ADVERTISEMENT
home / आरोग्य
ऑफिस आणि घरकामांच्या दुहेरी कसरतींमुळे पाठीच्या दुखण्यांमध्ये चाळीस टक्क्यांची वाढ

ऑफिस आणि घरकामांच्या दुहेरी कसरतींमुळे पाठीच्या दुखण्यांमध्ये चाळीस टक्क्यांची वाढ

कोविड 19 (Covid 19) च्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या काही महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन पाळण्यात आला. अजूनही परिस्थिती तितकीच गंभीर असल्याने वर्क फ्रॉम होम सारखा पर्याय अवलंबण्यात आला आहे. यादरम्यान काम करताना बसण्याच्या चूकीच्या सवयी, त्याचबरोबर घरकाम, साफसफाई करताना होणारी कसरत आणि कित्येक महिन्यांपासून घरी राहिल्याने व्यायामाचा अभाव या सा-या कारणांमुळे पाठ, मान, खांदे यांचे दुखणे वाढले आहे. सतत घरातील आणि ऑफिसची  कामं यांचा ताण येऊन पाठीच्या दुखण्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बर्‍याच महिला लॉकडाऊन दरम्यान पाठीच्या दुखण्याने पीडित आहेत. अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, इंटरव्हेंशनल स्पाइन अँड पेन मॅनेजमेंट स्पेशालिस्ट डॉ. कैलाश कोठारी यांनी सांगितले की, आमच्याकडे दिवसाला ४ ते ५ रुग्ण पाठदुखीच्या समस्या घेऊन उपचाराकरिता येतात. ज्या महिला घरातील सर्व कामे करतात जसे घर स्वच्छ करणे, झाडझुड करणे, घरातील साफसफाईची कामे तसेच फरशी पुसणे या सा-या गोष्टींमुळे थकवा जाणवू शकतो आणि स्नायूंचे त्रास सुरू झाले आहेत. म्हणूनच, डिशेस करताना ओव्हरस्ट्रेचिंग, स्टूपिंग, झुकणे आणि स्लॉचिंगमुळे व्हॅक्यूमिंग किंवा लॉन्ड्रीमुळे पाठीच्या वेदना होण्याने त्रास वाढले आहेत. 

एकाच ठिकाणी बसून काम करणं आरोग्यासाठी ठरू शकतं धोकादायक

पाठीच्या दुखण्यात झाली वाढ

Shutterstock

ADVERTISEMENT

झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे कन्सल्टंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. राकेश नायर यांच्या सांगण्यानुसार, “माझ्याकडे बहुतेक 45 ते 85 वर्षे वयोगटातील गुडघ्यावरील रुग्ण मान आणि पाठीच्या दुखण्याविषयी तक्रारी घेऊन येत आहेत. तर काहींना तर त्यांच्या गुडघेदुखीचा त्रास न होता आता पाठदुखीचा त्रास सुरु झाला आहे. सद्यस्थितीत सुमारे 70 टक्के लोकांना पाठदुखीची तक्रार सुरू झाली आहे. कोविडमुळे बाहेर फिरण्यास, व्यायामाच्या अभावामुळे तसेच एकाच जागी बसून राहण्याची वेळ वाढल्याने मान आणि पाठीच्या दुखण्याला आमंत्रण मिळाले आहे. डॉ. नायर सांगतात साधारण एक तास सलग बसल्यानंतर 15 ते 20 मिनिटे आराम करा आणि पडून राहा. अधूनमधून घरातल्या घरात चाला. दर अर्ध्या तासाने उभे राहून हात पायांचा हलका व्यायाम करा. व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12 चा समावेश असलेल्या आहाराचे सेवन करा. आहारासह सोपे व्यायाम प्रकार करायला विसरू नका.हे व्यायाम प्रकार स्नायुंना बळकटी आणायचे काम करतात. दररोज १५ ते २० मिनिटे मेडिटेशन करा . श्वासोच्छवासाचा व्यायाम करा असे नायर यांनी स्पष्ट केले.

पाठदुखीवर करता येते व्यायामाने मात…कसे ते जाणून घ्या

पाठीसाठी काय काळजी घ्यावी

Shutterstock

ADVERTISEMENT

आपल्या पाठीला आधार देणारी खुर्ची वापरावी, मॉनिटर योग्य उंचीवर ठेवावा, आपली बसण्याची पद्धत अचूक असावी. घरातील कामे कुटुंबातील सदस्यांमध्ये समान वाटून घ्यावे. एका दिवसात संपूर्ण घर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नका. पाठीवरचा ताण कमी करण्यासाठी शारीरीक क्रिया करताना कंबरेला वाकवू नका. जर तुमच्या पाठीचा त्रास कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे डॉ. कोठारी यांनी स्पष्ट केले. तसंच काम करताना मधून मधून उठणेही अत्यंत आवश्यक आहे. पाठ पटकन आखडते. अशावेळी आपणच आपली काळजी घ्यायला हवी. अन्यथा याचा अधिक त्रास वाढत जाऊन पाठीचे आजार कायमस्वरूपी होण्याची शक्यता असते हेदेखील लक्षात घ्या.  

मानदुखी झटपट दूर करेल हे सोपे उपाय (Home Remedies For Neck Pain In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

13 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT