आपल्या घरात ,कुटुंबात बाळ आल्याचाआनंद वेगळाच असतो. आई-बाबा होण्यासाठी लोक कितीतरी प्रयत्न करतात. घरात हा छोटा पाहुणा यावा यासाठी लोक आपली सगळी संपत्ती खर्च करण्यास देखील तयार असतात. मुलगा असो की मुलगी- घरात नवा पाहुणा आला की सगळे आनंदित होतात. ते छोटेसे बाळ घरातील सर्वांना लळा लावते. अगदी घरात पाळीव सदस्य असेल तर त्यालादेखील बाळ त्याच्या बाळलीलांनी लळा लावते. बाळ येणार ही गोड बातमी कळताच घरातील सगळे लोक त्या बाळाला कोणत्या नावाने हाक मारायची याचे प्लॅनिंग करण्यास सुरुवात करत. बाळाचा जन्म झाल्यावर त्याचे बारसे होईपर्यंत घरचे सगळेच बाळाला छोट्या छोट्या गोंडस नावांनी हाक मारतात. बाळाला प्रेमाने हाक मारताना त्याला लाडू, पिल्लू, छकुला,बालू, छोटू आणि बाबू अशी नावे सर्वजण देतात. परंतु त्याच्या कुटुंबातील सदस्य विशेषत: त्याचे पालक त्याच्यासाठी एक नाव शोधतात, ज्यामुळे त्याला ओळख मिळते आणि त्याला आयुष्यभर त्याच नावाने हाक मारली जाते. म्हणूनच आईवडील आपल्या बाळासाठी एक छान ,सुंदर अर्थ असलेले एक अद्वितीय नाव शोधतात. अनेक लोक बाळ येणार हे कळल्यापासून नावांची यादी करायला घेतात तर काही लोक बाळाच्या जन्मानंतर त्याच्या पत्रिकेनुसार कोणते अक्षर आले आहे हे जाणून घेऊन त्यानुसार नावे शोधतात. बाळासाठी चांगले नाव शोधतानाआपण प्रत्येक नाव खूप खोलवर शोधतो आणि त्याचा अर्थही आपल्याला शोधावा लागतो. त्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते. जसं मुलींसाठी रॉयल मराठी नावे आहेत त्याच प्रमाणे मुलांकरिताही नक्कीच आहेत.
Table of Contents
तुमचे हे टेन्शन दूर करण्यासाठी, आम्ही इथे मुलांसाठी काही मराठी मुलांची नावे सुचवत आहोत. तसेच तुम्हाला नाव निवडणे सोपे जावे म्हणून त्याबरोबरच नावाचा अर्थ देखील दिलेला आहे. तुमच्या घरी जुळ्या बाळांच्या रूपाने दुप्पट आनंद आला असेल तर येथे जुळ्या मुलांची युनिक नावे तुमच्यासाठी खास दिलेली आहेत. जर तुम्ही पालक होणार असाल तर मराठी मुलांची नावे (Marathi Mulanchi Nave) असलेली ही लिस्ट सेव्ह करून ठेवा. लहान मुलांसाठी ट्रेंडी नावांची (Lahan Mulanchi Nave) ही यादी वाचा आणि तुमच्या बाळासाठी एक छानसे नाव निवडा. या यादीत दिलेली बहुतेक नावे संस्कृत भाषेतून घेतली गेली आहेत आणि ती अगदी अनोखी आहेत. चला तर मग जाणून घेऊया काही सुंदर मराठी मुलांची नावे (Marathi Mulanchi Nave)-
मराठी मुलांची नावे – Marathi Mulanchi Nave
अनेक पालक त्यांच्या बाळासाठी श्री गणेशाची नावे शोधतात. तुमच्या बाळासाठी तुम्ही जर आपल्या मराठी मातीतील अस्सल मराठमोळी सुंदर नावे शोधत असाल तर खालील यादी वाचा. यात सुंदर अर्थासह अनेक छान नावे दिलेली आहेत जी तुम्हाला तर आवडतीलच, शिवाय तुमचे बाळ मोठे झाल्यावरही त्याला छान शोभून दिसतील.
नाव | नावाचा अर्थ |
अरुण | सूर्याचा सारथी |
अद्वैत | अद्वितीय, ब्रह्मदेव व विष्णू यांचे दुसरे नाव |
अंबरीश | आकाशाचा देव , विष्णूचे एक नाव |
अनिरुद्ध | ज्याला प्रतिबंधित करता येत नाही असा धैर्यवान , विष्णू |
आदित्य | सूर्य |
चैतन्य | जीवन, ज्ञान, चेतना |
प्रथमेश | गणपती |
प्रणव | ओंकार |
प्रसाद | देवाचा आशीर्वाद |
अविनाश | अक्षय, ज्याचा कधी नाश होत नाही असा, अमर |
अवनीश | पृथ्वीचा ईश , गणपती, विष्णू |
अमोल | अनमोल |
अजित | जो कधीही हरत नाही असा अजेय |
राहुल | गौतम बुद्धांचा पुत्र |
रोहित | गडद लाल रंग |
रोहन | स्वर्ग, विष्णू |
अभिनव | आधुनिक, युवा |
वेदांत | तत्वज्ञान, उपनिषदे |
ओंकार | ओम , गणपती |
वल्लभ | प्रिय |
कौस्तुभ | विष्णू, एक मौल्यवान मणी |
वेदांग | परम सत्य, आत्मबोध |
केदार | महादेव |
हर्षद | आनंद देणारा |
हर्षल | तेजस्वी तारा |
अतुल | अतुलनीय , ज्याची कशाशी तुलना होऊ शकत नाही असा |
सुनील | श्रीकृष्ण |
अजय | यश, अजिंक्य |
शिशिर | एक ऋतू |
हेमंत | एक ऋतू |
अधिक वाचा – बाळासाठी कृष्णाची नावे
ट्रेडिंग मराठी मुलांची नावे – Trending Marathi Mulanchi Nave
हल्ली पालकांना त्यांच्या बाळासाठी काहीतरी नवीन पण चांगल्या अर्थाची नावे हवी असतात. तुम्हीही तुमच्या बाळासाठी अशीच काही हटके पण प्रसिद्ध नावांच्या शोधात असाल तर तुमचे काम सोपे होण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी ट्रेंडिंग नावांची लिस्ट आणली आहे. यातील बरीच नावे तुम्हाला ओळखीची वाटतील कारण ती सध्या ट्रेंडमध्ये आहेत. ही नावे संस्कृत भाषेतील असल्याने त्यांचे अर्थ देखील छान आहेत आणि त्यांची आपल्या मराठी मातीशी नाळ जोडलेली आहे.
नाव | नावाचा अर्थ |
सचिन | इंद्रदेव |
सौरभ | सुगंध |
मोहन | श्रीकृष्ण |
माधव | श्रीकृष्ण |
महेंद्र | इंद्रदेव |
अनुराग | प्रेम , भक्ती |
शार्दूल | सिंह |
शरण्य | सूर्य |
भास्कर | सूर्य |
मिहीर | सूर्य |
श्रीकांत | विष्णू |
पुष्कर | कमळ |
पंकज | कमळ |
सिद्धार्थ | गौतम बुद्ध |
सिद्धेश | भाग्यवान, सक्षम |
कबीर | महान , संत कबीरांचे नाव |
अजिंक्य | जो कधीही हरत नाही असा |
अच्युत | विष्णू |
अखिलज्ञ | सूर्य |
अनंत | सूर्य |
मिहीर | सूर्य |
ईशान | महादेव |
आरव | हाक , आवाज |
अर्णव | समुद्र |
प्रसन्न | खुश, आनंदी |
उज्ज्वल | प्रकाशमय , सूर्य |
विराजस | गौतम बुद्ध , राजा |
ह्रषीकेश | इंद्रियांवर नियंत्रण मिळवणारा, विष्णू |
निर्जर | सूर्य |
वीर | सूर्य |
युनिक मराठी मुलांची नावे – Unique Marathi Mulanchi Nave
प्राचीन काळापासून, मुलाच्या जन्मानंतर बाराव्या दिवशी मुलाचे नाव ठेवण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. हिंदू धर्मात, मुलाचे नाव चांगल्या अर्थाचे असावे, किंबहुना देवाचे नाव असावे यावर जोर दिला जातो. मुलाचे नाव त्याला पुढे जाऊन आयुष्यात वेगळी ओळख देते. प्रत्येकाचे वेगळे अस्तित्व मान्य करण्याच्या उद्देशाने नामकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, कारण त्यावर व्यक्तीचे संपूर्ण भविष्य अवलंबून असते.हे नाव पुढे आयुष्यभर व मृत्यूनंतरही माणसाबरोबर कायम राहते. म्हणूनच आईवडिलांनी मुलाचे नाव ठेवताना खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावा. तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव काहीतरी युनिक ठेवायचे असेल तर पुढे वाचा. यामध्ये मुलांची दोन अक्षरी नावे देखील आहेत जी शॉर्ट अँड स्वीट वाटतात.
