Mythology

पूजेला बसताना नवराबायकोचं एकत्र बसणं मानलं जातं शुभ

Aaditi Datar  |  Nov 27, 2019
पूजेला बसताना नवराबायकोचं एकत्र बसणं मानलं जातं शुभ

हिंदू धर्मामध्ये नवराबायकोने एकत्र पूजेला बसणं अनिवार्य आहे. त्यामुळे आपल्याकडे जोडीने पूजेला बसण्याची पद्धत आहे. असं जोडीने पूजेला बसणं खूप शुभही मानलं जातं. कारण धार्मिक मान्यतेनुसार नवराबायकोने एकत्र पूजा केल्यास त्याचं पुण्य जास्त मिळतं. तर विवाहानंतर एकट्याने पूजा अर्चना केल्यास त्याचं महत्त्व कमी होतं. लग्नानंतर फक्त पूजाच नाहीतर तीर्थ किंवा धर्माशी निगडीत इतर कर्मही एकत्र करावीत. चला जाणून घेऊया यामागील विचार आणि त्याने होणारे फायदे.

Instagram

धार्मिक कार्य जोडीने केल्याने दांपत्य जीवनातील ताळमेळ चांगला ठेवण्याची संधी मिळते. एकत्रित पूजा केल्याने आणि धार्मिक स्थळी जाण्याने तुमच्या नात्यातील चढउतार आणि मतभेद कमी होण्यास मदत होते. जोडप्याचं एकमेंकाप्रती असणारं प्रेमही वाढतं. 

लग्नात सप्तपदींच्या वेळी दिलेल्या वचनांमध्ये एक वचन हेही असतं की, लग्नानंतर व्रत, धर्म-कर्मासाठी जाणार असल्यास तुझ्यासोबत मला घेऊन जाशील. याच कारणामुळे लग्नानंतर नवराबायकोला एकट्याने पूजा करणं योग्य नसतं. जर असं केल्यास योग्य ते फळ मिळत नाही आणि तीर्थाला गेल्यास यात्राही यशस्वी होत नाही. 

आपल्या धार्मिक ग्रंथांमधील संदर्भ पाहिल्यास अशी अनेक उदाहरण मिळतील. ज्यामध्ये स्त्रिया ही पुरूषांची शक्ती असल्याचं सांगण्यात आलं आहे. मग ती राधा-कृष्णाची जोडी असो वा सीता-राम. देवांच्या आधी नेहमीच त्यांच्या शक्तीचं नाव घेतलं जातं. त्यामुळे पत्नीशिवाय कोणतंही धार्मिक कार्य अपूर्ण मानलं जातं. हीच गोष्टी पत्नीलाही लागू होते. 

या राशीची लोकं करतात लवकर ब्रेकअप

पूजेला बसताना बायकोने नवऱ्याच्या कोणत्या बाजूला बसावे

Instagram

नवराबायकोचं नातं हे खूपच कोमल आणि पवित्र असतं. हे नातं विश्वासाने बांधलेलं असतं. असं म्हणतात की, पत्नी ही पतीचं अर्ध अंग असते. दोघांमध्येही कोणताही भेद नसतो. मात्र शास्त्रानुसार पूजेला बसताना बायकोने नवऱ्याच्या नेहमी उजव्या बाजूला बसावे. कारण पत्नीला वामांगी म्हटलं जातं म्हणजेच नवऱ्याची डावी बाजू. त्यामुळे विज्ञान आणि ज्योतिषनुसार पुरूषांच्या उजव्या आणि महिलांच्या डाव्या भागाला शुभ मानलं जातं. 

Instagram

मनुष्याच्या शरीरातील डावा भाग खासकरून मस्तिष्काच्या रचनात्मकता प्रतीक मानण्यात आला आहे. उजवा भाग हा कर्म प्रधान असतो. आपलं मस्तिष्कही दोन भागांमध्ये विभागलेलं आहे. उजवा भाग कर्म प्रधान आणि डावा भाग कला प्रधान. महिलांच्या पुरूषांच्या उजव्या बाजूला बसण्यामागेही हेच कारण आहे. स्त्रीचा स्वभाव हा सामान्यत: वात्सल्यपूर्ण असतो आणि कोणत्याही कार्यामध्ये रचनात्मकता तेव्हाच येते जेव्हा त्यात स्नेहभाव असतो. या दोन्हींच्या मेळाने कोणतंही कार्य हे सफल होतं. तसंच जोडप्याने पूजेला बसताना योग्य दिशा पाहून मगच सुरूवात करावी. 

प्रेमात त्याने / तिने ‘गृहीत’ धरणं कितपत योग्य

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Mythology