यंदाचा Grammy Award 2020 सगळ्यांपर्यंत पोहोचला तो प्रियांका चोप्राच्या Plunge गळ्याच्या ड्रेसमुळे आणि आता देशातला मानाचा असा Filmfare Award गाजतोय तो नुशरत भारुचा आणि उर्वशी रौतेलामुळे. ग्लॅमरच्या दुनियेत वावरताना काही तरी नवे करायचे म्हणून त्यांनी जे काही कपडे घातले ते इतके ट्रोल झाले आहेत की, आता तरी सेलिब्रिटींनी आवरावे असे म्हणायची वेळ आली आहे. प्रियांकाच्या ड्रेसच्या बाबतीतही असेच काही झाले होते. तिच्या त्या ड्रेसवर इतके मीम्स आले की, लोकांनी या मीम्सचा आनंद अधिक घेतला. पण आता नुशरत आणि उर्वशी त्यांच्या या ड्रेसची चर्चा का होतेय ते जाणून घेऊया.
प्रियांकाच्या त्या ड्रेसवरची चर्चा काही थांबेना… मीम्स काही आवरेना
हाय हाय ये हाय स्लीट
जर तुम्ही यंदाचा फिल्म फेअरसोहळा पाहिला असेल तर अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमासाठी अगदी हटके कपड्यांमध्ये आले होते. पण या सगळ्यांमध्ये लक्ष वेधून घेतले ते नुशरत आणि उर्वशी यांनी. त्यांनी घातलेला हायस्लीट ड्रेस नुसताच सेक्सी नव्हता. तर फारच घाबरवणारा होता. सर्वसाधारणपणे हाय स्लीट ड्रेस हे मांड्यापर्यंत येतात. पण काहीतरी नवे करण्यासाठी म्हणून या दोघांनी वापरलेल्या डिझायनर ड्रेसमध्ये हे स्लीट थेट बेंबीपर्यंत पोहोचले होते. आता गाऊनचा स्लीट इतका वर गेला आहे म्हटल्यावर तुम्हाला लक्षात आलंच असेल की, त्यातून कशाप्रकारचं अंगप्रदर्शन होत आहे. नुशरतचा ड्रेसमध्ये तिच्या अपर थायकडे दोन लेदर बेल्ट होते. त्यातून तिचा बेलीच्या खाली असलेला टॅटूही दिसत आहे. रामा ग्रीन रंगामध्ये तिचा हा गाऊन आहे. तर दुसरीकडे उर्वशी रौतेला थोडं आणखी करताना दिसली आहे. कारण तिने ट्युब गाऊन विथ हाय स्लीट घातले आहे. फिल्मफेअरची ट्रॉफी पाहिली असेल तर अगदी तिला साजेसा असा हा उर्वशीचा ड्रेस आहे. नुशरतच्या ड्रेसमध्ये तो कपडा पकडून ठेवण्यासाठी दोन लेदर बेल्ट तरी होते. पण उर्वशीच्या ड्रेसमध्ये तेही नव्हतं. त्यामुळे आता तुम्हाला कळलंच असेल. या हाय स्लीट ड्रेसची चर्चा का होत असेल.
मराठीतील ‘अप्सरा’ सोनालीने निवडला आपला जोडीदार, अभिनंदनाचा वर्षाव
फनी मीम्सना उधाण
प्रियांकाच्या त्या ड्रेसवर मीम्सची उधळण झाल्यानंतर या दोघी तरी कशा मागे राहतील.या दोघींवरही सडकून टीका होत असताना मीम्सची उधळण होत आहे. त्यांतले काही मीम्स इतके भयंकर आहे की, ते आमच्या सोशल प्लॅटफॉर्मवरुन शेअर करणेही आम्हाला शक्य नाही. एकूणत टीका आणि मीम्स दोन्ही होताना दिसत आहे.
स्टाईल करा पण जरा जपून
बॉलीवूडकरांना हल्ली झालंय काय? अशी प्रतिक्रिया उमटत आहे. कारण त्यांच्या ड्रेसचा सेन्स बदलत चालला आहे. हॉलीवूडला टक्कर देण्यासाठी जे काही घातलं जात आहे ते आपल्या लोकांना रुचेल का? याचा विचार केला जात नाही. असे काही लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्टाईल करताना थोडासा विचार करा, असा सल्ला देण्याची वेळ आली आहे.
आता तुम्हाला या फॅशनवर काय म्हणायचे आहे ते आम्हाला नक्की कळवा.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/