Advertisement

लाईफस्टाईल

यशस्वी जीवनासाठी करा सकारात्मक विचार मराठीत (Positive Thinking In Marathi)

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Apr 8, 2019
positive thinking in marathi

Advertisement

विचार माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचे असतात. निसर्गाने माणसाला विचारशक्ती अगदी मुक्त हस्ताने बहाल केली आहे. इतर कोणत्याही प्राण्याकडे विचार करण्याची अथवा विचारांची देवाण-घेवाण करण्याची शक्ती नाही. विचारांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. कारण विचार हे सतत मनात स्फुरत असतात. मानसशास्त्रानुसार माणूस दिवसभरात अंदाजे साठ हजार विचार करतो. या विचारांपैकी काही विचार तुम्ही जाणिवपूर्वक करता तर काही विचार तुमच्या विचारसरणीनुसार, संस्कारानुसार तुमच्या मनात स्फुरत असतात. काही विचार हे लहानपणापासून तुमच्यावर झालेले संस्कार, संगत आणि शिक्षण यानुसार तुमच्या मनात निर्माण होत असतात. मात्र तुम्ही चांगले अथवा वाईट कोणतेही विचार केले तरी त्या विचारांचा तुमच्या जीवनावर परिणाम हा होतच असतो. जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत जाते. थोडक्यात माणूस जरी काही काम न करता अगदी रिकामा जरी बसला असेल तरी त्यावेळी त्याच्या मनात विचार सुरूच असतात. अगदी सकाळी जाग आल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत माणूस विचारच करत असतो. एखादे काम करत असतानादेखील बॅक ऑफ दी माईंड खोलवर कुठेतरी सतत विचार सुरू असतात. जर माणूस सतत विचारच करत असेल तर तो नेहमी आपल्या विचारांच्या संगतीमध्ये जगत असतो असे म्हणावे लागेल. शिवाय विचारांप्रमाणे माणसाचे जीवन घडत असेल तर माणसाने विचार करताना सतत सावध राहणे देखील फार गरजेचे आहे. वाईट, नकारात्मक विचार जीवनाला चुकीची कलाटणी देतात तर सकारात्मक विचार (positive vichar marathi) माणसाला जीवनात यशाच्या शिखरावर नेतात. मात्र विचारांबाबत सावध नसल्यामुळे आजकाल सगळीकडेच नकारात्मक विचारसरणी दिसून येते. मन आणि विचारांचे सामर्थ्य माहीत नसल्यामुळे अनेक माणसे कळत अथवा नकळत सतत नकारात्मक विचार करत असतात. काही जणांना नकारात्मक विचार करण्याची ऐवढी सवय असते की प्रत्येक गोष्टीबाबत त्यांच्या मनात आधी नकारात्मक विचारच पहिला येतो. शिवाय आपण कळत आणि नकळत सतत नकारात्मक विचार करत आहोत याची पुसटची जाणिवदेखील या लोकांना नसते. मात्र निसर्ग आपले काम अगदी प्रामाणिकपणे करीत असतो. चुकीच्या विचारांचे परिणाम माणसाला निसर्गनियमानुसार भोगावेच लागतात. यासाठी प्रत्येक माणसाला सकारात्मक विचार मराठीत (positive thinking in marathi) आणि मनाचे सामर्थ्य माहीत असायलाच हवे. सतत प्रयत्नपूर्वक पॉझिटिव विचार करून तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यश मिळवू शकता. मात्र त्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह थिंकीक अथवा सकारात्मक विचार कसे करायचे हे तुम्हाला माहीत असायला हवे. 

सकारात्मक विचार मराठी

सकारात्मक विचार मराठी (Positive Thinking In Marathi)

काही लोकांना सतत वाईट आणि नकारात्मक विचार आणि उच्चार करण्याची सवय असते. या दोन्ही गोष्टी माणसासाठी अत्यंत चुकीच्या आहेत. म्हणूनच पू्र्वीच्या काळी शुभ बोल नाऱ्या, शुभं भवतू असे म्हटले जायचे. शिवाय घरात कधीच चुकीचे बोलू नये कारण वास्तू सतत तथास्तू म्हणत असते असेही सांगितले जायचे. यासाठीच माणसाने सतत चांगले आणि पॉझिटिव्ह बोलायला हवे. कारण विचार, उच्चार आणि आचार या तिन्ही स्थरांवर माणसाने जर सतत चांगले आणि सकारात्मक विचार (sakaratmak vichar in marathi) केले तशीच सकारात्मक परिस्थिती माणसाच्या वाट्याला येऊ शकते. नेहमी चांगले, यशाचे, हितकारक, सुखाचे, समाधानाचे, भरभराटीचे, उत्तम आरोग्याचे, समृद्धीचे विचार करणे म्हणजे सकारात्मक विचार मराठीत करणे होय. यासाठी सणा-सुदीला आपण इतरांना शुभेच्छा देत असतो. एखाद्या मौल्यवान भेटवस्तूपेक्षा प्रेमाने दिलेल्या शूभेच्छा फार महत्वाच्या असतात.

वाचा – दिवसाची सुरुवात करा सूर्योदय कोट्सपासून

सकारात्मक विचारसरणीचे फायदे (Benefits of Positive Thinking In Marathi)

जी माणसे सतत स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल पॉझिटिव्ह बोलतात अथवा विचार करतात. त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्वच प्रभावित करणारे असते. अशी माणसे नेहमी स्वतःला आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना आनंद देतात. सकारात्मक विचारसरणीमुळे त्यांच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असतो. ज्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांना पूरक आणि पोषक वातावरण निसर्गनियमानुसार निर्माण होते. निसर्गनियमानुसार सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या जीवनात नेहमी चांगलेच घडते.

सकारात्मक विचार करण्यासाठी आणखी काही सोप्या टीप्स (Tips To Positive Thinking In Marathi)

मन मजबूत करा (Strengthen Your Mind)

विचारांच्या तुमच्या मनावर प्रचंड पगडा असतो. यासाठी सतत चांगले आणि सकारात्मक विचार करून तुमचे मन मजबूत करा. मजबूत मन कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाही. जर तुमचे मन मजबूत असेल तर तुम्ही जीवनातील कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहता. कारण माणूस वाईट परिस्थितीमध्ये जास्त नकारात्मक विचार करण्यासाठी शक्यता असते.

वाचा – Buddha Purnima Quotes In Marathi

ताण-तणावापासून दूर रहा (Don’t Take Stress)

धकाधकीचे जीवन आणि सतत वाढणारी चिंता-काळजी ही सर्वाच्याच वाट्याला येत असते. मात्र कामाचा ताण तेवढ्यापुरताच घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही ऑफिस अथवा  कामाच्या ठिकाणी असता तेव्हा घरची चिंता काळजी न करता कामावर लक्ष नियंत्रित करा. ज्यामुळे तुम्हाला कामाचे टेंशन येणार नाही. प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम केल्यामुळे काम वेळेत पूर्ण होईल आणि घरी गेल्यावर तुम्हाला कामाचे टेंशन येणार नाही. त्याचप्रमाणे घरी असताना कामाचा विचार न करता कुंटुबासोबत मजेत वेळ घालवा. घरी पुरेसा वेळ दिल्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला घरातील चिंता सतावणार नाहीत.

वेळेचे आणि कामाचे योग्य नियोजन करा (Plan Your Time And Work Accordingly)

घरचे काम, ऑफिसचे काम, झोप, जेवण, व्यायाम, वाचन, चिंतन, आरोग्य, कुटुंबाला पुरेसा वेळ देणं या सर्वच गोष्टी माणसाच्या जीवनात फार महत्वाच्या आहेत. यासाठी या सर्व कामांचे योग्य नियोजन करा. नियोजन केल्यामुळे तुम्हा प्रत्येक कामाला योग्य न्याय देऊ शकाल. सतत नवनवीन ज्ञान आत्मसात करा जीवन हे अनेक चांगल्य-चांगल्या गोष्टींनी भरलेले आहे. जगात अनेक सकारात्मक गोष्टी घडत असतात. मात्र माणसे स्वभावानुसार नकारात्मक गोष्टी, गॉसिप यामध्ये जीवनातील बराचसा वेळ वाया घालवतात. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींचे ज्ञान मिळवा. या  ज्ञानामुळे तुमचे जीवन आनंदी आणि प्रफुल्लित होईल.

Good Night Marathi Message

सकारात्मक विचार कसा करावा (How To Think Positive In Marathi)

चांगले विचार कसे करावे

माणसावर संगतीचा खूप मोठा परिणाम होत असतो. तुम्ही ज्या संगतीमध्ये राहता त्याप्रमाणे तुमचे विचार असतात. चांगल्या विचारांच्या माणसांची संगत ही जाणिवपूर्वक मिळवावी लागते. उलट वाईट आणि नकारात्मक विचारांची माणसे आपोआप तुमच्या जवळ येतात. यासाठी जाणिवपूर्वक सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा.

प्राणायम आणि ध्यानधारणा (Pranayam And Meditation)

प्राणायम आणि ध्यानधारणा यामुळे तुमचे मन हळूहळू शांत आणि निवांत होऊ लागेल. मात्र प्राणायम आणि मेटीटेशन योग्य व्यक्तीकडून शिकून घ्यायला हवे. चुकीच्या पद्धतीने प्राणायम अथवा मेटीटेशन केल्यास त्याचे विपरित परिणाम तुमच्या शरीर आणि मनावर होऊ शकतात. तज्ञांकडून मेडीटेशन शिकणे शक्य नसल्यास सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना काही मिनीटे प्रार्थना अथवा शांत संगीत ऐकण्यासाठी द्या. ज्यामुळे तुमचे मन शांत होईल. मन शांत झाल्यामुळे तुम्हाला गाढ झोप लागेल आणि सकाळी उठल्यावर फ्रेश वाटेल. जेव्हा तुमची सकाळ फ्रेश होते तेव्हा सकारात्मक विचार करण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळते.

Pranayam And Meditation

चांगल्या पुस्तकांचे वाचन (Reading Good Books)

जगातील अनेक महान व्यक्तिमत्व ही त्यांच्या सकारात्मक विचारांमुळे जीवनात यशस्वी झालेली असतात. अशा लोकांनी त्यांच्या अनुभवातून लिहीलेल्या पुस्तकांच्या वाचनाने तुम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळू शकते. शिवाय तुमच्या विचारांना त्यामुळे योग्य दिशा मिळू शकते. दुसऱ्याच्या अनुभवातून शिकल्याचा माणसाला नेहमीच चांगला फायदा होतो.

नकारात्मक विचारांचा जीवनावर काय परिणाम होतो (How Negative Thoughts Affect Your Life)

जर एखाद्याला सतत नकारात्मक विचार करण्याची सवय असेल तर त्याचे परिणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागतात. कारण अशा माणसांच्या आयुष्यात चांगले, हितकारक कधीच घडत नाही. नकारात्मक विचार सरणीमुळे प्रयत्न करूनही त्यांच्या वाट्याला विपरित परिस्थिती येत राहते. सतत रडणारी, चिडचिड करणारी, दुःख करणारी माणसे आपण आजूबाजूला पाहत असतो. निसर्गाचा नियम आहे तुम्ही जे करता ते तुम्ही निसर्गाजवळ मागत असता. त्यामुळे निसर्गनियमानुसार तशीच निगेटिव्ह परिस्थिती त्या माणसांच्या वाट्याला येत असते. वास्तविक त्यांच्या जीवनात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना त्यांचे नकारात्मक विचार कारणीभूत आहेत हे न समजल्यामुळे आयुष्यभर ही माणसे नकारात्मक विचार करून स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य बिघडवतात. विचारांचे सामर्थ्य माहीत नसल्यामुळे अशी माणसे आयुष्यभर नशिबाला दोष देत बसतात. मात्र त्यांचे नशिब हे त्यांच्या विचारातून घडत आहे एवढी साधी गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही. अयोग्य मार्गदर्शन आणि चुकीची संगत यामुळे माणसे नकारात्मक विचार करू लागतात. अशी माणसे सहज नैराश्य, डिप्रेशन, मानसिक आजार यांना बळी पडतात. यासाठी घरात लहानपणापासूनच मुलांना चांगले आणि सकारात्मक विचार कसे मिळतील याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार अशा प्रकारची साहित्य वाचा. 

मनातील विचारांचा शरीरावर कसा परिणाम होतो (How Thoughts Affect Your Whole Body)

मनाचा आणि शरीराची एकमेकांशी गाढ संबध असतो. अनेकदा मन दुःखी असल्यास त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर झाल्याचा दिसून येतो. नैराश्य अथवा उदासीन माणसांना कोणतेही कारण नसताना पाठदुखी, दातदुखी, पोटदुखी अथवा डोकेदुखीचा त्रास जाणवतो. या दुखण्यावर डॉक्टरांकडे तपासणी केल्यावर कोणतेही शारीरिक कारण सापडत नाही. रिपोर्ट नॉर्मल असूनसुद्धा अशा लोकांना तीव्र डोकेदुखी, पाठदुखी अथवा पोटदुखीचा त्रास जाणवल्याची अनेक उदाहरणे आहेत. जेव्हा तुमचे मन प्रसन्न असते तेव्हा त्याचे सुपरिणाम तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दिसून येतात अगदी त्याचप्रमाणे मनातील दुःखद भावनांचे दुष्परिणामदेखील तुमच्या शरीरावर दिसून येतात. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी सतत सकारात्मक विचार करणे फार गरजेचे आहे.

शरीराची काळजी आणि मनाची काळजी कशी घ्यावी (How To Take Care Of Body and Mind)

शरीराची आणि मनाची काळजी घेण्यासाठी नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार करावेत. जर तुम्हाला सतत नकारात्मक विचार करण्यासाठी सवय असेल तर तुम्हाला प्रयत्नपूर्वक सकारात्मक विचार करावे लागतील. ताण-तणाव आणि आजूबाजूचे नकारात्मक वातावरण यामुळे जर तुमच्या मनात गोंधळ निर्माण झाला असेल. तर मन शांत आणि निवांत करण्यासाठी प्राणायम आणि मेडीटेशन जरूर करा. कारण तुमचे मन शांत झाल्यामुळे तुम्हाला सकारात्मक विचार करण्याचे आणखी बळ मिळेल.

FAQs

1. लहान मुलांना लहानपणापासून सकारात्मक विचार देण्यासाठी काय करावे?

लहानपणी तुमच्यावर जे संस्कार होतात त्यांच्या मोठेपणीदेखील तुमच्या मनावर पगडा राहतो. लहानपणापासूनच मुलांना चांगल्या विचारांची मुले, पुस्तके यांची संगत देण्याचा प्रयत्न करा. मुलांसमोर स्वतःदेखील सतत पॉझिटिव्हच बोला आणि आचरण करा. कारण मुलांचे सर्वात पहिले आदर्श त्यांचे पालक असतात. मोठी माणसे जशी वागतात तसेच वागण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात तफावत राहणार नाही याची काळजी घ्या. 

2. जर लहानपणीपासून सतत नकारात्मक विचार करण्याची सवय असेल तर अचानक मोठेपणी या विचारसरणीमध्ये बदल करणे शक्य आहे का?

होय, नक्कीच प्रयत्न केल्यास सर्व काही करणे शक्य आहे. जर तुम्हाला तुमचे जीवन यशस्वी करायचे असेल तर कोणत्याही वयात विचारसरणीमध्ये बदल करणे शक्य आहे. सकारात्मक विचार करण्यासाठी सतत चांगल्या विचारांच्या माणसे अथवा पुस्तकांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा.

positive vichar marathi

सकारात्मक विचारसरणीबाबत तत्वचिंतकांची काही मते (According To Experts)

सकारात्मक विचार मराठीत आणि त्याचे फायदे याबाबत अनेक तत्वचिंतकांचे मार्गदर्शन फार महत्वाचे ठरते.

सकारात्मक विचारांबाबत तत्वचिंतक डॉ. मर्फी असं सांगतात, “You think with your conscious mind and whatsoever you habitually think sinks down in deeper levels of your sub-conscious mind which creates according to the nature of your thoughts. Just as water takes the shape of the pipe it flows through, similarly the life principle flows through you according to the nature of your thoughts.”

भारतीय तत्वचिंतक वामनराव पै यांच्या मते, माणसाने सकारात्मक विचारांसोबत नेहमी सहकारात्मक आणि विधायक विचारदेखील करायला हवेत. कारण त्यामुळे राष्ट्राचीही प्रगती होते. इतरांच्या भल्याचे आणि कल्याणाचे विचार केल्याने निसर्गनियमानुसार माणसाची प्रगती आपोआप होते. कारण क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा एक अटळ नियम आहे. शिवाय तुम्ही चांगले अथवा वाईट इतरांसाठी जे काही करता ते निसर्गनियमानुसार बुमरॅंग होऊन तुमच्याकडेच परत येत असते. त्यामुळे सतत सर्वांच्या भल्याचा, कल्याणाचा विचार करणे माणसाच्या नेहमीच हिताचे ठरते.” यासाठी वामनराव पै यांनी विश्वकल्याणकारी “विश्वप्रार्थना” निर्माण केली ज्यामुळे सर्वजण सतत सकारात्मक आणि सहकारात्मक विचार करू शकतात.

हे ईश्वरा,

सर्वांना चांगली बुद्धी हे, आरोग्य दे.

सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.

सर्वांचं  भलं कर, कल्याण कर, रक्षण कर

आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे”

विश्वातील प्रत्येकाचे भले व्हावे हा सर्वात मोठा सकारात्मक विचार आहे. सकारात्मक, व्यापक आणि विधायक विचार नियमित केल्यास तुमचे मन नेहमीच प्रसन्न राहील. थोडक्यात जीवनात यशस्वी होण्यासाठी माणसाने स्वतःसाठीआणि इतरांसाठी सकारात्मक विचार करावेत. आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये अवश्य कळवा.

You Might Like These:

आषाढी एकादशीनिमित्त सुविचार (Ashadhi Ekadashi Quotes In Marathi)

Couple Relationship Quotes In Marathi For Whatsapp (कपल्स नाती कोट्स)

फोटोसौजन्य – इन्टाग्राम