ADVERTISEMENT
home / Diet
गर्भवती स्त्रियांनी कडकडीत उपवास करणे धोक्याचे

गर्भवती स्त्रियांनी कडकडीत उपवास करणे धोक्याचे

स्त्रिया या जात्याच संवेदनशील असतात. स्वतःच्या कुटुंबासाठी त्या अहोरात्र झटत असतात आणि  कुटुंबाच्या सौख्यासाठी व समृद्धीसाठी त्या मनापासून व्रतवैकल्ये करतात. त्यात गैर काहीच नाही. पण उपवास  करताना तब्येतीची हेळसांड कुणीच करून घेऊ नये.. खास करून गर्भवती स्त्रियांनी तर स्वतःच्या तब्येतीची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत गर्भवतींनी निर्जळी उपवास, कडकडीत उपवास तर कधीही करू नये. पण गर्भवती स्त्रियांना मात्र काही ठिकाणी उपवास न करण्याची सूट नसते. काही वेळेला त्यांना सक्तीने उपवास करावा लागतो. तर काही गर्भवती स्त्रिया स्वतःच्या श्रद्धेसाठी उपवास करतात.

कारण काहीही असो, जेव्हा स्त्रीच्या उदरात एक नाजूक जीव वाढत असतो तेव्हा त्या स्त्रीची व त्या अर्भकाचीही प्रकृती नाजूक असते. त्यामुळे या दोन्ही जीवांना जपण्यासाठी विशेष काळजी घेतली गेलीच पाहिजे नाहीतर भयंकर परिणाम उद्भवण्याची शक्यता असते. गर्भावस्थेत स्त्रीच्या शरीराला अधिक पोषणाची आणि अधिक शक्तीची गरज असते.

गर्भवतींनी उपवास का करू नये?

गर्भावस्थेचा काळ हा स्त्रीसाठी व बाळासाठी खूप महत्वाचा असतो. स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते तर पहिल्या तीन महिन्यांत शक्यतोवर उपवास करणे टाळावेच. तरीही उपवास करण्याची तीव्र इच्छा असेलच तर गर्भवतींनी उपवास करताना देखील उपवासाला चालेल असा पौष्टीक आहार घेतला पाहिजे. जर गर्भवती स्त्रीला ऍनेमिया , उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असे त्रास असतील तर त्यांनी उपवास करणे त्यांच्या तब्येतीसाठी धोकादायक ठरते. गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांत बाळाच्या वाढीला सुरुवात होत असते तसेच आईच्या आहारावरच बाळाचे पोषण पूर्णपणे अवलंबून असते. जर आई उपाशी असेल तर तिच्या आहारातून मिळणारी आवश्यक पोषणमूल्ये बाळाला मिळत नाहीत आणि बाळाच्या वाढीवर गंभीर परिणाम होतात.

अधिक वाचा – जाणून घ्या गरोदरपणात काय खावे

ADVERTISEMENT

उपवास करा पण खाऊनपिऊन!

जर गर्भावस्थेला तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला असेल तर ती स्त्री तिच्या श्रद्धेसाठी थोडा काळ उपवास करू शकते. पण त्या स्त्रीने दर दोन तासांनी उपवासाला चालेल असा आहार घेतला पाहिजे. उपवासाला चालणारे पदार्थ दूध, फळे, सुकामेवा खाल्ल्यास उपवास करण्यास हरकत नाही. हे खाण्याबरोबरच थोड्या थोड्या वेळाने पाणी देखील पीत राहावे म्हणजे डिहायड्रेशन होणार नाही.  शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास बाळाच्या मुव्हमेंटवर परिणाम होऊ शकतो. उपवास करताना त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

उपवासाला काय खावे?

उपवास करताना गर्भवतींनी त्यांच्या आहारात  कार्बोहायड्रेट्स घ्यायला हवे. कारण कार्बोहैड्रेट्समुळेच आपल्या स्नायूंना शक्ती मिळते तसेच मेंदूचे काम सुरळीत चालते. गर्भवती स्त्रियांची इन्शुलिन लेव्हल योग्य राहणे आवश्यक असते म्हणूनच योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आहारात असायलाच हवेत. तसेच रेडिमेड ज्यूस, बटाट्याचे वेफर्स हे न खाता फळे खावीत. ज्या ठिकाणी साबुदाणा,भगर व लाल भोपळा, उकडलेला बटाटा, रताळी, काकडी ह्यासारख्या भाज्या उपवासाला चालतात त्यांनी त्या आवर्जून खाव्यात. तसेच लिंबू सरबत,नारळपाणी, ताक, कोकम सरबत घेतले तर शरीरातील पाण्याचे प्रमाण मेंटेन राहते. गर्भवतींनी जास्तीत जास्त एखादा दिवस उपवास करावा. सलग दोन-तीन दिवस उपवास करू नयेत. आणि उपवास करताना सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या फराळापर्यंत  पौष्टीक पदार्थ खावेत.  

अखेर उपवासाचे उद्दिष्ट हेच असते की संपूर्ण कुटुंबाला उत्तम आरोग्याचा, सुखसमृद्धी व समाधानाचा आशीर्वाद मिळावा. तो करताना तब्येत बिघडली तर मग घरात सुख कसे येणार?

अधिक वाचा- गरोदर राहण्यासाठी उपाय, महत्त्वाची माहिती

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

03 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT