खाणंपिण आणि नाइटलाईफ

आज आहे वर्ल्ड वडापाव डे, जाणून घ्या वडापावची रंजक कहाणी

Leenal Gawade  |  Aug 23, 2021
वडापावला ओळख

वडापाव हा असा खाद्यपदार्थ आहे जो प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कोणताही नाका असो वा कोपरा त्या ठिकाणी वडापावची गाडी दिसणार नाही असे मुळीच होणार आहे. प्रत्येक कोपऱ्याची शानच असते वडापावची गाडी. असा हा वडापाव आपल्याच देशात नाही तर परदेशात सुद्धा हिट झाला आहे. असा या वडापावचा खास दिवस आज साजरा केला जातो. 23 ऑगस्ट हा दिवस वर्ल्ड वडापाव डे (World Vadapav Day) म्हणून साजरा केला जातो. वडापाव हा मिसळपाव, खिचडी यासारखाच जुना पदार्थ आहे. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी वडापाव मिळतात. ग्रॅज्युएट वडापाव, अशोक वडापाव, भाऊचा वडापाव, एलफिन्स्टन वडापाव, पार्लेश्वर वडापाव असे वेगवेगळ्या ठिकाणी मिळणारे वडापाव फारच प्रसिद्ध आहेत. आता या वडापाव मागे नेमकी कोणती कहाणी आहे ते जाणून घेऊया.

वडापावचा शोध असा लागला

वडापावबद्दल खूप जणांनी बरेच गुगल आतापर्यंत केले असेल. पावाला चटणी लावून त्यावर बटाट्याच्या भाजीपासून तळलेला वडा हा त्या पावामध्ये घातला जातो. पण बटाट्याची भाजी करुन ती बेसनाच्या पिठात घोळवून तळण्याची ही संकल्पना फारच वेगळी वाटते यात काही शंका नाही. 

पण नेमका वडापावचा शोध लागला कसा हे जाणून घेऊया. 

मुंबईमध्ये पूर्वी खूप गिरण्या होत्या. गिरण्यांमध्ये मेहनतीचे काम केल्यानंतर कामगारांना खूप जास्त भूक लागायची. अशावेळी त्यांची भूक शमवण्यासाठी त्यांन काय द्यायचे हे कळत नव्हते. अशावेळी त्यांची भूक शमवण्यासाठी उरलेल्या बटाट्याच्या भाजीचा गोळा करुन त्याला बेसनच्या पीठात घोळवण्यात आले. तेलात तळण्यात आले. हा तयार वडा पावात टाकून खाण्यात आला. पाव हा पोट भरण्यासाठी फारच फायद्याचा ठरतो कारण तो पोटात जाऊन फुगतो. असापद्धतीने वडापावचा शोध लागला आणि तो प्रसिद्ध झाला. 

खमंग खुसखुशीत बटाटावडा कृती

आता मिळतात खूप प्रकार

वडापाव हा पूर्वी जरी बेसिक मिळत असला तरी आता वडापावचे वेगवेगळे प्रकार मिळतात. वडापावचे जितके प्रकार मिळतात. त्यामुळे वडापावला आता खूप वेगळे स्वरुप मिळाले आहे. वडापाव हल्ली मसाला वडापाव, चीझ वडापाव,  असा वेगवेगळ्या स्वरुपात मिळू लागला आहे. त्यामुळे हल्ली वडापाव वेगवेगळ्या स्वरुपात चाखायला मिळतो.

असा बनवला जातो वडापाव

वडापाव बनवण्याची कृती एकदम सोपी आहे. वडा बनवण्यासाठी उकडलेले बटाटे लागतात. बटाट्याच्या भाजीला खमंग फोडणी दिली जाते. या भाजीचे गोळे तयार करुन ते बेसनाच्या पिठात घोळवले जातात. त्यानंतर ते छान गोल्डन रंगावर तळले जातात. त्यानंतर पावाला चीर देऊन त्यामध्ये सुकी चटणी, ओली चटणी लावली जाते आणि मग तो वडापाव खाल्ला जातो. 

आता तुम्हालाही वडापाव खाण्याची इच्छा झाली असेल तर लगेच घरी वडापाव बनवा.

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