ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
nag-panchami-2022-Information-about-the-day-of-nag-panchami-know-the-correct-vidhi-of-puja-in-marathi

अशी करावी नागपंचमीची विधीवत पूजा, इत्यंभूत माहिती

नागपंचमी हिंदू संस्कृतीचा सर्वात महत्त्वपूर्ण दिवस असतो. श्रावण महिन्याचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. तर श्रावणातील विविध सणांमध्ये नागपंचमी हा सर्वात पहिला सण असतो. नागपंचमीची माहिती तर सर्वांनाच असते. नागपंचमी का साजरी केली जाते अथवा नागदेवतेला का पूजले जाते हे याची माहिती आपणा सर्वांनाच असते. पण नागपंचमीची विधीवत पूजा (Nag Panchami Pooja) कशी केली जाते याबाबत अजूनही बऱ्याच जणांना माहिती नाही. श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी करण्यात येते. ज्योतिषाच्या मान्यतेनुसार ही पूजा करण्यात येते. तर 2022 मध्ये 2 ऑगस्ट रोजी नागपंचमी (Nag Panchami 2022) साजरी होणार आहे. कशा पद्धतीने करावी नागदेवतेची पूजा घ्या जाणून. 

नागपंचमीच्या दिवशी का करण्यात येते नागाची पूजा 

नाग हा शेतकऱ्यांचा मित्र समजण्यात येतो आणि शेतातील उंदरांना नाश नाग करतो जेणेकरून शेती वाचते. त्यामुळे नागाची पूजा शेतकरी मित्र करतो. या दिवशी नांगरणी करण्यात येत नाही. ज्या बिळात नाग राहतात तिथे जाऊन पूजा करण्यात येते. 

तर ज्योतिषियदृष्ट्या नागपंचमीची पूजा करणे शुभ मानले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे त्यांच्यासाठी हे उत्तम ठरते. कालसर्प दोषापासून मुक्तीसाठी ही पूजा चांगली ठरते असा समज आहे. त्याचसह यादिवशी गरजवंतांना मदत करणेही लाभदायक मानले जाते. 

गौरी आवाहन विधी

ADVERTISEMENT

नागपंचमीचा पूजा विधी 

नागपंचमीची पूजा करण्याचा एक पारंपरिक विधी आहे. अशी विधीवत पूजा कशी करायची हे तुम्हाला या लेखातून आम्ही सांगत आहोत – 

  • देवघरात गोमुत्र शिंपडून घ्या आणि त्यानंतर गंगाजल अथवा पाण्याने देवघर व्यवस्थित स्वच्छ करून घ्या
  • त्यानंतर एका लाकडी चौकोनी पाटावर एक स्वच्छ कपडा पसरवा 
  • त्यावर नागदेवतेची मूर्ती स्थापन करा 
  • यानंतर तेल अथवा तुपाचा एक दिवा लावा आणि नागाच्या जवळ ठेवा 
  • असे केल्यानंतर फूल वाहून नागदेवतेकडे तुमच्या मनातील संकल्प करा
  • यानंतर नागदेवतेची मूर्ती अथवा फोटोवर पाणी आणि दूध शिंपडा आणि त्यावर हळद, चंदन, कुंकू, अक्षत, फूल वाहा. त्यानंतर धूप, दीप आणि नेवैद्य तुम्ही नागदेवतेला अर्पण करून पूजा संपन्न करा 
  • हे सर्व केल्यानंतर डोळे बंद करा आणि भगवान शिवशंकराची ध्यानधारणा करा आणि आशीर्वाद मागा. तसंच पूजा झाल्यानंतर क्षमायाचना करावी 

नागपंचमी पूजेचे लाभ

अनेक पौराणिक कथांमध्ये नागपंचमीचा उल्लेख आढळतो. किंवदंतीनुसार, जे कोणी नागदेवतेची पूजा करतात, त्यांना राहू आणि केतूसारख्या पापग्रहांपासून सुटका मिळते आणि कोणत्याही दुर्भाग्यापासून लांब राहता येते. ज्योतिषशास्त्रानुसार, कालसर्पदोष पीडित कोणत्याही व्यक्तीला यामुळे सुटका मिळते. तसंच नागपंचमीच्या दिवशी कालसर्प योगाचे अनुष्ठानही करण्यात येते. ज्यामुळे सापाच्या भीतीपासून मुक्तता मिळते. तसंच घरावर कालसर्प दोष राहू नये यासाठीही ही पूजा करण्यात येते असा समज आहे. 

टीप – आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. मात्र नागपंचमी हा एक हिंदू सण आहे आणि तो कशा पद्धतीने साजरा करण्यात येतो याची इत्यंभूत माहिती देण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे. तसंच नागपंचमीच्या दिवशी नागाला दूध पाजणे अथवा नागाबाबत कोणत्याही अफवा पसरविण्याबाबतचा आमचा कोणताही हेतू नाही. नागपंचमीची पूजा करणे अथवा न करणे हा सर्वस्वी भावनिक आणि वैयक्तिक प्रश्न आहे. 

29 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT