ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
अनुराग कश्यपविरोधात या अभिनेत्रीची अखेर पोलिसात तक्रार, बलात्काराचा आरोप

अनुराग कश्यपविरोधात या अभिनेत्रीची अखेर पोलिसात तक्रार, बलात्काराचा आरोप

राजकारणातच नाही तर आता बॉलिवूडमध्येही एकमेकांवर आरोप करण्याचे सत्र पुन्हा एकदा सुरु झाले आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी तनुश्री दत्ताने #MeTooचे वादळ भारतात आणले. या मोहिमेमुळे अनेक बडया कलाकारांवर,दिग्दर्शकांवर लैंगिक शोषणाचे आरोप लागले. हा मुद्दा थंड होत असताना आता पुन्हा हा विषय समोर आला आहे तो अनुराग कश्यपमुळे. दिग्दर्शक, निर्माता अनुराग कश्यप याच्यावर अभिनेत्री पायल घोष हिने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. तिने अनुरागविरोधात पोलिसांत रितसर तक्रारही केली आहे.त्यामुळे आता अनुराग कश्यप याच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकीकडे अनुरागविरोधात बोलणारा आणि त्याला समर्थन करणारा गट बॉलिवूडमध्ये दिसू लागला आहे. ज्याला सर्वसामान्य लोकांनी चांगलेच फटकारले आहे.

देशद्रोही म्हणणाऱ्यांवर चिडली राखी सावंत म्हणाली…

अनुरागने केले लैंगिक शौषण

बुधवारी संध्याकाळी अचानक सगळ्या टीव्ही चॅनल्सवर  अनुरागबद्दलच्या या आरोपांची बातमी सुरु झाली. अनुराग कश्यपने एका अभिनेत्रीवर लैंगिक शोषण केले हे कळल्यानंतर अनेकांच्या डोक्याचा पारा चढला. हल्ली अनेक गोष्टींबद्दल ट्विटरच्या माध्यमातून अनुराग कायमच काही जणांना टार्गेट करत असतो. पण अभिनेत्री पायल घोषने त्याच्यावर नुसता आरोप न करता थेट पोलिस स्टेशन गाठले. साधारण 7 वर्षांपूर्वी पायल सोबत अनुरागने गैरवर्तन केले होते. त्याबद्दलच तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तिने 2013 साली झालेल्या या प्रकाराची रितसर पोलीस तक्रार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पायलने  अनुराग कश्यप याने यारी रोड येथील एका जागी तिच्यावर बलात्कार केला.या प्रकरणाबद्दल अधिक कोणतेही तपशील अद्याप नाहीत.

ड्रग्ज संदर्भात दीपिका पदुकोण निशाण्यावर, वायरल झाले चॅट

ADVERTISEMENT

अनुरागने केले आरोपांचे खंडन

अनुरागनने या आरोपांचे खंडन केले आहे. त्याने सांगितले की, या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असे अनुरागने सांगितले आहे. पण आता चौकशीसाठी अनुरागला पोलिसांत हजर राहावे लागणार आहे. 7 वर्षांपूर्वी झालेल्या या प्रकरणाबाबत त्याच्याकडे विचारणा केली जाणार आहे. 

तापसी पन्नूवर भडकली सोना महोपात्रा

पायल घोषने प्रत्यक्ष बुधवारी तक्रार केली असली तरी देखील तिने काही दिवसांपूर्वीच या सगळ्यावर बोलायला घेतले होते. पण काल प्रत्यक्षात जाऊन तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. ज्यावेळी तिने पहिल्यांदा अनुरागवर आरोप लावले होते. त्यावेळी अनेक अभिनेत्री त्याच्या समर्थनार्थ उभ्या राहिल्या होत्या. यामध्ये तापसी पन्नू, हुमा कुरेशी आणि त्याची पूर्व पत्नी हिचाही समावश होता. त्यांनी अनुराग असे करु शकत नाही. असा दावा करत पायल घोषचे आरोप फेटाळून लावले होते. पण आता या सगळ्यांना सोना महोपात्राने फटकारले आहे. तिने #MeTooचा दाखला देत तिने या प्रकरणाचा छडा लावणे फार गरजेचे आहे. ज्या महिलेवर हे घडले आहे तिला न्याय मिळणे गरजेचे आहे. तिची बाजू काय आहे ते जाणून घेऊन खऱ्या खोट्याचा निष्कर्ष काढायला हवा. शिवाय तिने तापसी पन्नूवरही शीरसंधान साधले आहे. तिने ट्विट करत तिने लिहिले आहे की, स्वत:ला  फेमिनिस्ट म्हणणाऱ्या तापसीचे ट्विट मी वाचले. अनुराग कश्यपबद्दल तिला फारच कमी माहिती आहे. त्याच्या चित्रपटांमध्ये महिलांचे तो कशापद्धतीने चित्रण करतो हे तिने पाहणे गरजेचे आहे. 

आता पायल घोष- अनुराग कश्यप असा सुरु झालेला वाद आता किती विकोपाला जातो आणि या चौकशीत काय सत्य समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

दोन आठवड्यात पूनम पांडेचं लग्न तुटण्याच्या मार्गावर, पतीवर शोषण आणि मारण्याचा आरोप

ADVERTISEMENT
23 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT