मकरसंक्रांत (Makar Sankranti 2022) म्हटलं की सर्वात पहिला आठवतो तो काळा रंग. आपल्याकडे बऱ्याचदा सणांना अथवा कोणत्याही कार्याला काळा रंग अशुभ मानला जातो. मात्र मकर संक्रांत असा एक सण आहे ज्या सणाला आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. पण मकर संक्रांतीला नक्की काळे कपडे का घातले जातात आणि याची कारणे नक्की काय आहेत याबाबत आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. खरं तर आपल्याकडे प्रत्येक सण आणि ऋतूनुसार रंगाला आणि परिधानाला महत्त्व आहे. प्रत्येक सणाचे असेही खास महत्त्व आपल्याकडे आहे. तसंच कोणत्याही सणाला एखादी गोष्ट करायची असेल तर त्यामागे नक्की शास्त्रीय कारण काय आहे देखील तुम्हाला कळायले हवे. केवळ अंधश्रद्धा नाही तर योग्य शास्त्रीय कारणानुसार आपल्याकडे रितीरिवाज पाळले जातात. तिळाचं महत्त्व तर आहेच, असेच संक्रांतीला नक्की काळ्या रंगाचे काय महत्त्व आहे ते आपण जाणून घेऊया आणि देऊया मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.
काळ्या रंगाचे काय आहे महत्त्व
हिंदू धर्मानुसार प्रत्येक सणाचे एक वेगळे महत्त्व असते. जानेवारी महिन्यात पहिलाच सण येतो तो म्हणजे मकरसंक्रांत. मकर संक्रांतीला आपल्याकडे लहान मुलाचे बोरनहाण, तिळगुळाचे महत्त्वदेखील आहे. पण याची नक्की कारणे काय आहेत? ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. सूर्याच्या एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये होणाऱ्या संक्रमणाला संक्रांत असे म्हटले जाते. तर मकर संक्रांत म्हणजे उत्तरायण. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र ही मोठी असते आणि या दिवसापासून दिवस वाढायला सुरूवात होते. काळोख्या रात्रींना काळ्या रंगाचे (Black Colour) वस्त्र नेसून आपण निरोप देतो असं पूर्वापार सांगण्यात आले आहे.
मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचे दुसरे कारण म्हणजे ज्याप्रमाणे पांढरा रंग (White colour) हा उष्णता परावर्तित करण्यास मदत करतो, अजिबात उष्णाता शोषून घेत नाही. त्याविरुद्ध काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. जानेवारी महिन्यामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असते. थंडीच्या दिवसामध्ये आपले शरीर अधिक ऊबदार राहावे यासाठीच काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. तिळगूळानेदेखील शरीरातील उष्णता टिकून राहाते म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे परिधान करून तिळगूळ देण्याचीही प्रथा आहे. इतकंच नाही तर अनेक ठिकाणी गुळाची पोळीही बनवली जाते.
काळानुसार परंपरांमध्ये बदल
काळानुसार संक्रांतीच्या काही परंपरांमध्ये नक्कीच बदल झाला आहे. मकरसंक्रांतीला करण्यात येणारे हळदीकुंकू, देण्यात येणारे वाण हे काही ठिकाणी आता मागे पडले आहे. मात्र तरीही आजही आवर्जून किमान या निमित्ताने तरी एकमेकांच्या गाठीभेटी होतील म्हणून हे सोहळे करण्यात येतात. तसंच नवीन लग्न झालेल्या नवरीची पहिली संक्रांत, संक्रांतीला घालण्यात येणारे हलव्याचे दागिने, बाळाचे बोरनहाण, जावयाचा सण या सगळ्या गोष्टी आजही तितक्याच उत्साहात साजऱ्या होताना दिसतात. यावेळी मकर संक्रांतीला नव्या नवरीकडून खास उखाणेही ऐकून घेतले जातात. मकर संक्रांतीला तुम्ही तुमच्या प्रियजनांना अशा सोहळ्यांना गिफ्टही देऊ शकता. तर मकर संक्रांतीचे वाण देण्यासाठीही काही खास उपयोगी गोष्टींचा विचार तुम्ही करू शकता.
सण म्हणजे खरं तर एकमेकांना भेटण्याचा आणि एकमेकांची खुशाली जाणून घेण्याचा दिवस. तुम्हीही तुमची मकरसंक्रांत यावर्षी अशाच स्वरूपात काळे कपडे घालून साजरी करा. कोरोनाचा धोका असला तरी स्वतःची काळजी घेत नक्कीच आपण आपले सण साजरे करू शकतो. तिळगूळ घ्या, गोड गोड बोला!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade