भारतात जवळजवळच सगळीकडेच मकरसंक्रांत मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. एकतर नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच येणारा मकरसंसक्रांत हा पहिला सण आहे. त्यामुळे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा (makar sankranti wishes in marathi) आवर्जून दिल्या जातात. निरनिराळ्या प्रांतानुसार तो साजरा करण्याची पद्धतही बदलत जाते त्यामुळे त्याबद्दल आकर्षणही खूप आहे. मकरसंक्रांत म्हणजे तिळगूळ, काळे कपडे, हलव्याचे दागदागिने, हळदी कुंकू, दानधर्म आणि पतंगस्पर्धा. अनेक ठिकाणी या काळात पतंग उडवण्याची स्पर्धा रंगते यामागे सण आनंद आणि उत्साहात साजरा करण्यासोबतच काही शास्त्रीय कारणे देखील आहेत. जाणून घेऊ या मकरसंक्रांतीला पतंग उडवण्याचे महत्त्व
का उडवतात मकरसंक्रांतीला पतंग –
पतंग हे रंगबिरंगी आणि विविध आकाराचे असतात असतात. असं मानलं जातं की, त्यांचे रंग आणि आकार हे आनंद, उत्साह, स्वातंत्र्य आणि शुभ चिंतनाचे प्रतिक आहेत.नवीन वर्षानिमित्त मकरसंक्रांतीपासून घरात शुभकार्याला सुरूवात केली जाते. ज्यामुळे या शुभकार्यांची सुरूवात पतंगाप्रमाणे शुभ, पवित्र आणि आनंदाची असावी असा त्यामागचा हेतू असतो. यासाठी या काळात घरोघरी पतंग उडवून सण साजरा केला जातो.
नवीन विचार आणि नवीन उमेद –
पतंग उडवताना एकाग्र बुद्धीची गरज असल्यामुळे तुमचे मन शांत होते. मनात असणाऱ्या नकारात्मक विचार अथवा गोंधळाला काही काळापूरतं यातून बाजूला सारलं जातं. त्याचप्रमाणे त्यातुन निर्माण होणाऱ्या उत्साहातून तुमच्या विचारांना नवीन चालना मिळते. पतंगाचे रंग आणि आकार तुम्हाला जगण्याची नवी दिशा देतात. पतंग उडवण्यासाठी खेळली जाणारी स्पर्धा ही प्रेरणादायी ठरते. आपला पतंग जास्तीत जास्त उडवण्याच्या प्रयत्नात नवी उमेद निर्माण होते आणि जरीएखाद्यावेळी तुमचा पतंग कट झाला तरी अपयशाला कसं सामोरं जायचं हे शिकता येतं. थोडक्यात एका साध्या आणि सोप्या खेळातून जीवनाचा उत्तम धडा पुढच्या पिढीला शिकवता येतो.
कुटुंबासोबत वेळ घालवण्याची उत्तम संधी –
अनेक ठिकाणी पतंग संपूर्ण कुटुंबासोबत आनंद आणि उत्साहात उडवले जातात. ज्यामुळे घरात खेळीमेळीचे वातावरण निर्माण होते. घर म्हटलं की थोडेफार गैरसमज अथवा भांडणे असणारच. पण पतंग उडवण्यासाठी एकत्र आल्यामुळे कुटुंबातील क्लेश, भांडणे, चिंता कमी होतात. घरातील महिला आणि पुरूष एकत्र येत हा आनंद साजरा करतात. ज्यामुळे घरातील लहान, थोर, महिला, पुरूष असा भेदभाव काही काळासाठी दूर सरतो. फार पूर्वीपासून हा खेळ खेळला जात असला तरी आजच्या काळात या खेळाची प्रत्येक कुटुंबाला नक्कीच गरज आहे.
आरोग्यासाठी लाभदायक –
मकरसंक्रांतीपासून सुर्य मकर राशीत प्रवेश करतो. ज्यामुळे सुर्याचे उत्तरायण सुरू होते. उत्तरायणाच्या काळात सुर्याची किरणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात. पतंग सुर्यप्रकाशात उडवले जातात. या काळात थंडीही खूप असते. त्यामुळे हा उत्सव ऊन्हात साजरा करण्याची एक वेगळीच मौज असते. ज्यामुळे शरीराला चांगली ऊब मिळते. शिवाय ही सुर्यकिरणे आपसूक शरीराला मिळतात. ज्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डीचा पूरवठा होतो. सुर्यकिरणांमुळे सर्दी, खोकला, ताप असे हिवाळ्यात होणारे इनफेक्शन टाळता येते. पंतग उडवताना सतत शारीरिक हालचाल करावी लागते. ज्यामुळे तुमचा व्यायामही होतो. थंडीच्या दिवसात शरीरराला अशा व्यायामाची गरज असते. शिवाय पंतग उडवण्यासाठी एकाग्र बुद्धीची गरज असते. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रताही वाढते.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
मकर संक्रांत नक्की का साजरी करतात, जाणून घ्या अथपासून इतिपर्यंत
हलव्याच्या गोड दागिन्यांनी करा यंदाची संक्रांत अधिक गोड (Halwyache Dagine For Sankranti In Marathi)
Read More From Festival
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
150+ स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Independence Day Quotes In Marathi
Aaditi Datar