह, राशिचक्र आणि पत्रिकेतील घरांवरून आपल्याबद्दल बरेच काही सांगते.आपली जन्मपत्रिका म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून आपल्या जन्माच्या विशिष्ट वेळी आणि ठिकाणी सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे यांची स्थिती दर्शवते.जे लोक पत्रिका, फलज्योतिष्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या मते आपल्या पत्रिकेवर आपले व्यक्तिमत्व, नातेसंबंध आणि जीवनाचा उद्देश्य हे सर्व ठरते.
तुमच्या जन्मपत्रिकेत तुमच्या दैनंदिन व्यक्तिमत्त्वाची रूपरेषा देणारे तीन मुख्य घटक तुमचा सूर्य कुठल्या घरात आहे, तुमची चंद्ररास काय आहे आणि तुमची लग्नराशी कुठली आहे हे असतात. बहुतेक प्रत्येकाला त्यांच्या जन्मतारखेप्रमाणे आपापले सनसाइन माहित असते, घरच्यांनी लहानपणीच पत्रिका बनवली असेल किंवा ज्योतिषशास्त्रात रस असेल तर चंद्ररास देखील ठाऊक असते. आपले वैदिक राशिभविष्य आपल्या चंद्रराशीवरूनच आपण बघतो. पण बऱ्याच लोकांना लग्नराशी काय असते आणि लग्न राशीवर काय अवलंबून असते हे ठाऊक नसते.
पत्रिकेतील लग्नराशी किंवा रायझिंग साइन म्हणजे काय?
भारतीय ज्योतिष शास्त्रात, लग्न म्हणजे ज्या क्षणी आत्मा पृथ्वीवर त्याच्या नवीन शरिराच्या रूपात नवा जन्म घेतो तो क्षण होय. एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी रास उदित होत असेल ती त्या व्यक्तीची लग्नराशी किंवा असेन्डन्ट किंवा रायझिंग साइन असते. आपल्या जन्मपत्रिकेत 12 घरे असतात. या 12 घरांपैकी पहिल्या घराला असेंडंट म्हणतात. हे घर व्यक्तीच्या जन्माच्या वेळी पूर्वेकडील क्षितिजावर उदित होणाऱ्या राशीवर ठरते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास जर संपूर्ण आकाश गोलाकार म्हणून 360 अंश धरले व 12 भागांमध्ये विभागले गेले तर प्रत्येक रास 30 अंशांची असते. या १२ राशींपैकी कोणतीही एक रास व्यक्तीच्या जन्माच्या वेळी पूर्व दिशेला असते. ती त्या व्यक्तीची लग्नराशी ठरते.
अधिक वाचा – राशीफळ 2022ः कसे असेल नवे वर्ष, कोण होईल आनंदी आणि कोणाला घ्यावी लागेल काळजी
लग्नराशीवर काय अवलंबून असते?
तुमचे रायझिंग साइन हे तुमचे सामाजिक व्यक्तिमत्व असते. आपली लग्नरास आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, स्व-प्रतिमेचा आणि सर्वसाधारणपणे आपल्या बाह्यमुखी स्वभावाचा एक महत्त्वाचा भाग दर्शवते. ज्योतिष शास्त्रातील असेन्डन्ट तुमची वागण्या-बोलण्याची पद्धत, तुमचे व्यक्तिमत्व व तुमची ओळख दर्शवते.रायझिंग साइन समजून घेणे म्हणजे एखाद्याला कसे व्यक्त व्हायला आवडते आणि त्याला जगासमोर स्वतःला कसे मांडायचे आहे हे समजून घेणे होय.
रायझिंग साइनची विविध वैशिष्ट्ये
आपल्याला माहीतच आहे की बारा राशी या चार तत्वांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. मिथुन, तूळ व कुंभ या वायुतत्वाच्या राशी आहेत, वृषभ, कन्या व मकर या पृथ्वीतत्वाच्या राशी आहेत, मेष, सिंह व धनु या अग्नितत्वाच्या राशी आहेत आणि कर्क, वृश्चिक व मीन या जलतत्वाच्या राशी आहेत. प्रत्येक तत्वाच्या राशींची जशी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत त्याचप्रमाणे रायझिंग साइनला देखील ही वैशिष्ट्ये लागू होतात. तुमचे रायझिंग साइन जर वायुतत्वाचे असेल तर तुम्ही तुम्ही हुशार, जिज्ञासू, मैत्रीपूर्ण आहात आणि तुमचा स्वभाव बोलका आहे.
तुमचा असेन्डन्ट जर अग्नितत्त्वाचा असेल तर तुम्ही कृती-केंद्रित, आत्मविश्वासपूर्ण आणि अति-स्पष्टवक्ते असता. तुमचे रायझिंग साइन जर पृथ्वीतत्त्वाचे असेल तर भौतिक जगावर लक्ष केंद्रित करण्याकडे तुमचा कल आहे. तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन नेहमीच स्थिर असतो. तसेच जर तुमचा असेन्डन्ट जलतत्वाचा असेल तर तुम्ही येणाऱ्या अनुभवांना खूप भावनिकतेने व संवेदनशीलतेने सामोरे जाता.
फोटो सौजन्य – dreamstime.com
अधिक वाचा – फेब्रुवारी महिन्यात या राशीच्या लोकांना होणार धनलाभ
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक