आयुष्यात माणसाला चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रसंगाना सामोरं जावं लागतं. वेळ ही प्रत्येक दुःखावरचं औषध आहे असं म्हणतात. त्यामुळे चांगला वेळ भरभर निघून जातो, पण वाईट वेळ जाता जात नाही. वाईट असली तरी वेळ आहे मग ती निघून जाणारच हा विश्वास मनात असायला हवा. लहान असो वा थोर, श्रीमंत असो वा गरीब, ज्ञानी असो वा अज्ञानी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी तरी वाईट वेळ येते. अशा वेळी मनाला खंबीर करणारे आणि जगण्याची प्रेरणादेणारे विचार आणि माणसं सोबत असतील तर कोणतीही वेळ सुसह्य होते. म्हणूनच तुमच्यावरही जर अशी वाईट वेळ आली असेल तर मनाला समजवा, चांगल्या लोकांची साथ सोडू नका आणि वाचा मनाला उभारी देणारे हे वाईट वेळ स्टेटस मराठी (Bad Time Quotes in Marathi), खराब वेळ स्टेटस (Kharab Time Status Marathi) Heart Touching दुखी स्टेटस मराठी, Sad वेळ मराठी स्टेटस, Hard Times वाईट वेळ स्टेटस, Life वाईट वेळ स्टेटस तसंच वाचा वेळेवर आधारित स्टेटस, कोट्स, शायरी, सुविचार मराठी
Table of Contents
वाईट वेळ स्टेटस – Bad Time Status Marathi
वाईट वेळ जीवनात आली की माणसाचं मन भरकटत जातं. भिरभिरलेल्या मनाला नेमकं काय करावं हे कळत नाही, अशा वेळी हे वाईट वेळ स्टेटस (Kharab Time Status Marathi) तुमच्या मनाला नक्कीच उभारी देतील.
1.आज वाईट आहे, उद्या चांगली येईल
वेळच तर आहे, बदलून नक्कीच जाईल.
2.वेळ खूप जखमा देते, कदाचित म्हणून…
घड्याळातफुल नाही तर काटे असतात.
3.वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल
पण बदलेले लोक कायम लक्षात राहतील!
4.वाईट वेळ निघून जाते मात्र, जाताना लोकांचे खरे रूप दाखवून जाते
5.वाईट दिवसांत सगळ्यांनी मजा घेतली, पण लक्षात ठेवा दिवस बदलायला वेळ नाही लागत !!!
6. वेळ पण जादूगर आहे, ज्याच्यासोबत असते त्याचं नशीब चमकवते आणि ज्याच्या सोबत नसते त्याचं नशीबच बदलवते.
वाचा – Emotional Friendship Quotes in Marathi
Sad वेळ मराठी स्टेटस – Vait Vel Status Marathi
दुःख अथवा वाईट काळ हा थोड्यावेळासाठीच असतो, मात्र आयुष्यभराचं सार शिकवून जातो. यासाठीच या वेळेचे नेहमी आभार माना, आणि चांगली वेळ येण्याची वाट पाहा.
1.वेळ चांगली असो वा वाईट, शब्दाला जागणं आणि शेवट पर्यंत साथ देणं हीच खरी आपली ओळख आहे.
2.वाईट प्रसंगानंतर येणारी अक्कल म्हणजे शहाणपण
3.वाईट वेळ माणसाला सर्व काही शिकवते, अगदी जगायला सुद्धा !!!
4.वेळ वाईट आहे पण साथ मजबूत आहे
5.वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली त्यांचे मोल कधीच विसरू नका.
6.अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका आणि उणिवा शोधत बसू नका, नियती बघून घेईल तुमची हिशोब करू नका.
Life वाईट वेळ स्टेटस
जीवन हे सुख आणि दुःखाने भरलेलं आहे. म्हणूनच चांगल्या वेळेत नेहमी कृतज्ञ राहा आणि जर तुमच्या आयुष्यात चुकून वाईट वेळ आलीच तर ती सहन करण्याची ताकद ठेवा. कारण वेळ बदलत राहते दुःखानंतर सुखाची चाहूल लागते यावर विश्वास ठेवा.
1.वाईट वेळ नेहमी आपल्या माणसांची ओळख करून देण्यासाठी येते
2.वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यांत चांगली गोष्ट घडते ती ही की, तुमची काळजी करणारी माणसं तुम्हाला मिळतात
3.आपली चांगली वेळ जगाला सांगते की, आपण कसे आहोत, पण वाईट वेळ आपल्याला सांगते की जग कसं आहे
4.आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊच शकत नाही
5.शांत बसून आज फक्त जगाकडे बघतोय, वेळ आल्यावर असं काही करेन की सगळ्या जगाचं लक्ष माझ्याकडे असेल.
6.आयुष्यात एकदा तरी वाईट वेळाला सामोरं गेल्याशिवाय चांगल्या वेळेची किंमत कळत नाही.
वाचा – Marathi Status On Life
खराब वेळ स्टेटस
वेळेचं महत्त्व एकदा समजलं की माणसाचं जगणं सोपं होत जातं. यासाठी जर तुमच्या आयुष्यात कधी खराब वेळ आलीच तर मनाला एवढं खंबीर करा की तुमची वेळदेखील थकून निघून जाईल.
1.वेळेचे महत्त्व त्यालाच चांगलं समजतं, जो दुसऱ्यांना आपलं महत्त्व समजवण्यात वेळ वाया घालवत नाही.
2.वेळ कशीही असो चांगली अथवा वाईट, पण कधीच वाईट काम करू नका, नाहीतर वाईट वेळेत चांगले लोकपण तुम्हाला सोडून जातील.
3.आपल्या लोकांना ओळखण्याची खरी वेळ म्हणजे तुमच्यावर आलेली वाईट वेळ.
4.एकदा चांगली वेळ निघून गेली की सर्व काही बदलून जातं. मग नंतर वाईट वेळ आल्यावर कितीही पश्चाताप करून फायदा नाही.
5.अपयशासाठी वेळ कधीच जबाबदार असत नाही, तुम्ही स्वतः असता.
6.वेळ बदलली की माणसं पण सरड्याप्रमाणे रंग बदलतात.
वाईट वेळ स्टेटस मराठी
वाईट वेळ येते आणि जाते. पण आल्यावर तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ शिकवून जाते. म्हणूनच कदाचित जीवनात प्रत्येकाला एकदा तरी अशा वेळेशी सामना करावाच लागतो.
1.वाईट वेळ असताना साथ सोडलेल्या लोकांचे नेहमी आभार माना, कारण त्यांना विश्वास होता तुम्ही एकटे लढू शकता.
2.वेळ कितीही वाईट असली तरी तुम्ही प्रामाणिकपणा सोडू नका
3.वाईट वेळेत थोडासा वेळ काढून जे होत आहे ते बघण्याची वेळ आली आहे असं समजा, कारण तरंच तुम्हाला चांगल्या वेळेचं महत्त्व समजेल.
4.तुमच्याकडे सध्या जितका वेळ आहे, तितका नंतर असणार नाही, तेव्हा तिचा चांगल्या कामासाठी वापर करा.
5.”जगात कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाही, अगदी तुमची वाईट वेळ सुद्धा”
6.तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे या निर्णय घ्यायला वेळ लावू नका, नाहीतर वेळ त्याचा निर्णय घेईल.
Marathi वाईट वेळ स्टेटस
वाईट वेळ आली तर घाबरू नका, उलट त्या वेळेत तुम्हाला मिळणाऱ्या अनुभवातून जीवनाचा धडा घ्या. कारण याच धड्यावर तुमचं पुढचं जीवन सुसह्य होणार आहे.
1.कधीच विसरू नका
तुमच्या वाईट वेळेला कोण उभं राहिलं
तुम्ही कोणाच्या वाईट वेळेला उभं राहिलात
आणि
तुमच्यावर वाईट वेळ का आली
2.वेळ मिळाल्यावर बोलणं आणि वेळ काढून बोलणं यात खूप फरक आहे
3.वाईट वेळ येते ती, देवाकडे काही तरी मागण्यासाठी नाही, तर यापूर्वी देवाने जे जे चांगलं दिलं त्यासाठी आभार मानण्यासाठी …
4.वाईट वेळ कोणामुळेही येत नाही, चांगली वेळ आपल्या हातात असते आणि वाईट वेळपण आपल्याच हातात असते.
5.वेळ वाईट आहे… पण आयुष्य नाही
6.वाईट वेळेत उगाच आधार शोधू नका, भक्कम बना कारण वाईट वेळ पण त्याच्यावरच येते, ज्याची ती सहन करण्याची लायकी असते.
Bad Time Quotes in Marathi
जीवन म्हटलं की सुख-दुःखाचे प्रसंग येणारच. पण या प्रसंगांना तुम्ही कसे सामोरे जाता हीच तुमची खरी परीक्षा आहे. जेव्हा तुम्ही दुःखाचा पेपर नीट सोडवता तेव्हाच तुम्हाला परमेश्वर सुखाच्या वर्गात उत्तीर्ण करत असतो.
1.जग बदलायला वेळ लागतो, पण आपली माणसं बदलायला फक्त वाईट वेळ लागते.
2.चांगले मित्र असताना तुमच्यावर वाईट वेळ येऊच शकत नाही, आणि आलीच तर तुमचे मित्र ती टिकू देणार नाहीत.
3.जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते ना, तेव्हाच तुम्हाला समजतं की, कोण तुमचं आहे आणि कोण तुमचं नाही
4.वेळेनुसार बदलला नाही तर वेळ तुम्हाला बदलून टाकेल
5.जेव्हा वाईट काळ सुरू होता, तेव्हा अनोळखी व्यक्तींच्या लाईनमध्ये सर्व ओळखीचेच चेहरे दिसले.
6.कोणीतरी थोडा वेळ दिला मला, मी आजपर्यंत तो जपून ठेवला आहे.
दुखी स्टेटस मराठी – Sad Time status marathi
माणसाला दुःख कुरवाळत बसायला आवडतं. म्हणून त्याची वाईट वेळ संपता संपत नाही. पण जर त्याने प्रयत्न केला तर इतर वेळेप्रमाणाने ही वेळ पण निघून जाईल आणि चांगली वेळ यायला वेळ लागणार नाही. पण तोपर्यंत मन मजबूत करण्यासाठी वाचा हे काही कोट्स
1.खूप कठीण असतं आपलं मन दुःखी असताना दुसऱ्याला आय अॅम फाईन म्हणणं.
2.दुःख फसल्याचं नाही, फसवणूक करणारे आपलेच होते याचं आहे.
3.तू दिलेल्या दुःखाने मला बरंच काही शिकवले
जग शेवटी कसे आहे ते मला तूच समजावले
4.दुःख आणि भावना कितीही लपवल्या तरी दिसतातच
5.आज खूप दिवसांनी मनापासून रडावसं वाटतंय, मनातलं सारं दुःख डोळ्यांमधून मोकळं करावंसं वाटतंय
6.वागणूक तर प्रत्येकाची लक्षात आहे, पण मी पण वेळ आल्यावरच उत्तर देईन.
तसंच वाचा यशस्वी जीवनासाठी करा सकारात्मक विचार मराठीत (Positive Thinking In Marathi)
Heart Touching दुखी स्टेटस मराठी
अशा वेळी मनातील दुःखी भावनांचा उद्रेक होतो, आलेल्या वाईट वेळेचा खूप राग येतो. पण थोडी कळ सोसली तर ही वेळपण निघून जाईल आणि जेव्हा चांगली वेळ येईल तेव्हा तुमच्यासमोर अनेक गोष्टींचा हळूवार उलगडा होईल. तोपर्यंत वाचा हे हार्ट टचिंग स्टेटस
1.वाईट वेळ सांगून येत नाही पण आली की सर्व काही शिकवून जाते.
2.एखाद्याच्या वाईट वेळत त्याच्या पाठीशी उभे राहा, पण ज्यांची नियत वाईट आहे त्यांना चुकूनही साथ देऊ नका.
3.वाईट वेळ चालू आहे, हे ही दिवस जातील…
पण तुमचे चेहरे कधीच विसरणार नाही, साथ देणाऱ्यांचेही आणि साथ सोडणाऱ्यांचेही…
4.वाईट गेल्यावर चांगली वेळ नक्कीच येते, पण ती पण वेळेवरच येते.
5.तुमच्यावर वाईट वेळ कधी आलीच तर जास्त दुःखी होऊ नका, कारण ती वेळ पण निघून जाईल, जाता जाता तुम्हाला मोलाची शिकवण देऊन जाईल.
6.वाईट काळ तुम्हाला त्या सत्याची जाणिव करून देतो, ज्याची तुम्ही चांगल्या काळात कल्पनापण केली नसेल.
Conclusion – वाईट वेळ स्टेटस | Bad Time Status In Marathi
आम्ही शेअर केलेले वाईट वेळ स्टेटस मराठी (Bad Time Quotes in Marathi), खराब वेळ स्टेटस (Kharab Time Status Marathi) दुखी स्टेटस मराठी, Sad वेळ मराठी स्टेटस, Hard Times वाईट वेळ स्टेटस, Life वाईट वेळ स्टेटस तुमच्या सध्याच्या वेळेशी सुसंगत असतील तर काळजी करू नका. कारण कोणतीच वेळ जास्त काळ राहात नाही, चांगली वेळ लवकरच येईल…