Natural Care

त्वचेखाली असणारे कोलॅजन त्वचेसाठी का असते गरजेचे

Leenal Gawade  |  Jun 30, 2021
त्वचेखाली असणारे कोलॅजन त्वचेसाठी का असते गरजेचे

त्वचा चांगली राहावी असे आपल्या प्रत्येकाला वाटते. त्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी आपण तंतोतंत फॉलो करतो.  डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत त्वचेची काळजी घेण्याचे काम आपण सगळेच करतो. पण त्वचा चांगली राहण्यासाठी काही गोष्टी या फारच गरजेच्या असतात. त्यापैकीच एक म्हणजे ‘कोलॅजन’. त्वचेखाली असणारे हे कोलॅजन नेमके काय? त्याचे फायदे आणि ते त्वचेसाठी इतके गरजेचे का असते हे देखील जाणून घेणे फारच गरजेचे आहे. कोणत्याही डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुम्हाला याची योग्य माहिती मिळू शकते. पण  तुम्हाला त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही यामध्ये केला आहे. त्यामुळे जाणून घेऊया कोलॅजन म्हणजे काय?

#DIY: अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी झटपट घरगुती उपाय

कोलॅजन म्हणजे काय?

कोलॅजन हा संपूर्ण शरीरात आढळणारा असा घटक आहे. पण हा सगळ्यात जास्त त्वचेखाली आढळतो. हे प्रत्येकाच्या शरीरात असते. ज्यांच्या शरीरात कोलॅजनचे प्रमाण योग्य असते. अशांची त्वचा ही नेहमीच चांगली आणि तुकतुकीत दिसते. कोलॅजन त्वचेतील टिश्यूला धरुन ठेवण्याचे काम करते. त्यामुळे त्वचा ही तुकतुकीत आणि मुलायम दिसते. वयोमानानुसार त्वचेखाली असलेला हा घटक कमी होत जातो. त्यामुळे त्वचेला सुरकुत्या यायला सुरुवात होते. त्यामुळे कोलॅजन जास्त काळ टिकण्यासाठी काही खास क्रिम्स आणि ट्रिटमेंट घेतल्या जातात. या शिवाय त्वचा चांगली राहण्यासाठी कोलॅजन बुस्ट करणाऱ्या काही गोष्टीही दिल्या जातात. 

लग्नाचा सीझन आला, नैसर्गिक पद्धतीने आणा चेहऱ्यावर *ग्लो* (Tips For Glowing Skin In Marathi)

कोलॅजनमुळे त्वचेला होणारे फायदे

कोलॅजनचे नेमके काय फायद आहेत असा प्रश्न पडला असेल तर  कोलॅजनमुळे त्वचा नेमकी कशी राहते ते जाणून घेऊया 

कोलॅजन बुस्ट करण्यासाठी काय करावे?

 तुमच्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या आल्या असतील आणि त्वचा चांगली दिसत नाही असे वाटत असेल तर तुम्ही खास त्वचेसाठी काही खास गोष्टींचे सेवन करायला हवे.  कोलॅजन बुस्ट करण्यासाठी तुम्ही आहारात मासे, अंडी, व्हिटॅमिन C असलेल्या फळांचा समावेश करायला हवा.  त्यामुळे तुमच्या शरीरातील कोलॅजन वाढण्यास मदत मिळेल.  

आता त्वचा आतून चांगली आणि चिरतरुण ठेवायची असेल तर तुम्ही कोलॅजन वाढवण्याकडे लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा होण्यास मदत होईल. 

अंडरआर्म्स स्वच्छ ठेवण्यासाठी वॅक्सिंग आणि शेव्हिंग क्रीमपैकी कोणता प्रकार योग्य, जाणून घ्या (How To Clean Underarms In Marathi)

 

Read More From Natural Care