ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
आषाढ तळणे

आषाढ तळणे म्हणजे काय, काय आहे यामागील कारण

आजपासून म्हणजेच 30 जूनपासून आषाढ महिना सुरु होत आहे. प्रत्येक महिन्याची काही ना काही खासियत असतेच.बदलत्या महिन्यानुसार आहार, विहार यासगळ्यामध्ये बदल होत असतो. आषाढ महिन्याची माहिती घेताना आपण आषाढ महिन्यातील सण आणि नववधूंसाठी आखाड याची माहिती घेतली. आता आपण आषाढ मधील आखाड तळणे याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. आषाढ तळला का? किंवा आम्ही आखाड तळणार आहोत? असे या दिवसात तुम्ही नक्कीच ऐकले असेल. हा आखाड तळणे किंवा आषाढ तळणे म्हणजे काय? ते आज आपण जाणून घेणार आहोत. याशिवाय श्रावण महिन्याची माहिती ही देखील तुम्हाला असायला हवी.

आषाढ तळणे म्हणजे काय?

आषाढ महिना सुरु झाला की, या दिवसात जास्तीज जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात. मे महिन्यात बनवलेल्या पापड आणि कुरड्या तळून अगदी आवर्जून खाल्ले जातात. आषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकता. आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे असे म्हणतात. खूप जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे. खास या दिवशी जावयाला घरी बोलावून चमचमीत पदार्थांचा मान दिला जातो. तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ दिले जातात. तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ दिले जातात.

आषाढ महिन्यात म्हणून खाल्ले जातात तेलकट पदार्थ

आषाढ महिन्यात आषाढ तळण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचेही खास कारण आहे. आपले सण हे वातावरण आणि आरोग्य याची काळजी घेणारे असते. त्यामुळे याचे कारणही जाणून घेणे गरजेचे आहे. 

  1. आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते. कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते. शरीराला दूषित पाणी मिळाले तर आरोग्य बिघडते. त्यामुळे शरीराला वंगण मिळावे यासाठीही तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते.
  2. तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करत असतात. त्यामुळेच या काळात पदार्थ तळले जातात. 
  3. पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा होते. उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड, लोणची अशी बनवलेली असतात. त्यामुळे बाहेर न खाता घरचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ केले जातात. 
  4. आषाढ महिन्यात चयापचय क्रिया ही देखील चांगली असते. आपण खाल्ल्ले पदार्थ चांगले पचतात. त्यामुळेही असे पदार्थ खाल्ले जातात. 
  5. पूर्वीच्या काळी वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे. तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठी अशाप्रकारे पदार्थ तळले जायचे. 

एकूणच पूर्वीचा काळ आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेत आषाढ महिन्यात आषाढ तळला जातो. 

ADVERTISEMENT
29 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT