ADVERTISEMENT
home / आरोग्य
thyroid-side-effects-on-skin-and-hair-and-remedies

थायरॉइडमुळे त्वचा आणि केसांवर होणारे दुष्परिणाम आणि उपाय

आधुनिक जगात थायरॉईड ही एक सामान्य समस्या आहे. हादेखील आता सामान्यतः मधुमेहाप्रमाणे जीवनशैलीचा आजार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. थायरॉईड ग्रंथीच्या बिघाडामुळे त्वचा, केस आणि नखे यांच्या विविध समस्या उद्भवतात. थायरॉईडची पहिली लक्षणे बहुतेकदा त्वचारोगतज्ज्ञांद्वारे दिसून येतात. मानेच्या पुढच्या बाजूला असलेली फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी हृदय गती, रक्तदाब, शरीराचे तापमान आणि एकूणच चयापचय यासारख्या विविध शारीरिक कार्ये संतुलित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. मुलांची योग्य वाढ आणि विकास, प्रजनन प्रणालीचे कार्य आणि मज्जासंस्थेच्या विकासामध्ये थायरॉईड देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पुरुष आणि स्त्रियांना दोन प्रकारच्या थायरॉईड समस्यांचा सामना करावा लागतो: हायपोथायरॉईडीझम (ग्रंथी अकार्यक्षम असताना) आणि हायपरथायरॉईडीझम (ग्रंथी ओव्हरटाइम काम करत असताना). दोन्ही परिस्थिती त्यांचा प्रभाव दाखवण्यास धीम्या गतीन् दाखवितात त्यामुळे अनेकांना ते आढळून येण्यास उशीर होतो. थायरॉईड रोगामुळे त्वचा, केस आणि नखांमध्ये खालील बदल होऊ शकतात. याबाबत अधिक माहिती घेतली आहे डॉ.रिंकी कपूर,त्वचाविकार तज्ज्ञ, द ऍस्थेटीक क्लिनिक्स यांच्याकडून. 

अधिक वाचा – चाळीशीनंतर निरोगी राहण्यासाठी महिलांनी कोणत्या चाचणी करून घ्याव्यात

काय होतात बदल 

• कोरडी आणि खडबडीत त्वचा

• कॅरोटेनेमिया ज्यामुळे तळवे पिवळे दिसतात

ADVERTISEMENT

• वारंवार पुरळ उठणे

• कोरडी त्वचा जी क्रॅक विकसित करते

• पातळ आणि ठिसूळ नखे जे सामान्य दराने पुन्हा वाढत नाहीत.

• फिकट गुलाबी त्वचा जी स्पर्श केल्यास थंड भासते किंवा बाळाच्या त्वचेसारखी ओलसर वाटते

ADVERTISEMENT

• तळव्यांवर भेगा पडणे

• घाम न येणे किंवा खूप घाम येणे

• जखमा बऱ्या होण्यासाठी बराच वेळ लागतो

• चेहरा, ओठ आणि जिभेवर सूज येणे

ADVERTISEMENT

• त्वचा निस्तेज दिसणे

• लालसर आणि बेरंग त्वचा

• त्वचेला खाज सुटणे

• स्पायडर व्हेन्स दिसणे

ADVERTISEMENT

• ठिसूळ आणि खडबडीत केस

• केस लवकर पांढरे होणे

• लक्षात येण्याजोगे केसांची मंद वाढ

• डिफ्यूजन अलोपेशिया जो भुवयांवर देखील लक्षात येऊ शकतो.

ADVERTISEMENT

अधिक वाचा – जाणून घ्या थायरॉईडची लक्षणं आणि घरगुती उपाय (Thyroid Symptoms In Marathi)

केसांवर आणि त्वचेवर होणाऱ्या परिणांवरील उपाय 

हेअर फॉलिकल्स कमी थायरॉईड पातळीसाठी खूप संवेदनशील असतात आणि थायरॉईडच्या पातळीत चढ-उतार झाल्यामुळे केस गळणे वेगवान होते. तुम्ही थायरॉईडचे उपचार केले की त्वचा आणि केसांच्या समस्या देखील वेळेनुसार ठीक होतात. तुम्ही त्वचा आणि केसांच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी काही सोप्या घरगुती उपायांसह मदत करू शकता जसे की –

  • हिरव्या पालेभाज्यांसह लोहाची पातळी वाढवा: हिरव्या पालेभाज्या तुमच्या त्वचेचे आणि केसांचे सामान्य आरोग्य सुधारतील आणि पेशींच्या जलद पुनरुत्पादनास देखील मदत करतील
  • नियमितपणे व्यायाम करा: रोजच्या वर्कआउटसाठी थोडा वेळ द्या. तुमच्या दिनचर्येत कार्डिओ, वजन, योग इत्यादींचा समावेश करा. हे शरीराला हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करेल
  • प्रक्रिया केलेले अन्न, कॅफीन, साखर आणि अल्कोहोलचे सेवन कमी करा ज्यामुळे स्थिती बिघडू नये आणि औषधांना चांगले काम करण्यास मदत होईल.
  • तुमच्या आहारात हळदीचे प्रमाण वाढवा. हळद एक उत्कृष्ट दाहक-विरोधी आहे. त्वचेवर होणारी जळजळ, खाज सुटणे आणि लालसरपणा दूर करण्यासाठी तुम्ही हळदीचे फेसपॅकदेखील वापरू शकता. दूध, चिमूटभर हळद आणि थोडे बेसन यांचे एकत्रित मिश्रण त्वचेवर लावा आणि धुण्यापूर्वी कोरडे होऊ द्या
  • तुम्ही दररोज सुमारे 20 मिनिटे उन्हात बसल्यास ड जीवनसत्वाची कमतरता भासणार नाही. त्वचेतील व्हिटॅमिन डी ची पातळी सुधारण्यासाठी कोवळ्या सूर्यप्रकाशात रहा.
  • तुमच्या त्वचेची आणि केसांची निगा राखण्यात आयुर्वेदाचा समावेश करा. त्रिफळा आणि अश्वगंधा केसांच्या मुळांची ताकद वाढवतात. लेमनग्रास, चंदन तेल यांसारखे तेल नियमित वापरल्यास फायदेशीर ठरेल.
  • तुमच्या केसांना मॉइश्चरायझ करण्यासाठी आणि तुटण्यापासून रोखण्यासाठी केळी, दही आणि ऑलिव्ह ऑइल वापरून पौष्टिक हेअर मास्क बनवा.
  • धुतलेली कडुलिंबाची पाने बारीक करा आणि ही पेस्ट त्वचेवर लावा ज्यामुळे नैसर्गिकरित्या मुरुम आणि डाग दूर होतात.
  • मध आणि चिमूटभर हळद एकत्र करून केळीचा फेस पॅक तयार करा. तो पॅक चेह-याला लावून त्वचेवर वापरा आणि 15 मिनिटांनंतर धुवुन टाका.

थायरॉईड असंतुलनावर उपचार करण्यासाठी तुम्ही तुमची औषधे वेळेवर घ्या आणि डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करा. नियमित काळजी घेतली आणि लक्ष केल्याने तुमची त्वचा आणि केस काही वेळातच तुमच्या आरोग्याच्या प्राथमिक स्थितीत परत येतात. 

अधिक वाचा – अकाली टक्कल पडणे आणि केस गळतीच्या समस्यांमध्ये वाढ, तरूणाईपुढे पेच

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

25 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT