ADVERTISEMENT
home / आपलं जग
बेबी डायपर वापराचे फायदे आणि नुकसान  (Benefits and Side effects of Baby Diaper Use in Marathi)

बेबी डायपर वापराचे फायदे आणि नुकसान (Benefits and Side effects of Baby Diaper Use in Marathi)

लहान मुलांसाठी वापरण्यात येणाऱ्या लंगोटचाच एक प्रकार म्हणजे डायपर. पूर्वी तान्ह्या बाळांसाठी कपड्यांच्या लंगोटचा वापर केला जात असे. पण आजकाल मात्र कपड्याच्या लंगोटचा वापर तेवढा केला जात नाही. आता अगदी तान्ह्या बाळांसाठीही सर्रास डायपरचा वापर केला जातो. अगदी शहरातच नाहीतर तर गावातही आजकाल लोक नवजात शिशूंसाठी डायपरचा वापर करतत. जर कोणी महिला आपल्या बाळाला घेऊन हॉस्पिटल, लांबच्या ठिकाणी किंवा फिरायला जाणार असल्यास डायपरचा वापर करणं सोपं जातं.

diaper-use-benefits2

एवढं असूनही बाळांसाठी डायपर्सचा वापर करावा की करू नये याबाबत मातांमध्ये संभ्रमाचं वातावरण असतं. या लेखात आम्ही तुम्हाला कपड्यापासून बनवण्यात येणाऱ्या डायपरबद्दल आणि डिस्पोजेबल डायपर या दोन्हींचे फायदे आणि तोटे सांगणार आहोत.

1. डायपर्सचे प्रकार – Types of diaper in Marathi

ADVERTISEMENT

2. मुलांना डायपर्स का घातलं जातं – Uses of diaper in Marathi

3. कपड्याच्या डायपरचे फायदे – Benefits of cloth diaper in Marathi

4. कपड्याच्या डायपरचे तोटे – side effects of cloth diaper in Marathi

5. डिस्पोजेबल डायपरचे फायदे – Benefits of Disposable diaper in Marathi

ADVERTISEMENT

6. डिस्पोजेबल डायपरचे तोटे – Side effects of Disposable diaper in Marathi

7. डायपरबाबत विचारण्यात आलेले काही प्रश्न FAQs about Diaper Use in Marathi

डायपरचे विविध प्रकार – Types of diaper in Marathi

बेबी डायपरचे अनेक प्रकार आढळतात आणि वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रकारचे डायपर्स तुम्हाला दिसतील. पण साधारणतः डिस्पोजेबल डायपर आणि कापडाचे रियुजेबल डायपर्स यांचाच जास्त वापर केला जातो. या दोन्ही प्रकारांमध्ये मुख्य फरक आहे तो किंमतींचा. डिस्पोजेबल बेबी डायपर्सची किंमत बाजारात घ्यायला गेल्यास फारच महाग आहे. तेच कापड्याच्या रियुजेबल डायपर्सची किंमत त्यामानाने कमी असून तुम्ही त्याचा वापर धुवून पुन्हा पुन्हा करू शकता. त्यामुळे काही लोकांना कापडाचे डायपर आवडतात तर काहींना डिस्पोजेबल डायपर फायदेशीर वाटतात.

मुलांना डायपर का घातलं जातं? – Uses of diaper in Marathi

आता तुम्ही म्हणाल हा काही विचारायचा प्रश्न आहे का? याचं उत्तर अगदी साधं आहे की, मुलांना शू किंवा शी झाल्यास डायपर घातल्याने त्यांचे कपडे किंवा घरातील बेड किंवा चादरी खराब होत नाहीत. तसंच वारंवार बाळाचे कपडेही बदलावे लागत नाहीत. तसंच बाळाला डायपर घातल्यामुळे वारंवार आपलेही हात खराब होत नाही. एक डायपर खराब झाल्यावर लगेचच आपण बाळाला दुसरं डायपर घालू शकतो. मुलांना एकदा डायपर घातलं की, आईबाबाही चिंतामुक्त होतात. पण डिस्पोजेबल डायपर वापरणं मुलांच्या आरोग्यासाठी तेवढं चांगलं नाही.

ADVERTISEMENT

डायपरच्या मुख्य प्रकारांपैकी एक असलेल्या कापडाच्या रियुजेबल डायपर्सचे फायदे जाणून घेऊया.

कापडाच्या डायपरचे फायदे – Benefits of cloth diaper in Marathi

diaper-use-benefits3

भारतातही आता सहजरित्या कापडापासून बनवलेले रियुजेबल डायपर्स उपलब्ध आहेत. बाळांसाठी असलेल्या अनेक वेबसाईट्सवर तुम्हाला हे डायपर खरेदी करता येतील. पूर्वी या डायपरबाबत भारतात एवढी जागरूकता नव्हती. पण आता मात्र कापडी डायपर हे भारतातही कमी किमतीत आणि चांगल्या दर्जामध्ये उपलब्ध आहेत.

– कापडाचं डायपर अधिक मलमूत्र शोषून घेतं
– कापडाचे डायपर्स हे स्वस्त असतात
– कापडाच्या डायपरचा अनेकदा वापर करता येतो
– कापड्याचे डायपर हे मुलांसाठी जास्त आरामदायी असतात
– कापडाच्या लंगोटच्या वापराने मुलांना कमी रॅशेस येत नाहीत
– कपड्याच्या डायपरमध्ये हानिकारक रसायन नसतात
– कपड्याचं डायपर हे वजनाला हलक असतं

ADVERTISEMENT

कपड्याचे डायपर हे अधिक मलमूत्र शोषून घेतात – (Cloth diapers more absorbent)

असं मानलं जातं की, कापडाचे डायपर्स हे मूलांची शू आणि शी जास्त प्रमाणात शोषून घेतं आणि अंथरूणाला डागही लागू देत नाही. एवढंच काय तर मुलांना तुम्ही रात्रभरसुद्धा हे कापडी डायपर घालून झोपवू शकता आणि यामुळे त्यांच्या त्वचेवर लालीही येत नाही. म्हणूनच मुलांसाठी कापडी डायपर्स जास्त फायदेशीर मानले जातात.

कापडाचे डायपर असतात स्वस्त – (Cloth Diapers are Cheap)

कापडाचे डायपर्स हे डिस्पोजेबल डायपरच्या तुलनेत स्वस्त असतात. त्यामुळे त्याचा आर्थिक भार पालकांवर पडत नाही. जोपर्यंत मुलं मोठी होत नाहीत तोपर्यंत त्यांना डायपर घालावे लागतात. त्यामुळे डायपरच्या खर्चाचा भार पालकांना उचलावाच लागतो. त्यामुळे कापडाच्या डायपर सर्वात मोठा फायदा म्हणजे याचा वापर तुम्ही वारंवार करू शकता. ज्यामुळे तुमच्या खिश्यावरील खर्चाचा भारही कमी होतो.

कपड्याच्या डायपरचा वारंवार वापर करता येतो – (Cloth Diapers Multiple Uses)

कापडाच्या डायपरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याचा वापर तुम्ही धुवून उन्हात सुकवून पुन्हा पुन्हा करू शकता. जेव्हा तुमचं मूल मोठं होईल तेव्हा याचा वापर तुम्ही तुमच्या दुसऱ्या मुलासाठी किंवा एखाद्या गरजू पालकांना देऊ शकता.

कापडाच्या डायपरचा वापर आहे आरामदायी – (Cloth Diaper More Comfortable)

diaper-use-benefits4

ADVERTISEMENT

जर्मनीत करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार लहान मुलांच्या गुप्तांगाचं तापमान हे जरा जास्त असतं. त्यामुळे जास्त काळासाठी मुलांनी कापडाचे डायपर वापरल्यास त्यांना कोणताही त्रास किंवा बैचेनी जाणवत नाही. हे मुलांसाठी फारच आरामदायी असतात आणि मुलांना यामध्ये बरंही वाटतं.

कापडामुळे येत नाहीत रॅशेज – (Cloth Diaper Reduce Rash)

साधारणतः कापडाचे डायपर्स बनवण्यासाठी सूती कापडाचा वापर केला जातो. ज्यामुळे बाळाच्या त्वचेचीही आपोआपच काळजी घेतली जाते. डायपरमध्ये वापरण्यात येणारं सूती कापड हे खूपच मऊ आणि कोमल असतं. त्यामुळे कापडाचे डायपर घातल्याने लहान मुलांच्या त्वचेवर लाली, रॅशेस किंवा पुरळ येत नाही. नाहीतर नवीन आई वडील झालेल्या पालकांना बाळाचा त्रास पाहून टेंशन येते आणि मग इंटरनेट वर डायपर रॅश वरील उपाय शोधताना किंवा डॉक्टरांकडे जाऊन त्रस्त होताना आपण बघतो.

कापडाच्या डायपरमध्ये नसतात हानीकारक रसायन –(Cloth Diapers Have Less Harmful Chemicals)

कापडाच्या डायपरचा वापर हा अजून एका गोष्टीमुळे फायदेशीर असतो. तो म्हणजे यात केमिकल्सचा वापर फारच कमी प्रमाणात केला जातो. ज्यामुळे लहान मुलांच्या संवेदनशील त्वचेवर याचा कोणताही परिणाम होत नाही.

कपड्याचे डायपर्स असतात हलके – (Cloth Diapers are light weight)

शुद्ध कॉटनच्या कापडापासून बनवण्यात आलेले डायपर हे खूपच हलके असतात. त्यामुळे हे घातल्यावर मुलांना जड वाटत नाही. याचा अजून एक फायदा म्हणजे यातून हवा ही खेळती राहते ज्यामुळे त्वचेवर कोणताही नकारात्मक प्रभाव पडत नाही. तसंही कॉटन हे मुलांच्या नाजूक त्वचेसाटी चांगलं मानलं जातं.

ADVERTISEMENT

इतके फायदे असूनही कापडाच्या डायपरचे काही तोटे आहेतच – Side Effects of Cloth Diaper in Marathi

– जर तुम्ही तुमच्या मुलाला कापडाचे डायपर घालत असाल तर ते तुम्ही वापर करून झाल्यावर फेकू धेऊ शकत नाही. कापडाचे डायपर हे नेहमी धुवून सुकवून तुम्हाला परत वापरावे लागतात. यामध्ये पालकांचा बराच वेळ जाऊ शकतो.
– कपडाचे डायपर हे मुलांना घालून लांबच्या प्रवासाला जाणं सोयीस्कर नाही. कारण प्रवासात हे डायपर खराब झाल्यास तुम्ही ते साफ करू शकत नाही किंवा फेकून देऊ शकत नाही.
– कपडाच्या डायपर सर्वात मोठा तोटा म्हणजे यामध्ये जितके वेळा मुलं पॉटी करेल तितके वेळा तुम्हाल ते बदलावं लागतं आणि धुवावं लागतं.

वर आपण पाहिले ते कापडापासून बनवलेल्या डायपरबाबतचे फायदे आणि तोटे. आता जाणून घेऊया डिस्पोजेबल डायपरबाबत

डिस्पोजेबल डायपरचे फायदे – Benefits of Disposable diaper in Marathi

diaper-use-benefits1

– डिस्पोजेबल डायपर हे वापरण्यास जास्त सोयीस्कर
– डिस्पोजेबल डायपर लगेच बदलता येतं
– हाइपोअॅलर्जेनिक डिस्पोजेबल डायपर हे सुरक्षित असतात

ADVERTISEMENT

– डिस्पोजेबल डायपर हे वापरण्यास जास्त सोयीस्कर  – (Disposable diapers more convenient)

इतर डायपर्सच्या तुलनेत डिस्पोजेबल डायपर्स हे वापरासाठी जास्त सोयीस्कर असतात. हे कोणत्याही दुकानात किंवा औषधाच्या दुकानात तुम्हाला सहज खरेदी करता येतात. याचा वापर करून झाल्यावर तुम्ही लगेच फेकून देऊ शकता किंवा खराब होताच हे बदलणंही सोपं जातं.

डिस्पोजेबल डायपरचा मुख्य फायदा म्हणजे लगेच बदलता येतं – (Disposable diapers can be changed quickly)

डिस्पोजेबल डायपर घालून तुम्ही लहान मुलांना फिरायला, पार्टीला किंवा लांबच्या प्रवासाला जाऊ शकता आणि खराब झाल्यास लगेच बदलूही शकता. जेव्हा शक्य असेल तेव्हा मुलांना घातलेले डिस्पोजेबल डायपर बदलावे. खूप वेळ घालून ठेऊ नये.

हाइपोअॅलर्जेनिक डिस्पोजेबल डायपर हे असतात सुरक्षित – (Disposable diaper come as hypoallergenic)

डिस्पोजेबल डायपरच्या निवडीचा अजून एक मोठा फायदा म्हणजे हे अनेक प्रकारे बनवले जातात आणि यामध्ये अनेक वेगवेगळ्या रसायनांचा वापरही केला जातो. जर तुम्ही डिस्पोजेबल डायपर खरेदी करणार असाल तर हाइपोअॅलर्जिक डिस्पोजेबल डायपर खरेदी करा जे तुमच्या मुलाच्या त्वचेला सुरक्षित ठेवतात आणि ज्यामुळे जळजळ किंवा खाज येण्याची समस्या उद्भवत नाही.

डिस्पोजेबल डायपरचे तोटे – Side effects of Disposable diaper in Marathi

– एका अभ्यासानुसार इतर डायपर्सच्या तुलनेत डिस्पोजेबल डायपरमध्ये अधिक रसायनांचा वापर केला जातो. ज्यामुळे लहान मुलांच्या नाजूक त्वचेला जळजळ किंवा खाज येण्याचा त्रास होऊ शकतो.

ADVERTISEMENT

– डिस्पोजेबल डायपर हे वातावरणासाठीही चांगले नसतात. कारण यातील घटक हे वातावरणाला दूषित करतात.
– डिस्पोजेबल डायपर हे जास्त वेळ मुलांना घातल्यास त्यांना रॅशेसचा त्रास होऊ शकतो.
– कापड्याच्या डायपरच्या तुलनेत डिस्पोजेबल डायपर हे महाग असतात. त्यामुळे हे डायपर विकत घेणं महाग पडू शकतं.
– कपड्याच्या डायपरप्रमाणे डिस्पोजेबल डायपरचा वापर तुम्ही अनेकदा करू शकत नाही. त्यामुळे दरवेळेला तुम्हाला नवीन डायपर खरेदी करावे लागतात.
– डिस्पोजेबल डायपर हे साधारणतः प्रत्येक मुलाच्या मापाप्रमाणे उपलब्ध नसतात. त्यामुळे ते खरेदी केल्यामुळे कधी-कधी पैसे वाया जाऊ शकतात.

डायपरबाबत विचारण्यात आलेले काही प्रश्न FAQs about Diaper Use in Marathi

diaper-use-benefits5

1. डायपर्सचा वापर नवजात शिशूंसाठी करावा का?

डायपर्सचा थेट संपर्क हा नवजात शिशूच्या त्वचेशी येतो. त्यामुळे डायपर वापरताना काळजी घ्या. रात्रीच्या वापरासाठी खास तयार करण्यात आलेले डायपर्सच रात्री वापरा. वजनाला जड असलेले डायपर दिवसभरात वापरणं टाळा. जेल-बेस्ड किंवा स्कीन क्रिम असलेले डायपर किंवा कापडाचे डायपर वापरा.

ADVERTISEMENT

2. डायपरचा वापर पुन्हा पुन्हा केला जाऊ शकतो का?

नाही. डिस्पोजेबल डायपर असल्यास तुम्ही त्याचा एकापेक्षा जास्त वेळा वापर करू शकत नाही. पण कापडाचं डायपर असल्यास ते धुवून आणि सुकवून तुम्ही त्याचा एकापेक्षा जास्त वेळा वापर करू शकता.

3. डायपरचा वापर रोज करणं कितपत योग्य आहे?

दिवसभरात तुम्ही डायपरऐवजी लंगोट किंवा दुसऱ्या पर्यायांचा वापर करू शकता. कारण डायपर हे किमात दोन ते तीन तासांनी बदलणं गरजेचं आहे. जास्त वेळ बाळाला डायपर घातल्यास त्वचेला इन्फेक्शन किंवा रॅशेस येऊ शकतात.

ADVERTISEMENT

हेही वाचा –

नवजात बाळाच्या आईला माहीत हव्या ‘या’ 4 कंफर्टेबल ब्रेस्टफिडींग पोझिशन्स

सी – सेक्शन (सिझेरियन) समज आणि गैरसमज

प्रेगन्सीनंतर पुन्हा सुडौल दिसण्यासाठी करा ‘हे’ उपाय 

ADVERTISEMENT
06 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT