त्वचेची काळजी

गरजेपेक्षा जास्त वेळा फेशियल केल्याचे दुष्परिणाम

Trupti Paradkar  |  Mar 4, 2020
गरजेपेक्षा जास्त वेळा फेशियल केल्याचे दुष्परिणाम

फेशियल ही चेहरा स्वच्छ करण्याची आणि चेहऱ्यावर त्वरीत ग्लो येण्यासाठी केली जाणारी एक ब्युटी ट्रिटमेंट आहे. बऱ्याचजणी हे ब्युटी ट्रिटमेंट फॉलो करण्यासाठी महिन्यातून एकदा तरी फेशियल करतात. मात्र काही जणी आपल्या त्वचेबाबत फारच चिंतीत असतात. ज्यामुळे सुंदर दिसण्यासाठी वारंवार फेशियल करतात. वास्तविक चेहरा स्वच्छ करण्यासाठी आणखी अनेक उपाय असतात. मात्र यासाठी  सतत फेशिअलचा वापर केल्यामुळे त्वचेचं नुकसान नक्कीच होऊ शकतं. यासाठी सतत चेहऱ्यावर फेशियल का करू नये याचं कारण जरूर जाणून घ्या. 

काय होतं अती प्रमाणात फेशियल केल्याामुळे

सुंदर दिसण्यासाठी आणि चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येण्यासाठी महिला फेशियल करतात. एखाद्या कार्यक्रमात उठून दिसण्यासाठी अथवा चेहरा फ्रेश दिसण्यासाठी फेशियलचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. मात्र वारंवार फेशियल करण्याचे चेहऱ्यावर काय दुष्परिणाम होतात हे तुम्हाला माहीत असायलाच हवं. फेशियल केल्यामुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होते. मात्र अशा पद्धतीने वारंवार त्वचा मुळापासून स्वच्छ करणं धोकादायक असू शकतं. 

Shutterstock

त्वचेवर फेशिअलचा असा होतो चुकीचा परिणाम

फेशियलसाठी वापरण्यात येणाऱ्या क्रीममध्ये केमिकल्सचा अती प्रमाणात वापर केला जातो. या क्रीम त्वचेसाठी कितीही उपयुक्त  असल्या तरी त्यांचा अती वापर धोकादायक असतो. या क्रीमच्या अती वापरामुळे तुमच्या त्वचेला खाज येऊ शकते. बऱ्याचदा याच्या अती वापरामुळे तुमची त्वचा कांळवंडते आणि विचित्र दिसू शकते. सतत फेशियल केल्यामुळे तुमच्या त्वचेमधील मऊपणा कमी होण्याची शक्यता असते. ज्यामुळे तुमच्या त्वचेला इनफेक्शन होण्याचा धोका वाढतो. बऱ्याचदा फेशिअलसाठी वापरण्यात येणाऱ्या एखाद्या क्रीमचीदेखील जर तुम्हाला अॅलर्जी असेल तर तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. यासाठीच फेशियल करताना तुमच्या  फेस टोनचा विचार करूनच क्रीम निवडायला हवं. 

Shutterstock

त्वचेला इनफेक्शनचा धोका वाढतो –

वारंवार फेशियल केल्यामुळे तुमच्या त्वचेवर ग्लो येण्याऐवजी काळे डाग, पिंपल्स वाढण्याची शक्यता वाढते. कारण फेशियल करताना केल्या जाण्याऱ्या प्रोसेसमध्ये तुमच्या चेहऱ्यावरील रोमछिद्रे मोकळी होतात व काही काळानंतर ती पुन्हा बंद होतात. मात्र फेशिअलसाठी जर ही प्रक्रिया तुम्ही वारंवार केली तर त्वचेची रोमछिद्रे मोकळीच राहण्याची शक्यता दाट असते. ज्यामुळे तुमच्या त्वचेला इनफेक्शन होऊन पिंपल्स आणि काळे डाग निर्माण होण्याचा धोका वाढतो. फेशिअलसाठी केल्या जाणाऱ्या मसाजचे प्रमाण अती झाले तर त्यामुळेही तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. कारण यामुळे तुमची त्वचा सैलसर पडण्याची शक्यता अधिक असते. यासाठीच वारंवार चेहऱ्यावर फेशियल करणं चुकीचं आहे. फेशिअल करताना तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ केली जाते. ज्यासाठी सतत क्लिंझिंग क्रीम, स्टीमचा वापर केला जातो. जर तुम्ही सतत फेशियल करत असाल तर यामुळे तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होत जातं. ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू शकते.फेशियलसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध उपकणांच्या अती वापरामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. यासाठी त्वचेच्या पोतानुसार फेशिअलची निवड करा आणि सतत फेशियल करणे टाळा. 

महिन्यातून कितीवेळा फेशियल करणं आहे योग्य

वयाच्या तिशीनंतर त्वचेला फेशियल करण्याची गरज असू शकते.कारण तिशीनंतर तुमच्या  त्वचेवर एजिंगच्या खुणा दिसू लागतात. मात्र तिशीच्या आतील महिलांनी फेशिअलपेक्षा चेहरा क्लीन अप करण्यावरच अधिक भर द्यावा. ज्यामुळे तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेतली जाते. याचप्रमाणे तिशीनंतर महिन्यातून एकदा फेशियल करण्याच काहीच हरकत नाही.ज्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान नक्कीच होणार नाही.  

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

टॅन व्हायचं नसेल तर असं लावा सनस्क्रिन, जाणून घ्या योग्य पद्धत

भारतीयांची त्वचा आहे वेगळी म्हणून त्यांनी अशी घ्यावी काळजी (Indian Beauty Tips In Marathi)

जाणून घ्या केस वाढवण्यासाठी कोणते तेल वापरावे (Best Oil For Hair Growth In Marathi)

Read More From त्वचेची काळजी