ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
ब आद्याक्षरावरुन मुलींची नावे

ब वरून मुलींची नावे (B Varun Mulinchi Nave In Marathi)

घरात मुली जन्माला आल्या की,जणू लक्ष्मी जन्माला आल्याचा आनंद प्रत्येक घरात होतो. अशा गोड परीचे नाव युनिक असावे असे प्रत्येकाला वाटते. लहान बाळाची पत्रिका काढल्यानंतर त्यात जर बाळाचे आद्याक्षर ‘ब’ आले असेल तर अशा व्यक्तीची रास कर्क असते.  ‘ब’ आद्याक्षर आलेल्या व्यक्तीच्या राशीवर चंद्राचा प्रभाव असतो. या राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे अशा व्यक्ती या दिसायला सुंदर आणि आकर्षित करणाऱ्या असतात. त्यामुळे तुमच्या मुली या नक्कीच सुंदर आणि आकर्षक असणार यात काही शंका नाही.आता तुमच्या मुलीचे नाव ‘ब’ आद्याक्षरावरुन ठेवण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही नावे शोधून काढली आहेत. ब वरुन मुलींची नावे (B Varun Mulinchi Nave In Marathi) ठेवा. या शिवाय श वरुन मुलींची नावे, फ वरुन मुलांची नावे, च आणि छ वरुन मुलांची नावे, जुळ्या मुलींची नावे अशीही काही नावे ठेवू शकता.

ब वरुन मुलींची लेटेस्ट नावे (Latest B Varun Mulinchi Nave)

‘ब’ हे आद्याक्षर आल्यानंतर मुलींची लेटेस्ट नावे ठेवण्याचा विचार करत असाल तर खास तुमच्यासाठी ब वरुन काही लेटेस्ट नावे शोधून काढली आहेत ती देखील जाणून घेऊया. यापैकी आवडलेलं नाव तुम्ही तुमच्या मुलीसाठी ठेवू शकता. थ वरुन मुलांची नावे ठेवायची असतील तर ती देखील ठेवा

मुलींची नावेनावांचे अर्थधर्म
बेलासुंदर फुल, बेलफळ, सुंदरहिंदू
बहुगंधाचाफेकळी, सुंदर, सुंगधितहिंदू
बासरी श्रीकृष्णाचे आवडते वाद्य, गोड , मधूरहिंदू
बिंदीटिकलीहिंदू
बानीपृथ्वी, सरस्वती देवीहिंदू
बिपाशानदी, वाहते पाणीहिंदू
बिशाखाएक ताराहिंदू
बिंबाकुंकू, चंद्रकलाहिंदू
बर्फीएक गोडाचा प्रकारहिंदू
बागेश्रीसंगीतातील रागाचा एक प्रकारहिंदू
बिजलीवीज, चमचमणारीहिंदू
बिंबीचमकदार, चमचमणारीहिंदू
बरखापाऊस, विजांसह पडणारा पाऊसहिंदू, मुस्लिम
बिजलवीज, लाईटनिंगहिंदू
बान्हीआग, अग्नीहिंदू
ब वरून मुलींची नावे

ब वरुन मुलींची युनिक नावे (Unique B Varun Mulinchi Nave)

युनिक नाव ठेवायला अनेकांना आवडते. मुलींची अशी युनिक नावे देखील आम्ही शोधून काढली आहेत.ही नावे हिंदू-मुस्लिम अशी मिश्र आहेत. त्यामुळे तु्म्ही ब वरुन मुलींची युनिक नावे ठेवू शकता. याशिवाय ‘स’ वरुन मुलींची नावे शोधत असाल तर तुम्ही ही नावे देखील ठेवू शकता.

मुलींची नावेनावांचे अर्थधर्म
बविष्याभविष्यकाळहिंदू
बहुलागायीचे नावहिंदू
बारुणीमाता दुर्गेचे नावहिंदू
भद्राचांगले, चांगलीहिंदू
बिन्नीसफेद, रुपहिंदू
ब्रायनमजबूतख्रिश्चन
बरवासंगीतातील एक रागहिंदू
बिल्बा बेलाचे झाडहिंदू
बीनलवीणा,एक वीणाहिंदू
बिजुला वीजहिंदू
बिजुलअशोक वृक्षहिंदू
बन्सीबासुरीहिंदू
बिनीताएकदम  चपखलहिंदू
ब्रितीताकदहिंदू
बेलीकाबेलाचे फळहिंदू
B Varun Mulinchi Nave

ब वरुन मुलींची पौराणिक नावे (Tradiational B Varun Mulinchi Nave)

ब वरुन काही जुनी म्हणजे पौराणिक अशी नावे देखील आहेत. जी आताच्या काळात नक्कीच थोडी वेगळी आणि युनिक वाटू शकतील. पुराणातील ही नावे नेहमीच चांगली वाटतात. जाणून घेऊया ब वरुन मुलींची पौराणिक नावे

ADVERTISEMENT
मुलींची नावेनावांचे अर्थधर्म
बहुगंधाविविध सुंगध असलेलीहिंदू
ब्रिजबालानिसर्गाची देवताहिंदू
ब्रिंदालहान मुलगी, चिमुकलीहिंदू
बकुळएक सुगंधित फुलहिंदू
बुलबुलएक पक्षीहिंदू
बसाबीदेव इंद्राची बायकोहिंदू
बबितालहान मुलगीहिंदू
बिमलाशुद्धहिंदू
बोधीमनोरंजनहिंदू
ब्रिंदाराधा, राधेचे एक नावहिंदू
ब्राम्हणीदेव ब्रम्हाची बायकोहिंदू
बिजालीप्रकाशित, वीज, लाईटनिंगहिंदू
बनमालाफुलांचा गुच्छाहिंदू
बंधुरासुंदर, आकर्षकहिंदू
बीनावीणाचा अपभ्रंश,एक वाद्यहिंदू
ब वरून मुलींची नावे

आता तुम्हाला आवडलेली नावे तुम्ही अगदी नक्कीच तुमच्या मुलींसाठी ठेवू शकता.

23 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT