उन्हाळा तीव्र झाला की, त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या जाणवायला लागतात. त्वचेवर रॅशेश येणे, त्वचा लाल दिसणे आणि त्वचेवर पुरळ येणे असे त्रास काहींना अगदी होतातच. उन्हाळ्यात आधीच डिहायड्रेट झालेली त्वचा आणि त्यावर जर पिंपल्स आले तर त्वचा आपसुकच डल आणि अनाकर्षक दिसू लागते. तुम्हालाही उन्हाळ्याच्या या कालावधीत चेहऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात पिंपल्स येत असतील तर तुम्ही आताच तुमच्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण उन्हाळ्यात आलेले हे पिंपल्स सहजा सहजी लवकर जात नाही. अशा पिंपल्सची योग्य काळजी घेणे फार गरजेचे असते. त्यामुळे या वातावरणात पिंपल्स का येतात त्याची कारणं आणि सोपे उपाय जाणून घेऊया.
फ्रुट स्मुदी प्या आणि वजन नियंत्रणात ठेवा
छिद्रांंध्ये घाम जाणे
उन्हाळ्यात घाम येण्याची प्रक्रिया ही फार तेजीत होते. इतर वेळी येणारा घाम आणि या दिवसात येणारा घाम यामध्ये फरक असतो. जर तुम्हाला या दिवसात खूप घाम येत असेल तर काही बाबतीत ही चिंताजनक गोष्ट आहे. याचे कारण असे की, शरीरात वाढलेली उष्णता यामुळे त्वचेवरील छिद्र ही आपोआप खुली होतात. घामातून त्वचेच्या आत घाण जाते. जर ही धूळ आणि घाण जर घामाच्या माध्यमातून त्वचेच्या आत तशीच राहिली तर मात्र ती त्रासदायक ठरु शकते. कारण त्यामुळेच पिंपल्सला चालना मिळण्याची शक्यता असते. शरीर असे हानिकारक घटक घेऊ शकत नाही. त्यामुळे ते योग्य पद्धतीने बाहेर पडले नाही तर अशाप्रकारे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात
उन्हाळ्यात या कारणासाठी टाळायला हवे नॉन व्हेज पदार्थ
असे करा सोपे उपाय
घामामुळे हे पिंपल्स येतात हे जरी खरे असले तरी देखील इतर काही कारणांमुळेही तुम्हाला पिंपल्स नक्कीच येतात. खाद्यपदार्थ आणि वातावरण यांचा जवळचा संबंध आहे त्यामुळे जर तुम्ही चुकीचे खाद्यपदार्थ या दिवसात खाल्ले तरी देखील तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. आता उपायांचा विचार केला तर या काही गोष्टींची काळजी घेणेही फारच गरजेचे असते.
- जर तुम्हाला खूप घाम येत असेल किंवा नसेल तरी देखील बाहेरुन आल्यानंतर चेहरा छान थंड पाण्याने धुवून घ्या. त्यामुळे तुमच्या त्वचेवर अडकलेली धूळ, माती निघून जाण्यास मदत होईल.
- चेहऱ्यावर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बर्फ किंवा एखादा आईस रोलर फिरवा त्यामुळे नक्कीच तुम्हाला आराम मिळेल. तुमच्या त्वचेवरील छिद्र ही बंद होण्यास मदत मिळेल.
- या दिवसात तुम्ही थोडे नॉन-व्हेज पदार्थ टाळायला हवेत.कारण त्यामुळे शरीरात उर्जा वाढते. ज्याचा त्रास तुम्हाला पिंपल्स रुपाने होऊ शकतो.
- चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी एखाद्या चांगल्या लाईट आणि हलक्या स्क्रबचा उपयोग करा कारण त्यामुळे तुम्हाला त्वचा स्वच्छ राहण्यास मदत मिळते.
- उन्हाळ्यात येणाऱ्या मासिक पाळीदरम्यान जर तुम्हाला जर पिंपल्स आले असतील तर थोडा धीर धरा. कारण जर तुम्ही ते पिंपल्स फोडले तर त्याचे डाग जास्त काळासाठी चेहऱ्यावर राहू शकतात.
- एखादा मोठा पिंपल्स त्वचेवर आला असेल तर त्यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर अशा पिंपल्समध्ये जर पू साचला तर त्याचे मोठे डाग पडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यावर योग्य सल्ला घ्या.
आता अशापद्धतीने उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्या म्हणजे तुमची त्वचा या दिवसात खराब होणार नाही.
पिंपल्स आले तरी चेहऱ्यावर टाळा स्टेरॉईड्स असलेल्या क्रिम्स