साठावं वय प्रत्येकासाठी खास असतं. कारण या वयात बऱ्याचजणांनी निवृत्ती स्वीकारलेली असते. थोडक्यात कामाचा ताणतणाव आणि जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात. अनेकांच्या मुलांचे शिक्षण, लग्न अशा कौटुंबिक जबाबदाऱ्याही पूर्ण झालेल्या असतात. निवृत्तीनंतर मस्त आराम करत उर्वरित आयुष्य आनंदाने घालवण्याचा हा काळ असतो. या काळात नातवंडासोबत खेळण्याची, जोडीदाराला पूर्ण वेळ देण्याची, जगभ्रमंती करण्याची, आध्यात्मिक मार्ग अवलंबण्याची इच्छा मनात असते. आपल्या घरात आईवडील, नातेवाईक, मित्रमंडळी साठीच्या टप्यावर आलेले असतात. अशा जीवाभावाच्या लोकांना त्यांच्या आयुष्यातील हा टप्पा अधिक सुखाचा जावा यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. तेव्हा साठीनिमित्त जीवलगांना द्या या साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – 60th Birthday Wishes in Marathi, 60th Birthday Quotes in Marathi आणि खास करा त्यांचा हा स्पेशल दिवस… तसंच वाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाला पाठवण्यासाठी भन्नाट विनोद.
Table of Contents
- साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – 60th Birthday Wishes in Marathi
- साठाव्या वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा – Funny Happy 60th Birthday Wishes
- 60 व्या वाढदिवसाच्या भावनिक शुभेच्छा – Emotional 60th Birthday Quotes in Marathi
- बाबांसाठी साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – 60th Birthday Wishes For Dad in Marathi
- आईला साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – 60th Birthday Wishes for Mom in Marathi
साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – 60th Birthday Wishes in Marathi
साठाव्या वाढदिवसासाठी असंही म्हणतात. तुमच्या आयुष्यातील अनेक लोकांना साठीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी बेस्ट आहेत या साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (60 Years Birthday Wishes in Marathi).
1.सुख समृद्धी, समाधान, दीर्घायुष्य आणि आरोग्य तुम्हाला मिळो हिच परमेश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
2. साठाव्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन…तुमच्या आयुष्यातील प्रत्येकक्षण असावा सजलेला, प्रेमाची गुंफण संगतीला अन नात्यांचा मेळावा.
3. नवा गंध, नवा आनंद, निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, नव्या सुखांनी आणि नवचैतन्याने आनंद हा शतगुणित व्हावा… साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
4.या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, आजचा दिवस आपल्यासाठी अनमोल असावा हिच साठीनिमित्त शुभेच्छा!
5. तुमच्या कामाचा उत्साह आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची जाणिव अजिबात करू देत नाही. तुम्हाला साठीनिमित्त खूप खूप शुभेच्छा !
6. व्हावं तुम्ही शतायूषी, व्हावं तुम्ही दीर्घायुषी, माझी एकच इच्छा तुमच्या भावी आयुष्यासाठी… साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
7. अगणित माणसे या जगात येतात… मात्र तुमच्यासारखी बापमाणसं क्वचितच मिळतात. साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
8. आयुष्यात सुखदुःखाचा वारा झेलत तुम्ही साठी पार केलीत… आता पुढील आयुष्य असंच जोमाने साजरं करा… साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
9 तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो, सुर्यापेक्षा तेजस्वी असो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना
10. नवे क्षितीज, नवे पहाट, फुलांनी सजावी तुझ्या आयुष्याची पहाट… साठीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
साठाव्या वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा – Funny Happy 60th Birthday Wishes
साठाव्या वाढदिवसानिमित्त (60th birthday wishes in marathi) मित्रमंडळी आणि नातेवाईंकाना देण्यासाठी काही मजेशीर आण विनोदी शुभेच्छा संदेश
1. माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या अतिसभ्य मित्राला साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
2. तालुक्याची आण बाण शान, शेकडो मित्रांच्या दिलाचे प्राण, लोकांच्या ह्रदयावरच नाही तर मनावरही राज्य गाजवणाऱ्या आमच्या प्रिय मित्राला साठीनिमित्त खूप खूप शुभेच्छा
