एका विशिष्ट वयात आल्यानंतर आपल्या सर्वांनाच निप्पल्स (nipples) बद्दल काही प्रश्न पडू लागतात. पण हे प्रश्न नक्की कोणाला विचारायचे असाही एक प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हे प्रश्न तसेच मनात राहतात. पण याबाबत नक्कीच आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं असतं. मग अशावेळी नक्की काय करायचं तर त्यासाठी संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेखामध्ये देत आहोत. यापैकी काही माहिती वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे.
1. हे प्रत्येक आकार आणि रंगांचे असतात
GIPHY
तुमच्या बूब्सचा आकार आणि शेप कोणत्याही प्रकारचा असो पण जेव्हा निप्पल्सच्या आकाराबद्दल अथवा रंगाबद्दल बोलायचं असतं तेव्हा तुम्ही एकसारखे कधीच म्हणून शकता नाही. कारण याचा आकार लहान अथवा मोठा असू शकतो. तसंच हे गडद अथवा फिक्या रंगाचं असू शकतं. तसंच गुलाबी अथवा ब्राऊन या कोणत्याही रंगाचे निप्पल्स असतात. प्रत्येकाचे निप्पल्स हे वेगवेगळ्या आकार आणि रंगाचे असतात हे लक्षात ठेवा. तसंच ज्या महिलेचे बूब्स लहान आहेत त्यांचे निप्पल्स मोठे असू शकतात आणि ज्या महिलेचे बूब्स मोठे आहेत त्याचे निप्पल्स लहानही असू शकतात.
सुडौल आणि आकर्षक स्तन मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय
2. काही महिलांचे nipples असतात ओव्हर sensitive …
बऱ्याच महिलांच्या बाबतीत निप्पल्सची संवेदनशीलता ही तिच्या मासिक पाळीच्या सायकलवर अवलंबून असते. मासिक पाळी जसजशी जवळ येते तशी निप्पल्सची संवेदनशीलता वाढते. पण ज्या महिलांचे निप्पल्स अधिक संवेदनशील असतात त्यांचे निप्पल्स कधीही ताठ होतात आणि अशावेळी महिलांना त्या भागावर खाजही येते.
हेही वाचा: स्तन वाढवण्यासाठी काय खावे
3. निप्पल्स stimulation ने सुद्धा होऊ शकतं तुमचं orgasm!
हो हे खरं आहे! तुमचे निप्पल्स तुम्ही stimulate केल्यास, तुम्हाला परमोच्च आनंद मिळवणं सहज सोपं आहे. हा तुमच्या शरीराचा सर्वात जास्त erogenous भाग आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या जोडीदाराबरोबर असाल तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारालाही हे करायला सांगू शकता. ज्या महिलांचे निप्पल्स जास्त संवेदनशील असतात त्यांना सेक्स करताना परमोच्च आनंद लुटता येतो.
4. तुम्ही turned on नसाल तरीही निप्पल्स इरेक्शन होऊ शकतं
GIPHY
सेक्सुअल एक्साइटमेंटच्या कारणामुळे तुमचे निप्पल्स ताठ, पर्की आणि गडद होऊ शकतात. पण कधीकधी तुम्हाला जास्त थंडी वाजत असेल अथवा तुम्ही टाईट टॉप घातला असेल तर तेव्हादेखील असं होऊ शकतं. जेव्हा तुम्ही एखाद्या परिस्थितीत आरामदायी फील करत नसाल तेव्हा तुमच्या निप्पल्सना संवेदनशीलता होऊन अशा प्रकारे इरेक्शन होण्याची शक्यता असते. असं कधी झालं तर त्यासाठी नेहमी तुम्ही पॅडेड ब्रा घालावी.
स्तनांचे असतात वेगवेगळे प्रकार, सर्वांनाच नसते याची माहिती
5. निप्पल्सच्या आजूबाजूला केस असणं ही सामान्य बाब आहे
बऱ्याच महिलांच्या निप्पल्सच्या आजूबाजूला केस असतात. यामध्ये लाज बाळगण्याची काहीच गरज नाही. ही अतिशय सामान्य बाब आहे. तुम्हाला यापासून सुटका हवी असेल तर तुम्ही वॅक्स करा अथवा प्लक करू शकता. पण घाबरून जायची काहीच गरज नाही.
6. दोनापेक्षा अधिक निप्पल्सदेखील असू शकतात
प्रत्येक 17 मुलींच्या मागे एका मुलीला एकापेक्षा अधिक निप्पल्स असतात. बऱ्याचदा महिला याला चामखीळ अथवा त्वचा असं समजतात. पण वास्तविक हे एक्स्ट्रा निप्पल असतं. ही अतिशय नॉर्मल गोष्ट आहे. यामध्ये काहीही abnormal नाही. काही जण सर्जरी करून हे काढून टाकतात. पण हे तसंच शरीरावर राहिलं तरीही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.
7. काही महिलांचे निप्पल्स आतल्या बाजूला असतात.
GIPHY
Inverted nipples अर्थात आतल्या बाजूला असलेले निप्पल्स. हे 100% नॉर्मल आहे. बऱ्याचदा मुलाला दूध पाजताना अशा निप्पल्सचा त्रास होतो. कारण मुलाला निप्पल्स तोंडात घेणं कठीण होतं. पण ही अतिशय सामान्य समस्या आहे.
आकर्षक फिगरसाठी ब्रेस्टसाईझ कमी करण्यासाठी उपाय
8. तुमच्या areola (निप्पल्सच्या आजूबाजूची रंगीत पिगमेंटेड त्वचा) वर जास्त बम्प्स असणं नॉर्मल
हे एक्स्ट्रा निप्पल्स नाहीत. या bumps ना Montgomery ग्लँड्स म्हटलं जातं आणि हे ऑइल secrete करतं जे areola एरियाला व्यवस्थित lubricate करतं. जेव्हा तुम्ही गर्भवती असता किंवा ब्रेस्टफिड करता तेव्हा हे निप्पल्स थोडे मोठे होतात आणि त्यांचा आकारही बदलतो.
9. तुमच्या निप्पल्सवर लहानसे openings असतात
निप्पल्सचं महत्त्वाचं काम म्हणजे लहान मुलाला दूध पाजणं आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा lactate (pregnancy दरम्यान दूध प्रोड्यूस करणं) सुरु करता, तेव्हा हे openings (तुम्हाला नेहमी दिसू शकत नाहीत) कामी येतात.
10. कधीतरी तुमच्या निप्पल्समधून फ्लुइड लीक होऊ शकतं
GIPHY
तुम्ही lactate करत नसाल तरीही असं होऊ शकतं. छाती जर जोरात दाबली गेली तर असं होणं ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. कोणत्याही कारणाशिवाय असं बऱ्याचदा होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही यावर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य आहे.
11. गरोदरपणात तुमचे निप्पल्स अधिक मोठे आणि गडद होऊ शकतात
गरोदरपणात तुमचे निप्पल्स अधिक मोठे आणि गडद होऊ शकतात तसंच दुसरे बदलही होतात. तुमच्या areola चे बम्प्स जास्त मोठे आणि visible होतात. गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात तुमच्या निप्पल्समधून एक जाडा पिवळा द्रव पदार्थ येतो. (काही महिलांच्या निप्पल्समधून येतोच असं नाही)