आरोग्य

सुदर्शन क्रिया म्हणजे काय, जाणून घ्या फायदे

Trupti Paradkar  |  Apr 19, 2022
सुदर्शन क्रिया म्हणजे काय, जाणून घ्या फायदे

आरोग्याचे महत्त्व आजकाल प्रत्येकाला पटू लागलं आहे. ज्यामुळे प्रत्येकजण आरोग्य राखण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे प्रयत्न करताना दिसतो. यासाठीच उपयुक्त आहेत या आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi निरोगी राहण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल करणे आणि व्यायामाची सवय स्वतःला लावणे. यासाठी Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे प्रत्येकाला माहीत असायला हवं. योगासने केल्यामुळेही आरोग्यावर चांगला परिणाम होतो. आजकाल योगासनांचा सराव करताना सुदर्शन क्रिया (Sudarshan Kriya) करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र काही लोकांना सुदर्शन क्रिया म्हणजे काय हे माहीत नसतं. यासाठीच जाणून घ्या सुदर्शन क्रिया म्हणजे काय आणि त्याचे आरोग्यावर होणारे फायदे

सुदर्शन क्रिया म्हणजे काय

सुदर्शन क्रिया हा शास्त्रशुद्ध आणि लयबद्ध असा श्वसनाचा व्यायाम आहे. तंत्रशुद्ध पद्धतीने याचा सराव केल्यास आरोग्यावर खूप चांगले फायदे दिसून येतात. सु चा अर्थ योग्य आणि दर्शन म्हणजे पाहाणे…यासाठीच तज्ञ्जांच्या देखरेखीखालीच सुदर्शन क्रियेचा सराव करायला हवा. मानसिक स्वास्थ राखण्यासाठी सुदर्शन क्रियेचा चांगला फायदा होतो. यासाठी जाणून घ्याचे काही फायदे

सुदर्शन क्रियेचे फायदे

सुदर्शन क्रिया जर तज्ञ्जांच्या मार्गदर्शनाखाली नियमित केली तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम दिसू शकतो.

ताणतणाव कमी होतो

सुदर्शन क्रिया करताना तुम्हाला  तुमच्या श्वासावर नियंत्रण मिळवता येते. ज्यामुळे मन नियंत्रित राहण्यास मदत होते. श्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मनातील ताणतणाव, नकारात्मकता कमी होत जाते. नैराश्य दूर करण्यासाठी, स्ट्रेस हॉर्मोन्स कमी करण्यासाठी योगाभ्यासात सुदर्शन क्रियेचा सराव केला जातो. 

चांगली झोप लागते

आजकालच्या जीवनशैलीचा निसर्ग चक्रावर परिणाम होताना दिसत आहे. ज्यामुळे माणसं रात्री उशीरापर्यंत काम करतात आणि झोपेचे निसर्ग चक्र बिघडवतात. ज्यामुळे पुढे अनिद्रा, निद्रानाशासारख्या समस्या निर्माण होतात. मात्र जर तुम्ही नियमित सुदर्शन चक्राचा सराव केला तर तुम्हाला रात्री शांत झोप लागू शकते.

उत्साह वाढतो

शारीरिक कार्य करण्यासाठी माणसाला पुरेशा ऊर्जेची गरज असते. मात्र ताणतणावामुळे शरीरातील उत्साह, ऊर्जा नकळत कमी होत असते. जर तुम्हाला त्वरीत फ्रेश व्हायचं असेल आणि कंटाळा दूर करायचा असेल तर सुदर्शन क्रियेचा फायदा नक्कीच होऊ शकतो. 

ह्रदयाचे कार्य सुधारते

कोलेस्ट्रॉल वाढण्यामुळे आजकाल अनेकांना ह्रदयाच्या समस्या जाणवतात. मात्र जे लोक नियमित सुदर्शन क्रिया करतात त्यांचे कोलेस्ट्रॉल कमी होतेच शिवाय त्यांचा रक्तदाबही नियंत्रित राहतो. अनेक आजारपणे दूर ठेवण्याचा सुदर्शन क्रिया करणं हा एक फायदेशीर उपाय ठरू शकतो.

सुदर्शन क्रिया कशी करावी

सुदर्शन क्रिया करण्यासाठी भस्त्रिका प्राणायाम, उज्जयी प्राणायाम, ओमकाराचा जप आणि सुदर्शन क्रिया योग असा स्टेप बाय स्टेप प्रवास करावा लागतो. यासाठी सर्वात आधी वज्रासनात अथवा सुखासनात बसा आणि उज्जयी प्राणायाम करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य