खाणंपिण आणि नाइटलाईफ

जगातील एक महागडा मसाला आहे ‘नैसर्गिक व्हॅनिला’

Trupti Paradkar  |  May 8, 2019
जगातील एक महागडा मसाला आहे ‘नैसर्गिक व्हॅनिला’

आईस्क्रिम, केक आणि अनेक खाद्यपदार्थांमध्ये ‘व्हॅनिला’ फ्लेवर  वापरण्यात येतो. व्हॅनिलाच्या सुंगधामुळे पदार्थांना विशिष्ठ स्वाद येतो. खरंतर व्हॅनिला मसाल्यांचा राजा आहे. कारण केसरप्रमाणेच व्हॅनिलादेखील जगातील एक महागडा मसाल्याचा पदार्थ आहे. व्हॅनिला महाग असण्याची अनेक कारणं आहेत. मात्र व्हॅनिलाच्या लागवडीपासून त्याच्यापासून फ्लेवर निर्माण करेपर्यंतची वेळकाढू प्रक्रियाच यामागचं खरं कारण आहे.

अशी होते व्हॅनिलाची लागवड

ऑर्किड जातीच्या व्हॅनिला वनस्पतीपासून शूद्ध आणि नैसर्गिक व्हॅनिला तयार केला जातो. व्हॅनिलाची वेल  एखाद्या मजबूत झाडाच्या आधारावर वाढते. या वेलींना सावली आणि भरभक्कम आधाराची गरज असते. विशिष्ठ वाढीनंतर या वेलींवर लांब आकाराची पानं आणि व्हॅनिलाची फुलं येतात. या फुलांमधून पुढे व्हॅनिलाच्या लांबट शेंगा निर्माण होतात. या शेंगांना व्हॅनिलाचा सुंगध असतो. यापासूनच व्हॅनिला फ्लेवर तयार केला जातो. व्हॅनिलाची शेंग पिकल्यावर ती सुर्यप्रकाशात वाळवली जाते. ज्यामुळे त्या शेंगेचा सुंगध अधिक वाढतो. व्हॅनिलाची शेंग पिकण्यासाठी कमीत कमी दहा महिन्यांचा कालावधी लागतो. व्हॅनिला शेंगेची किंंमत तिच्या लांबीनुसार ठरते. पंधरा सेंटीमीटर पेक्षा लांब शेंगेला चांगली किंमत मिळू शकते. शेंग काढण्यासाठी ती नाजूक पद्धतीने हाताळावी लागते. कारण व्हॅनिलाची शेंग नाजूक असून ती फाटल्यास त्यातून नुकसान होण्याची अधिक शक्यता असते. शेंगेच्या आत  बियांवर जे आवरण असते ते फ्लेवर तयार करण्यासाठी वापरले जाते. व्हॅनिला फ्लेवर तयार करण्यासाठी शेंगेची तोडणी, शेंग वाळवणे, उबवणे अथवा हवाबंद करणे अशा अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. या प्रकियेसाठी एक ते दोन महिने द्यावे लागतात. अशा नाजूक आणि वेळकाढू प्रक्रियेमुळे व्हॅनिलाची किंमत वाढते. भारतीय चलनात एक किलो नैसर्गिक व्हॅनिला फ्लेवरसाठी तीन ते साडे तीन लाख मोजावे लागतात. थोडक्यात व्हॅनिलाच्या एका शेंगेची किंमत दहा ते पंधरा रूपये असू शकते.

भारतासह या देशात घेतलं जातं व्हॅनिलाचं पिक

जगभरात इंडोनेशिया, मादागास्कर, मेक्सिको, भारत आणि कोमोरे अशा  देशांमध्ये व्हॅनिलाचे उत्पादन घेतले जाते. भारतात केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या प्रातांत व्हॅनिलाचे पिक घेतलं जातं. समुद्र सपाटीपासून 150 मीटर उंचीवरच्या भागात व्हॅनिलाची वाढ चांगली होते. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकणपट्टीवरदेखील व्हॅनिलाचं पिक घेण्याचं संशोधन सुरू आहे. नैसर्गिक व्हॅनिला कमीतकमी चार वर्ष टिकवून ठेवता येऊ शकतो.

कृत्रिम व्हॅनिलामुळे होऊ शकते अॅलर्जी

व्हॅनिलाचा वापर अनेक खाद्यपदार्थांत केला जातो. नैसर्गिक व्हॅनिला महाग असल्यामुळे बऱ्याचदा कृत्रिम व्हॅनिलाचा वापर केला जातो. यासाठी व्हॅनिलाप्रमाणे असणाऱ्या व्हॅनिलीनचा वापर करण्यात येतो. व्हॅनिनील हे डांबरापासून तयार केलं जातं. ज्याला व्हॅनिलासारखाच वास येतो. मात्र या फ्लेवरचा वापर केल्यास माणसाला निरनिराळ्या प्रकारच्या अॅलर्जीचा सामना करावा लागू शकतो.

जाणून घ्या या मसाल्याच्या पदार्थाचा आरोग्यावर काय होतो परिणाम

खाद्यपदार्थांमध्ये व्हॅनिलाचा वापर फार प्राचीन काळापासून केला जात आहे. व्हॅनिलामध्ये अॅंटी इनफ्लेमंटरी आणि अॅंटी बॅक्टेरिअल गुणधर्म आढळतात. त्यामुळे तुम्ही व्हॅनिलाचा त्वचा समस्या दूर करण्यासाठी वापर करू शकता. याशिवाय मळमळ, उलटी, अस्वस्थपणा आणि मासिक पाळीच्या समस्यांवर देखील व्हॅनिला गुणकारी आहे.

जाणून घ्या ओव्याचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Ajwain In Marathi)

जिऱ्याचे हे फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकीत (Benefits Of Cumin Seeds In Marathi)

दालचिनी’चे असेही फायदे असतील हे माहीत नव्हते (Cinnamon Benefits In Marathi)

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