लाईफस्टाईल

मुलीची अथवा मुलाची आई का पाहत नाही लग्न, काय आहे पूर्वपरंपरागत कारण

Dipali Naphade  |  May 2, 2022
why-mothers-do-not-attend-sons-or-daughter-s-marriage-in-marathi

हिंदू धर्मात 4 महत्त्वपूर्ण संस्कार आहेत, ज्यामधील लग्न हा महत्त्वाचा संस्कार आहे. हिंदू धर्मातील हा सर्वाधिक पवित्र रितीरिवाज मानला जातो. लग्नाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. लग्नादरम्यान अनेक परंपरा निभावल्या जातात. ज्याप्रमाणे कन्यादान, लग्नाची सात वचने, गृहप्रवेश इत्यादी. या सर्व परंपरा साकारून लग्न करण्यात येते. लग्न हे केवळ दोन व्यक्तींचं नाही तर दोन कुटुंबाचं मिलन भारतामध्ये समजण्यात येतं. त्यामुळे या लग्नामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रथा दिसून येतात. यामधील एक प्रथा म्हणजे लग्न लागत असताना आई आपल्या मुलीचं अथवा मुलाचं लग्न पाहात नाही अशी प्रथा अनेक ठिकाणी दिसून येते. पण असं नक्की का? याच्यामागे नक्की काय कारण आहे? आई ही सर्वाधिक जवळची व्यक्ती असतानाही ती लग्न का पाहू शकत नाही असे अनेक प्रश्न पडतात. इतका मोठा लग्नासारखा महत्त्वाचा क्षण आई का नाही पाहू शकत, जी एका जीवाला या जगात आणते. हे अत्यंत वाईट आहे असं प्रत्येकाला वाटतं. याबाबत अधिक माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत की ही प्रथा कशी सुरू झाली आणि यामागील कारण काय आहे.

मुघल काळापासून चालू आहे ही परंपरा 

मुघल काळाच्या आधी आई आपल्या मुलीच्या अथवा मुलाच्या लग्नामध्ये जात होत्या असं म्हटलं जातं. पण मुघलांचे देशामध्ये आगमन झाले आणि त्यानंतर या प्रथेला सुरूवात झाली. मुघल शासनादरम्यान जेव्हा महिला वरात आणि लग्नात जायच्या तेव्हा मागच्या मागे अनेक चोरी होणे आणि महिलांना उचलून घेऊन जाणे असे प्रकार होऊ लागले. त्यामुळे त्यानंतर महिलांनी लग्नाच्या वेळी घरात राहणे आणि घर सांभाळणे सुरू केले, जेणेकरून घरावर कोणतेही संकट येऊ नये. तसंच मुलामुलीच्या लग्नामध्ये आईने घरात असणे त्यावेळी अत्यंत महत्त्वाचे मानले जाऊ आणि या प्रथेला सुरूवात झाली. दुसरं कारण म्हणजे घरातील सगळ्याच व्यक्ती लग्नात गेल्यामुळे घर सांभाळण्यासाठी योग्य व्यक्ती होती ती म्हणजे आई. घरात येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई आणि घराची काळजी घेण्यासाठी घरात आई राहू लागली. 

गृहप्रवेशदेखील आहे एक कारण 

लग्न झाल्यानंतर जेव्हा नवी नवरी घरी येते, तेव्हा गृहप्रवेश करण्यात येतो. यादरम्यान नव्या नवरीची आरती करण्यात येते आणि कलश ओलांडून तिने घरात प्रवेश करायचा असतो. या सर्व परंपरा जपण्यासाठी आणि याची तयारी करण्यासाठीही आई घरात थांबत असे. आता शहरांमध्ये लग्नाचे सर्व विधी हे हॉलमध्ये करण्यात येतात. त्यामुळे आईने घरी थांबण्याचे काहीही कारण नाही. त्याचप्रमाणे आपली लाडाची वाढवलेली मुलगी अचानक निघून जाणार या भावनेने आईच्या डोळ्यात येणारे पाणीही थांबवणे शक्य नसते. म्हणून आईने लग्न पाहू नये असं म्हटलं जातं. 

आजही कुठे आहे ही प्रथा प्रचलित 

अनेक शहरांमध्ये जरी आता ही प्रथा प्रचलित नसली तरीही अजूनही काही राज्य आहेत जी ही प्रथा पाळली जाते. त्यापैकी उत्तराखंड, बिहार आणि राजस्थान इथल्या महिला अजूनही आपल्या मुलाच्या लग्नात जात नाही. अर्थात हे सगळीकडे होते असं नाही. आता बऱ्याच ठिकाणी आपल्या मुलामुलीच्या लग्नात हॉलमध्ये आई लग्न पाहायला जाते. तर काही ठिकाणी आई लग्नाच्या हॉलमध्ये असूनही केवळ प्रथा आहे म्हणून लग्न लागण्याच्या मुहूर्ताला वेगळ्या ठिकाणी निघून जाते असं दिसून आलं आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा नसून या गोष्टी आहेत हे तुम्हीही जाणून घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From लाईफस्टाईल