मनोरंजन

‘युवा सिंगर्स’मध्ये एम. एच. फोक ठरले नंबर वन

Trupti Paradkar  |  Nov 14, 2019
‘युवा सिंगर्स’मध्ये एम. एच. फोक ठरले नंबर वन

अनेक उत्तमोत्तम मालिकांच्या बरोबरच मराठी वाहिन्यांवर अप्रतिम अशा कथाबाह्य कार्यक्रमांची मेजवानी सुद्धा प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. झी युवावरील ‘युवा सिंगर एक नंबर’ या कार्यक्रमाचा महाअंतीम सोहळा नुकताच पार पडला. संपूर्ण महाराष्ट्रभरातून प्रतिभावंत गायक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या ‘एक नंबर’ स्पर्धेचा शेवट सुद्धा तितकाच धमाकेदार झाला. एम. एच. फोकने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. अनिमेश ठाकूर, पूजा-पल्लवी, दर्शन-दुर्वांकुर, जगदीश चव्हाण, ओंकार कानिटकर या अंतिम फेरीतील स्पर्धकांना मागे टाकत एम. एच. फोकने ‘एक नंबर’ स्थान पटकावत यश मिळवले.

कशी होती स्पर्धेची चुरस

‘युवा सिंगर्स’मध्ये अव्वल क्रमांक पटकवणाऱ्या एम एच ग्रुपने मानचिन्हासह 2 लाख 60 हजार रुपयांचा धनादेशाचे बक्षीस पटकावलं. या स्पर्धेतील सगळ्याच सादरीकरणांमधून प्रेक्षकांची आणि परीक्षकांची मने जिंकण्यात एम. एच. फोकला यश मिळाले होतं. स्पर्धा जिंकण्याच्या शर्यतीत सुरुवातीपासूनच ते प्रमुख दावेदार होते. ओंकार कानिटकर आणि दर्शन-दुर्वांकुर यांनी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले. दोन्ही उपविजेत्यांनाही मानचिन्ह व धनादेश अशी पारितोषिके देण्यात आली. परीक्षक वैभव मांगले आणि सावनी शेंडे यांच्यासह शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची सोहळ्यातील उपस्थिती लक्षणीय ठरली. अष्टपैलू अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्या उत्कृष्ट निवेदनामुळे सोहळ्याची रंगत अधिक वाढली.

एम एच फोक ग्रुपची खासीयत

ऑगस्ट महिन्यात सुरु झालेल्या या कार्यक्रमाने, सर्वच स्तरांवर, आपले वेगळेपण जपत यशाचे शिखर गाठलं होतं. या स्पर्धेच्या लोकप्रियतेचे एक महत्त्वाचे कारण, म्हणजे प्रत्येक स्पर्धकाचे असलेले वेगळेपण होतं. संपूर्ण महाराष्ट्रभरातून, अनेक प्रतिभावंत स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या प्रतिभावान कलाकारांमध्ये ‘एम एच फोक’ हा ग्रुपदेखील होता. या ग्रुपची खासीयत ही की, वेगवेगळ्या शहरामधून ही 8 मंडळी एकत्र आली होती. गावं वेगळी असली तरी, लोकसंगीत हा यांना जोडणारा सामान दुवा होता. लोकसंगीत सर्वांपर्यंत पोचवणे आणि त्याचे जतन करणे, हा ‘एम एच फोक’ या गटाचा मुख्य उद्देश होता. ‘युवा सिंगर’च्या मंचावर या ग्रुपने गण, गवळण, सुफी संगीत, लावणी, कोळीगीत, तमाशा, पोवाडा, गोंधळ, भारूड इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे लोकसंगीत सादर केले. नव्या ढंगात, हे लोकसंगीत तरुणांपर्यंत पोचवण्याचे काम ‘एम एच फोक’ हा ग्रुप करत होता. तरुणांना आपल्या लोकसंगीताविषयी माहिती व्हावी व आवड निर्माण व्हावी अशी त्यांची इच्छा होती. बॉलीवूड आणि पाश्चिमात्य संगीताचा पगडा तरुणाईवर असताना, ‘एम एच फोक’ची लोकसंगीताबद्दलची तळमळ बघून परीक्षक सुद्धा वेळोवेळी खुश झाले होते. त्यांची गुणवत्ता आणि मेहनत परीक्षकांसह प्रेक्षकांना सुद्धा फार महत्त्वाची वाटली ज्यामुळे विजयाची माळ या ग्रुपच्या गळ्यात पडली.

फोटोसौजन्य – इन्टाग्राम

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

कपिल देवचा ‘नटराज शॉट’ लगावताना दिसला रणवीर सिंह, शेअर केला फोटो

आमिर खानचा नवा अवतार पाहिला का, ‘Laal Singh Chaddha’मधील लुक व्हायरल

विकी कौशल आणि कतरिनामध्ये वाढतेय का जवळीक

 

Read More From मनोरंजन