उन्हाळा म्हणजे तर विविध आजार हे आलेच. त्यातच हळूहळू सूर्याच्या तापमानामुळे उष्णतेत प्रचंड वाढ होते. आधीच शिशिर ऋतूतील थंडगार वातावरणामुळे साचलेला कफ हळूहळू पातळ होतो. जठराग्नी (पचनशक्ती) मंदावते. परिणामी अतिरिक्त उष्णतेमुळे शरीरातील कफ कमी होतो आणि वात वाढू लागतो. म्हणूनच उन्हाळ्यात पित्ताचा त्रास, अँसिडिटी तसेच डोकेदुखी,लघवी च्या जागी जळजळ होणे, उन्हाळी लागणे इत्यादी अपचनाशी संबंधित विकार वाढताना दिसून येतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळावधीत स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबद्दल आयुर्वेदात काही टिप्स सांगण्यात आल्या आहेत. डॉ. वैशाली सावंत चव्हाण, सहाय्यक वैद्यकीय संचालक, वेदिक्युअर हेल्थ अँण्ड वेलनेस क्लिनिक यांच्याकडून आम्ही अधिक टिप्स जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
उन्हाळी आजारांपासून वाचण्यासाठी काही खास उपाययोजना
आयुर्वेदानुसार काही खास उपाययोजना करून आपण उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकतो. त्यासाठी नक्की काय करायचे ते जाणून घेऊया.
आहार –
Shutterstock
गहू, जुने तांदूळ, मूग या धान्यांचा आहारात समावेश करावा. नवीन धान्य कफ वाढवतात तसेच पचनशक्ती कमी करतात म्हणून त्यांचा रोजच्या आहारात समावेश करू नये. नाईलाजाने नवीन धान्य खावे लागल्यास ते धान्य आधी भाजून घ्यावे. जेणेकरून ते पचनास हलकी होतात. जास्त हालचाल करणाऱ्या प्राण्यांचे मांस खावेत
पेय
नागरमोथा(मूस्ता) व सुंठीचा काढा – कफशामक
- डाळिंबाचे सरबत – पित्तशामक
- नवीन मातीच्या भांड्यात ठेवलेले वाळा तसेच खसाच्या सरबताचे सेवन करावेत
- नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते
- कोकम सरबताचे सेवन करावे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही कोकम सरबत उन्हाळ्याच्या दिवसात नक्कीच पिऊ शकता
- फ्रिजमधील पाणी न पिता घरात माठ असेल तर त्यातील पाणी सेवन करावे. तसंच उन्हातून आल्या आल्या अजिबात पाणी पिऊ नये. पाण्याबरोबर गुळाचे सेवन करणे योग्य ठरते. म्हणजे उष्माघाताचा त्रास होत नाही
उन्हाळ्यात ही 5 थंडपेय तुम्हाला ठेवतील कूल!
व्यायाम –
Shutterstock
उन्हाळ्यात सुरूवातीला हलका व्यायाम करावा. उष्णता वाढत राहिल्यास व्यायाम करणे कमी करावेत., उन्हाळ्यात बाहेर फिरणे टाळावेत, दिवसा झोपू नयेत, कपूर चंदनाचा कपाळावर लेप लावावा, नदी किंवा विहिरीमध्ये पोहावे, हलके आणि पातळ वस्त्रे परिधान करावेत. शीतल कारंज्याच्या संपर्कात रहावे. तसंच योगाही तुम्हाला फायदेशीर ठरते. शीतली-शीतकारी-शरीरातील उष्मा नियंत्रण करणारा योगाभ्यास करावा.
उन्हाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी वापरा हे उटणं
उपाय –
- सैंधव मीठयुक्त पाणी सकाळी उपाशीपोटी वैद्यांच्या सल्ल्याने घेऊन वितळणारा कफ बाहेर काढावा.
- कफाच्या पोकळ्यांमध्ये साचलेला कफ बाहेर काढण्यासाठी औषधी द्रव्यांचे धुम्रपान (धूर घेणे) करावे.
- मीठ तसेच हळदीच्या पाण्याने गुळण्या कराव्यात
- औषधीसिद्ध तेलांचे रोज नाकात दोन-दोन थेंब टाकावेत.
- विविध आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी वरील सर्व उपाययोजना संबंधित व्यक्तींनी आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावी.
- दीर्घकालीन डोकेदुखी, अँसिडीटी पित्तासाठी शास्त्रोक्त पंचकर्माची मदत घ्यावी
या सर्व गोष्टींचा तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात योग्यरित्या उपयोग केल्यास तुम्हाला त्रास होणार नाही. तसंच या सर्व गोष्टी या आयुर्वेदिक असल्याने तुमच्या शरीरावर कोणतेही अन्य परिणाम होत नाहीत. सहसा नैसर्गिक पदार्थांचा यामध्ये वापर करण्यात आलेला असतो. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात तुम्हाला आरोग्याची योग्य काळजी घ्यायची असल्यास, तुम्ही नक्की या आयुर्वेदिक टिप्सचा वापर करा.
उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी बनवा विशिष्ट फेसपॅक
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक