उभं राहून घटाघटा पाणी पिण्यामुळे पोटात आणि छातीत दुखतं असं म्हणतात. त्याचप्रमाणे दूधपण चुकीच्या पद्धतीने आणि अवेळी पिण्यामुळे ते पचत नाही आणि पोट फुगून गॅसेस होतात. आपल्याला परिणाम दिसत असतात पण त्यामागचं नेमकं कारण कळत नाही. भविष्यात नुकसान टाळायचं असेल तर पाणी आणि दूध नेमकं कसं प्यावं हे प्रत्येकाला माहीत असायला हवं. आयुर्वेदात दूध आणि पिण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत. आयुर्वेदानुसार पाणी नेहमी बसून आणि दूध उभे राहून प्यावे. यासाठीच जाणून घ्या दूध आणि पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि त्यामागील कारण
आयुर्वेदानुसार कसे प्यावे पाणी आणि दूध (What is the right way to drink milk and water according to Ayurveda in Marathi)
पाणी पिताना नेहमी घरातील वयोवृद्ध मंडळी जमिनीवर अथवा खुर्चीवर बसण्याचा सल्ला देतात. उभ्याने घटघटा पाणी पिल्यास रागावतात. असं केलं तर मोठेपणी गुडघे दुखतील असंही सांगितलं जातं. बऱ्याचदा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. मात्र मोठं झाल्यावर जेव्हा त्याचे परिणाम दिसू लागतात तेव्हा मोठ्यांचे न ऐकल्याचे दुःख होते. वास्तविक आयुर्वेदात प्राचीन काळापासूनच पाणी आणि दूध पिण्याची योग्य पद्धत आणि काही नियम सांगण्यात आले आहेत. ज्यानुसार पाणी बसून आणि दूध नेहमी उभे राहून प्यावे. असं केल्यामुळे दूध आणि पाणी पिण्याचे चांगले फायदे आरोग्याला मिळतात. शिवाय असं न केल्यास आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठीच त्यामागील तर्कशुद्ध कारण तुम्हाला माहीत असायला हवे. ज्यामुळे तुम्ही चुकीच्या पद्धतीने कधीच पाणी आणि दूध पिणार नाही.
दूध नेहमी उभं राहून का प्यावे (Why Drink Milk in Standing Position)
दूध आपण नेहमी बसून पितो मात्र उभं राहून दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आयुर्वेदानुसार थंड दूध शरीरातील वात आणि पित्त दोषाला नियंत्रित ठेवते. रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायचे असेल तर रात्रीचे जेवण संध्याकाळी घ्यायला हवे. त्यानंतर दोन तासांनी कोमट दूध प्यावे. शिवाय दूध उभं राहून प्यावे ज्यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते. सांधेदुखीचा त्रास कमीम होतो, स्नायू मजबूत होतात आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. ह्रदयरोग आणि ब्लडप्रेशरपासून सुरक्षा मिळते. डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी दूध पिणे उपयुक्त ठरते.
Pixels
पाणी नेहमी बसून का प्यावे (Why Drink water in Sitting Position)
आयुर्वेदानुसार जेव्हा तुम्ही उभे राहून घटाघटा पाणी पिता तेव्हा तुमच्या पोटावर चुकीचा दाब येतो. उभे राहून पाणी पिण्यामुळे पाणी तुमच्या अन्ननलिकेतून वेगाने थेट आतड्यात जाते. ज्याचा तुमच्या पचनक्रियेवर चुकीचा परिणाम होतो. उभे राहून पाणी पिण्यामुळे तुमच्या संपूर्ण शारीरिक क्रियेवर विपरित परिणाम होतो. असं सतत केल्यामुळे सांधेदुखीचं दुखणं डोकं वर काढते. यासाठीच घरातील जाणती माणसं पाणी बसून आणि शांतपणे पिण्याचा सल्ला देतात. उभे राहून पाणी पिणे आरोग्यासाठी मुळीच हिताचे नसते. यामुळे पोटाच्या समस्या, अपचन, अॅसिडिटी, गॅसेस, ढेकर अशा समस्या होतात. यासाठीच पाणी कधीही उभे राहून न पिता बसून प्यावे आणि पाणी घटा घटा न पिता हळू हळू प्यावे. आयुर्वंदात सांगितलेले हे नियम पाळले तर तुमचे आरोग्य नक्कीच चांगले राहील.
फोटोसौजन्य – Pixels
अधिक वाचा –
रिकाम्या पोटी प्या जिऱ्याचं पाणी आणि बघा जादू!