नाव | नावाचा अर्थ |
शर्व | महादेव |
ओजस | शक्ती |
जयिन | विजयी |
अमरेश | इंद्रदेव |
तेजस | सूर्य |
श्रेयस | सूर्य |
निखिल | संपूर्ण, परिपूर्ण |
निनाद | ध्वनि, आवाज |
विश्वम | विश्व, सृष्टी |
अव्यय | विष्णू |
अक्षर | विष्णू |
प्रभव | विष्णू |
अप्रमेय | विष्णू |
शाश्वत | विष्णू |
दुर्गेश | दुर्गाचा देव |
प्राणद | विष्णू |
विक्रम | विष्णू |
त्रिविक्रम | विष्णू |
अभिराम | श्रीराम |
राघव | श्रीराम |
अमेय | गणपती |
सम्मित | समान |
रुद्र | महादेव |
वेद | – |
अनघ | पवित्र |
उपेंद्र | सुंदर, आकर्षक |
अमोघ | गणेश |
प्रांशु | विष्णू |
उर्जीत | विष्णू |
श्रीनिवास | विष्णू |
अधिक वाचा – मुलांसाठी खास हनुमानाची नावे
क्युट लहान मुलांची नावे – Cute Lahan Mulanchi Nave
ज्या घरात छोटा पाहुणे येणार असतो, त्या घरातील लोकांमध्ये उत्साह भरभरून वाहत असतो. सगळे लोक बाळाच्या स्वागताच्या तयारीला लागतात. बाळाच्या जन्मानंतर त्याचे नाव ठेवताना केवळ कुटुंबच नाही तर नातेवाईक, मित्रमंडळीही छान छान नावे सुचवतात. हिंदू धर्मानुसार, मुलाच्या जन्मानंतर त्याच्यावर एकूण सोळा प्रकारचे संस्कार केले जातात आणि त्यापैकी एक नामकरण विधी आहे, ज्यामध्ये मुलाचे नाव ठेवले जाते. तुमच्या बाळासाठी तुम्ही छानसे क्युट नाव शोधत असाल तर खालील यादी वाचा. तुमच्या घरी जुळ्या भावंडांचे आगमन झाले असेल तर त्यांना दोन अक्षरी नावे शोभून दिसतात.
नाव | नावाचा अर्थ |
सुपर्ण | विष्णू |
समीरण | विष्णू |
निमिष | क्षण |
समीहन | विष्णू |
आवर्तन | – |
रिषभ | एक स्वर |
गंधार | एक स्वर |
वर्धमान | विष्णू |
सुधांशु | चंद्र |
चंद्रांशु | चंद्राचे किरण |
अनल | विष्णू , अग्नी |
पवन | वायू |
नहुष | विष्णू |
नकुल | पंडुपुत्र , मुंगूस |
अर्जुन | शुभ्र, उज्वल |
पार्थ | पृथाचा पुत्र, अर्जुन |
स्कंद | कार्तिकेय |
वरद | गणपती |
वरूण | इंद्र |
शौर्य | पराक्रम |
शरभ | महादेव |
अनय | गणपती |
शत्रुघ्न | शत्रूला मारणारा |
सौमित्र | लक्ष्मण |
सुव्रत | विष्णू |
सर्वज्ञ | विष्णू |
सुश्रुत | प्राचीन आयुर्वेदाचार्य , चांगली प्रतिष्ठा असणारा |
स्वप्नील | स्वप्न |
श्रीश | विष्णू |
संकर्षण | बलराम |
नामकरण संस्कार किंवा बारसे या संस्कारानंतर मुलाला त्याचे नाव आणि ओळख मिळते. आजकाल पालक मुलाचे नाव ठेवण्यासाठी बरेच संशोधन करतात, कारण सर्व पालकांना आपल्या मुलाचे नाव आधुनिक, चांगले आणि अद्वितीय असावे असे वाटते. जर तुम्ही तुमच्या बाळासाठी गोंडस नाव शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला अर्थासह अनोख्या नावांची यादी दिली आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या बाळासाठी चांगले नाव निवडता येऊ शकेल. या यादीत मराठी मातीतील अस्सल मराठी मुलांची नावे (Marathi Mulanchi Nave) आहेत. यापैकी एखादे नाव तुम्हाला नक्कीच आवडेल.
Photo Credit – istockphoto
हेही वाचा –