Advertisement

बॉलीवूड

डिअर जिंदगीनंतर आता ‘या’ चित्रपटात शाहरूख आणि आलिया एकत्र

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Feb 15, 2021
डिअर जिंदगीनंतर आता ‘या’ चित्रपटात  शाहरूख आणि आलिया एकत्र

Advertisement

आलिया भटने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ दी इअरमधून पदार्पण केलं आणि तिला एकापाठोपाठ सुपरहिट चित्रपट मिळाले. 2016 साली आलियाने शाहरूख खानसोबत डिअर जिंदगीमध्ये एकत्र काम केलं होतं. डिअर जिंदगी हा  चित्रपट शाहरूख खान आणि करण जोहरने मिळून प्रोड्यूस केला होता. शाहरूख खान झिरो चित्रपटाच्या अपयशानंतर बॉलीवूडपासून काहीसा दुरावला होता. मात्र त्याने पुन्हा चित्रपट निर्मितीसाठी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे आता शाहरूखच्या आगामी चित्रपटात पुन्हा एकदा अभिनेत्री आलिया भटच मुख्य भूमिकेत असेल. या चित्रपटात शाहरूख मुख्य भूमिकेत नसून तो फक्त या चित्रपटाचा निर्माता असणार आहे. 

काय आहे शाहरूखचा ‘डार्लिग्ज’

शाहरूखच्या रेड चिलीज इंटरटेंटमेंट या प्रॉडक्शन हाऊसच्या आगामी ‘डार्लिंग्ज’ या चित्रपटात आलियाची मुख्य भूमिका असेल. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच आलियाने डार्लिंग्जची स्क्रिप्ट वाचली आहे आणि ती तिला खूपच आवडली ज्यामुळे तिने या चित्रपटासाठी होकार दिला आहे. डार्लिंग्ज या चित्रपटाचे कथानक एका विचित्र आई आणि मुलीभोवती फिरणारे आहे. आलियासोबत मुख्य भूमिकेत शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मेथ्यू असतील. यात आलियाच्या विचित्र आईची भूमिता शेफाली शाह साकारण्याची शक्यता आहे. या दोघींचे जीवन अतिशय विचित्र आणि विक्षिप्त असलेलं यात दाखवण्यात येणार आहे. ही कथा मुंबईतील एका सत्य घटनेवर आधारित असल्याची चर्चा आहे. डार्लिंग्ज चित्रपटाच्या माध्यमातून जसमीत के रेने दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. तिने यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शकच्या रूपात काम केलेलं आहे. याशिवाय फोर्स 2, फन्नी खान, पती पत्नी और वो या चित्रपटांच्या कथेचं लेखनही केलं आहे. या महिन्यात या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्च  आधी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होईल आणि चित्रपट याच वर्षी प्रदर्शित केला जाईल. चित्रपटाच्या प्री प्रॉडक्शनचे काम जोरात सुरू झालं असून या चित्रपटाचं शूटिंग मुंबईतच केलं जाणार आहे. त्यामुळे लवकरच आलियाला एका वेगळ्या भूमिकेत पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. आलियासाठी ही भूमिका नक्कीच आव्हानात्मक आणि खास असण्याची शक्यता आहे. यासाठीच तिने स्क्रिप्ट वाचताच या चित्रपटात काम करण्यासाठी पटकन होकार दिला असावा. 

डार्लिंग्ज व्यतिरिक्त इतर प्रोजेक्ट

डार्लिंग्जसोबत शाहरूख खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये आणखी अनेक चित्रपट रांगेत आहेत. ज्याच बॉबी देओल, विक्रांत मेसी, सान्या मल्होत्रा यांचा ‘लव हॉस्टेल’ आहे. अभिषेक बच्चनच्या ‘बॉब बिस्वास’चं शूटिंग झालं असून प्रोस्ट प्रॉडक्शन सुरू आहे. ‘समर 2021’ वर काम सुरू आहे. याचप्रमाणे अनेक चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. या स्क्रिप्ट फायनल करण्याचं काम शाहरूखच्या पठाननंतर होणार आहे. शाहरूख सध्या ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्यात तो दीपिका पादुकोणसोबत एका महत्त्वाची सिक्रेट एजंटच्या भूमिकेत असेल. तर याच चित्रपटात त्याच्यासोबत जॉन अब्राहिम खलनायकाच्या भूमिकेत असणार  आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

शिल्पा शेट्टी आणि परेश रावलच्या ‘हंगामा 2’ मध्ये अक्षय खन्नाची स्पेशल एंट्री

आलिया भटच्या हातावर रंगली मेंदी, रणबीरसोबत गुपचूप करणार का लग्न

या मराठी अभिनेत्यांनी साकारली शिवाजी महाराजांची भूमिका, प्रेक्षकांच्या मनावर सोडली छाप