3. एक कंटेनर, एक टमटम, पाच छोटा हत्ती, दहा ट्रक, पंधरा ट्रॅक्टर, वीस टेम्पो भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा… आता साठीची पार्टीपण अशीच ट्रकभरून हवी
4. सिनिअर सिटीझनच्या ग्रुपमध्ये फेव्हरेट, चेहऱ्याने सभ्य पण अंगात आजही खूप किडे असणाऱ्या आमच्या प्रिय मित्राला साठीच्या हार्दिक शुभेच्छा
5. ज्याला खायला आवडतात चहाच बुडवून बिस्किट गुड्डे, त्याला आमच्याकडून मनापासून हॅप्पी बर्थ डे
6. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, लहान मुलांचा लाडका अशा आमच्या जिगरी दोस्ताला साठीनिमित्त मनापासून शुभेच्छा
7. दहा फोन केल्याशिवाय वॉकला खाली न येणाऱ्या आमच्या वेळकाढू मित्राला साठीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
8. आली लहर आणि केला कहर, दादांच्या वाढदिवसाला सगळं गाव हजर… दादा तुम्हाला साठीच्या मनापासून शुभेच्छा
9. मी तुमच्याकडून पार्टी घेण्याची अपेक्षा ठेवू शकतो, पण माझ्याकडून भेटवस्तूची अपेक्षा ठेवू नका… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
10. आमच्या आयुष्यातील बापमाणसाला साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
11.या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, आजचा दिवस आपल्यासाठी अनमोल असावा हिच साठीनिमित्त शुभेच्छा!
12. तुमच्या कामाचा उत्साह आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची जाणिव अजिबात करू देत नाही. तुम्हाला साठीनिमित्त खूप खूप शुभेच्छा !
13. व्हावं तुम्ही शतायूषी, व्हावं तुम्ही दीर्घायुषी, माझी एकच इच्छा तुमच्या भावी आयुष्यासाठी… साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
60 व्या वाढदिवसाच्या भावनिक शुभेच्छा – Emotional 60th Birthday Quotes in Marathi
साठाव्या वयात माणसं खूप परिपक्व झालेली असतात, त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी असते. अशा मोठ्या लोकांसाठी साठीनिमित्त हे काही भावनिक शुभेच्छा संदेश
1. आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच परमेश्वरचरणी प्रार्थना…साठीनिमित्त शुभेच्छा
2. तुझ्या आयुष्यातील हे सुखदायी क्षण तुला नेहमी आनंददायी ठेवोत, साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
3. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुमच्यापासून सुरू होते. माझ्या आयुष्यातील या अढळस्थानाला साठीनिमित्त खूप खूप शुभेच्छा
4. नाते आपले प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे, वाढदिवशी तुझ्या मी तुला आनंदाच्या पावसाच भिजवावे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
5. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला कसे सामोरे जायचे हे तुम्हीच मला शिकवले… तुम्हाला आज साठाव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा
6. आयुष्यात माझ्या सावलीप्रमाणे साथ दिली… कसलीस कमतरता भासू दिली नाही अशा माझ्या लाडक्या भावाला साठीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
7. तुझ्यासारखी मोठी बहीण असणं ही खरंच देवाची कृपा आहे… तुला साठाव्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा ताई
8. शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात नाहीतर अनंत जन्म उपयोगी पडतात. म्हणूनच तुमच्या साठीनिमित्त मनापासून शुभेच्छा
9. आयुष्याच्या वेड्या वाकड्या वाटेवर मला गंभीर साथ देणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
10. माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, अशा माझ्या दिलदार पतीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बाबांसाठी साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – 60th Birthday Wishes For Dad in Marathi
बाबा प्रत्येकासाठी खास असतात, मुलींचे तर बाबांवर विशेष प्रेम असते, अशा तुमच्या लाडक्या बाबांसाठी साठाव्या वाढदिवसाठी खास शुभेच्छा संदेश यासोबतच वाचा 150+ Birthday Wishes For Father In Marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
1. तुम्ही माझा अभिमान आहात, तुम्ही माझा स्वाभिमान आहात, कधी जमीन तर कधी आभाळ आहात, माझ्या प्रत्येक यशाचे रहस्य आहात. बाबा, तुम्हाला साठाव्या वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा
2. बाबा, तुम्ही चंद्रताऱ्यांप्रमाणे दीर्घायुषी व्हा, चुकलो आम्ही कधी वाट तर दिव्यासारखे प्रकाशमान व्हा… साठाव्या वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
3. माझ्या प्रिय बाबांना साठाव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा
4. प्रिय बाबा तुम्हाला साठीनिमित्त आरोग्य, सुख, समाधान, आनंद, यश भरभरून मिळो हिच परमेश्वरचरणी प्रार्थना
5. आजच्या दिवशीचा आनंद तुमच्या जीवनात लाखोवेळा येवो, शतायुषी व्हावं तुम्ही हिच प्रार्थना बाबा… साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6. नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर वडिलांच्या आर्शीवादाचा हात असतो, अशा माझ्या ईश्वराला साठीनिमित्त शुभेच्छा
7. आमचं आयुष्य सुगंधित व्हावं म्हणून आयुष्यभर उन्हातान्हात झिजला अशा आमच्या बाबारूपी चंदनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
8. बाबा कितीही साधा असला तरी तो त्याच्या मुलीसाठी हिरोच असतो. अशा माझ्या हिरोला साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
9. स्वतःच्या गरजा कमी करून आम्हाला लहानाचे मोठं करणाऱ्या आमच्या बाबांना साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
10. हा जन्म पुन्हा मिळणार नाही, असंख्य लोक पुन्हा भेटतील पण पुन्हा हाच बाबा मिळणार नाही. साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा!
11. अगणित माणसे या जगात येतात… मात्र तुमच्यासारखी बापमाणसं क्वचितच मिळतात. साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
12. आयुष्यात सुखदुःखाचा वारा झेलत तुम्ही साठी पार केलीत… आता पुढील आयुष्य असंच जोमाने साजरं करा… साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आईला साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – 60th Birthday Wishes for Mom in Marathi
आई सारखे दैवत साऱ्या जगतात शोधून सापडणार नाही. अशा तुमच्या प्रेमळ आईला साठाव्या वाढदिवशी द्या या शुभेच्छा संदेश… यासोबतच वाचा आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (100+ Birthday Wishes For Mother In Marathi).
1. आमच्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या आमच्या प्रेमळ आईस साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
2. असावी काहीतरी पूर्वपुण्याई म्हणून तुझ्या पोटी जन्म घेतला आई… पुढच्या जन्मीही तूच हवी मला माझी प्रिय माई… साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
3. स्वतःला विसरून घरातील सर्वांसाठी सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला साठाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
4. जगासाठी तू एक व्यक्ती आहेस पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहेस. साठीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
5. आई तुला साठाव्या वाढदिवसानिमित्त चांगले आरोग्य, सुख, समाधान, आनंद आणि दीर्घायुष्य मिळो हिच प्रार्थना
6. आई म्हणजे मायेचा पाझर, आई म्हणजे आनंदाचा सागर, आई म्हणजे घराचे दार, आई म्हणजे जीवनाचा आधार… आई तुला साठाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
7. अनेकांचे चेहरे आणि स्वभाव बदलताना पाहिलं, आईमात्र सर्वांवर फक्त प्रेम करतानाच पाहिलं… आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
8. जिथे सर्व गुन्हे माफ होतात ते एकमेव न्यायालय म्हणजे आई… आई तुला साठाव्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा
9. जिच्याशिवाय मला घरातील साधी छोटी वस्तूसुद्धा सापडत नाही आणि जी माझ्या जन्मभराचा पसारा आवरते त्या माझ्या प्रेमळ आईला साठीनिमित्त शुभेच्छा
10. ईश्वर प्रत्येक ठिकाणी माझ्या मदतीला येऊ शकत नाही म्हणून त्याने तुझ्यासारखी प्रेमळ आई मला दिली… साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
11. तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो, सुर्यापेक्षा तेजस्वी असो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना
12. नवे क्षितीज, नवे पहाट, फुलांनी सजावी तुझ्या आयुष्याची पहाट… साठीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Conclusion – तुमच्या प्रियजनांच्या साठीनिमित्त आम्ही शेअर केलेल्या साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, 60th birthday wishes in marathi, 60 years birthday wishes in marathi, 60th birthday wishes for dad in marathi, 60th birthday wishes for mom in marathi, 60th birthday quotes in marathi कशा वाटल्या हे आम्हाला जरूर कळवा.