ताप किंवा पायरेक्सिया हा आजार नसून शरीराचे तापमान वाढल्यामुळे दिसणारे लक्षण आहे. ताप असलेल्यांना चिडचिड,सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी, भूक न लागणे, अशक्तपणा, घाम येणे, चक्कर येणे, आळस आणि मळमळ अशा तक्रारी उद्भवू शकतात. काही चाचण्या तुम्हाला तापाबद्दल जाणून घेण्यास मदत करतील. आम्ही याबाबत अधिक माहिती घेतली आहे, डॉ. कीर्ती कोटला, सल्लागार पॅथॉलॉजिस्ट, अपोलो डायग्नोस्टिक पुणे यांच्याकडून. सामान्य तापामध्ये नक्की कोणत्या चाचण्या कराव्या लागतात आणि त्याचे नक्की महत्त्व काय आहे याबाबत आम्ही जाणून घेतले.
रक्त तपासणी:
पांढऱ्या रक्त पेशी (WBC) संसर्गाशी लढा देतात, म्हणून पांढऱ्या पेशींची वाढलेली पातळी संसर्गाचे सूचक आहे. ही चाचणी घेऊन, तुम्हाला काही संसर्ग झाला आहे की नाही हे डॉक्टर ठरवू शकतील आणि तुम्हाला योग्य उपचार देऊ शकतील.
टायफॉइड तापासाठी वाइडल टेस्ट:
ही सॅल्मोनेला टायफी, सॅल्मोनेला पॅराटाइफी ए, बी आणि सीची उपस्थिती शोधण्यासाठी घेतली जाते, जे आतड्यांसंबंधी तपासास फायदेशीर ठरतात. या चाचणीमध्ये, रुग्णाच्या सीरम आणि साल्मोनेला अँटीजेन यांच्यातील एकत्रित प्रतिक्रिया सकारात्मक होऊ शकते. तुम्हाला सावध राहावे लागेल आणि वेळेवर काळजी घ्यावी लागेल. टायफॉईडची साथ पसरते तेव्हा काळजी घ्यायला हवी.
अधिक वाचा – जाणून घ्या चिकनगुनिया लक्षणे मराठीतून (Chikungunya Symptoms In Marathi)
मलेरिया शोधण्यासाठी चाचणी:
मलेरिया परजीवीची उपस्थिती शोधण्यासाठी वापरली जाते. या चाचणीमध्ये, एखाद्याचे रक्त गोळा केले जाते आणि एका स्लाइडवर जाड स्मीअर बनवले जाते, ज्याचे सूक्ष्मदर्शकाखाली परजीवींच्या उपस्थितीसाठी विश्लेषण केले जाते. मलेरियाचा सामना करण्यासाठी क्युबीसी मलेरिया चाचणी अचूक मानली जाते.
डेंग्यू शोधण्यासाठी चाचणी:
इएलआयएसए (इन्झाईम-लिंक इम्युन सॅार्बंट असे) ही डेंग्यूबद्दल जाणून घेण्यासाठी सामान्यतः वापरली जाणारी चाचणी आहे. एकूण प्रोटीनची वाढलेली पातळी संसर्ग किंवा इतर दाहक स्थिती या चाचणीच्या माध्यमातून दर्शवते. सीएसएप मध्ये ग्लुकोजची कमी पातळी संसर्ग दर्शवू शकते.
अधिक वाचा – तापामुळे तोंड झाले असेल कडू, करा सोपे उपाय
ताप नियंत्रित करण्यासाठी टिपा:
- एक गुळगुळीत टॉवेल किंवा सुती कापड घ्या आणि थंड पाण्यात बुडवा, थंड टॉवेल मानेभोवती, कपाळावर आणि घोट्याभोवती गुंडाळा
- बेरी, टरबूज आणि संत्री यांसारखी फळे खा, ज्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते आणि ते संक्रमणाविरुद्ध लढू शकतात.
- मसालेदार, चरबीयुक्त आणि तेलकट पदार्थ टाळा
- तापामुळे निर्जलीकरण होते. आपण शक्य तितके पाणी पिऊन निर्जलीकरण टाळू शकता
- पुरेशी विश्रांती घेतल्याने ताप लवकर कमी होतो
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताप आला असेल तर थंड हवेवर अजिबात बसू नका. बाहेर फिरणे चुकीचे आहे. तुमच्या शरीरातील संक्रमण इतरांना होण्याची यामुळे शक्यता असते. तसंच तुम्हाला यामुळे अधिक इन्फेक्शन होण्याची शक्यताही असते. त्यामुळे लवकरात लवकर बरे होण्यासाठी जास्तीत जास्त विश्रांती घेणे सामान्य तापातदेखील गरजेचे आहे. अन्यथा अंगात शक्ती राहात नाही
- ताप असल्यास हळदीचे दूध प्यावे. हळदीमध्ये अँटीव्हायरल आणि अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे शरीरातील प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत करतात. हळदीमुळे ताप, घशात होणारी खवखव कमी होते आणि ताप कमी होण्यास मदत मिळते. ग्लासभर दुधामध्ये हळद मिसळून प्यायल्यासदेखील तुम्हाला फायदा मिळतो. तसंच तुम्ही मध आणि हळदीचे चाटणही करून खाऊ शकता
तुम्हालादेखील सामान्य तापामध्ये नक्की काय करायला हवे हे माहीत करून घ्यायला हवे. जेणेकरून बिथरून जाणार नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक