आपल्यापैकी बऱ्याच जणांना smooth sexy नितंब (butt) हवे असतात. त्यासाठी बऱ्याच जणी रोज लंजेस करतात. परिपूर्ण नितंबांसाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. पण तुमची बॅकसाईड अधिक आकर्षक करण्यासाठी केवळ व्यायाम करणं पुरेसं नाही. स्मूदर, अॅक्ने फ्री बम्स मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे काही विशिष्ट टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत. या स्किन केअर, मेकअप आणि डाएट ट्रिक्सचा उपयोग करून तुम्ही तुमच्या नितंबांना स्टनिंग लुक देऊ शकता. या ट्रिक्सचा नियमित उपयोग केल्यास, तुम्हाला लवकरच स्टनिंग नितंब मिळतील.
1. एक्सफोलिएटिंग स्क्रब
Shutterstock
आठवड्यातून दोन वेळा तुम्ही बॉडी स्क्रबचा वापर करून तुमच्या नितंबांना अॅक्ने आणि बंद पोअर्सपासून सुरक्षित ठेऊ शकता. तुम्हाला जर एक्सफोलिएटिंग दरम्यान नीट काळजी घेता आली नाही तर आता हे करायची गरज आहे समजा. यासाठी तुम्ही सॅलिसायकलिक अॅसिडयुक्त लॉरियल पॅरिस गो 360 डिग्री डीप क्लिंन्झिंग एक्सफोलिएटिंग स्क्रबचा वापर करा. तुमच्या नितंबावर अॅक्ने झाले असल्यास, याचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही क्लिनडॅक ए सारख्या टॉपिकल ऑइन्टमेंटचा वापरही करू शकता.
2. घाम आल्यावर करा आंघोळ
Shutterstock
व्यायाम केल्यानंतर आणि पूर्ण दिवस प्रदूषणयुक्त वातावरणात फिरल्यानंतरही तुमच्या कपड्यांमध्ये साचलेला घाम हा तुमच्या अंगावर तसाच राहातो. हे कपडे तसेच अंगावर ठेवणं ही वाईट सवय आहे. त्या घामाच्या कपड्यांमुळे बॅक्टेरिया निर्माण होतात. त्यामुळे लवकरात लवकर घरी आल्यावर तुम्ही आंघोळ करायला हवी आणि लुफाच्या सहाय्याने तुम्ही तुमचे घाम आलेले नितंब स्क्रब करायला हवेत.
3. सेल्यूलाईट नष्ट करा
Shutterstock
तुम्ही तुमच्या नितंबाची ब्रशिंग सुरु करा. त्यामुळे तुम्ही तुमच्या मांडीवरील सेल्युलाईटची समस्या दूर करण्यास सुरुवात करता. नैसर्गिक फायबरने बनलेल्या ब्रिसल्सच्या ब्रशचा वापर करा आणि कोरड्या त्वचेवर सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रब करा. पण एक लक्षात ठेवा ही प्रक्रिया तुम्ही आंघोळ करण्यापूर्वी करा. बॉडी ब्रशिंग हे कोरड्या त्वचेपासून सुटका तर देतंच पण त्वचा अधिक टाईट करतं. सेल रेनेवल दुरुस्त करतं आणि त्याच्याजागी ब्लड सर्क्युलेशनही वाढवतं.
4. केस काढून टाका
तुमच्या नितंबावर असलेले केस काढून टाका. ब्राझिलियन वॅक्स तुमच्या नितंबावरील बारीक केस दूर करतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही पार्लरमध्ये जाल तेव्हा या गोष्टीकडेही लक्ष द्या. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही स्वत:देखील नितंबाच्या खालच्या भागाची आंघोळ करताना करू शकता. शेव्हिंग तुम्हाला चांगला पर्याय वाटत असला तरीही हा योग्य निर्णय नाही हे लक्षात ठेवा. कारण चुकून तो भाग रेजरच्या धारेने कापला जाऊ शकतो. तुम्हाला नितंब अधिक आकर्षक दिसायला हवे असतील तर त्यावर केस अजिबात ठेऊ नका.
Vagina च्या बाबतीत या 10 गोष्टी प्रत्येक महिलेला माहिती हव्यातच!
5. मॉईश्चराईज नक्की करा
Shutterstock
आपल्या त्वचेच्या अन्य भागाप्रमाणेच तुमची बूटीदेखील स्मूथ राहण्यासाठी माईस्चराईज करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही ऑईल फ्री क्रिमचा वापर करा. कारण कोणत्याही प्रकारे तुमच्या नितंबावर अॅक्ने यावेत असं तुम्हाला नक्कीच वाटणार नाही. त्यामुळे अशा तऱ्हेच्या क्रिमचा वापर करा. तसंच बम्स स्मूथ करण्यासाठी बेबी लोशनसारखा दुसरा चांगला पर्याय नाही.
6. गोलाकार बम्ससाठी मेकअप
स्ट्रेच मार्क्स आणि सॅगिंग लपवण्यासाठी थोडासा मेकअप गरजेचा आहे. तुम्ही जर एखाद्या बीच व्हेकेशनवर जाणार असाल तर मेकअप तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढवतो. त्यासाठी तुम्हाला काही ब्रॉन्झर अथवा सेल्फ टॅनिंग स्प्रे ची गरज आहे. याशिवाय तुम्ही लोशनही लावू शकता जेणेकरून तुमचे बम्स गोलाकार दिसतील. सर्वात पहिले स्ट्रेच मार्क्स, बम्प्स आणि ब्राजेस लपवण्यासाठी तुमच्या बम्सवर बेस लावा. त्यानंतर सेल्फ टॅनर लावा. बट कॉन्टूरिंगसाठी क्लॅरिन्स लिक्विड ब्रॉन्झ सेल्फ टॅनिंग हा पर्याय चांगला आहे.
शस्त्रक्रियेद्वारे (बेरिअॅट्रिक सर्जरी) वजन कमी झाल्यानंतर अशी घ्या काळजी
7. बूटी फूड्स पण घ्या
Shutterstock
काही असे पदार्थ आहेत जे तुमच्या नितंबांना आकर्षक दिसण्यासाठी मदत करतात. त्यामध्ये नट्स, पीनट बटर, ब्राऊन राईस, कॉटेज चीज अथवा पनीर आणि जास्त प्रमाणात मीट अथवा प्रोटीनचा समावेश आहे. तुम्हाला नेहमी गोलाकार नितंब हवे असतील तर तुमच्या डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश करून घेणं गरजेचं आहे. तर तुमची समस्या मोठ्या नितंबाची असेल हे पदार्थ खाणं टाळा.
8. मासिक पाळी समस्या
मासिक पाळीदरम्यान तुम्ही व्यवस्थित स्वच्छता राखणं अत्यंत गरजेचं आहे. पॅडमुळे तुमच्या खालच्या नाजूक त्वचेवर रॅश येत असतील तर तुम्ही टॅम्पूनचा वापर करणं योग्य आहे. मासिक पाळीच्या वेळी तुम्ही सुरक्षित आणि समस्यामुक्त राहण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. तसंच यामुळे तुमच्या नितंबाचा आकार व्यवस्थित राहण्यास मदत होते.
9. पँटीजचा वापर
Shutterstock
तुम्ही पँटीजचा वापर करताना लक्ष द्यायला हवं. तुम्ही वापरत असलेल्या अंडरवेअर या मऊ आणि कम्फर्टेबल असणं आवश्यक आहे. कॉटन अंडरवेअर या नेहमीच चांगल्या. काही जणींना ब्लड सर्क्युलेशन आणि प्रेशर मार्क्स ठेवण्यासाठी सीमलेस पँटीजचा वापर करावा लागतो. थॉन्ग आणि जी स्ट्रींग वापरण्याची कल्पनाही योग्य आहे. यामुळे तुमच्या नितंबांचा आकार योग्य राखण्यास मदत होते.