उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की वेध लागतात ते कैरीच्या पन्ह्याचे. कैरीचे पन्हे हे उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याचे अनेक फायदे आहेत. हे हंगामी फळ असलं तरीही याचे फायदेही अनेक आहेत. कैरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स यांचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. याचा खरं तर वेगवेगळ्या प्रकारात आपण वापर करत असतो. कैरीचं लोणचं, मँगो मिल्क शेक, आमरस असे अनेक पदार्थ आपण करतो. पण यापैकी जास्त फायदा होतो तो कैरीच्या पन्ह्याने. हा एक लोकप्रिय पदार्थ आहे. याचा आंबट गौड स्वाद आपल्याला याचे सेवन करण्यास आणि चव घेण्यास नक्की भाग पाडतो. पण तुम्हाला याचे आरोग्याला होणारे फायदे माहीत आहेत का? आम्ही या लेखातून तुम्हाला याचे महत्त्वाचे फायदे सांगणार आहोत. कैरीचे पन्हे पिण्याचे नक्की फायदे काय आहेत हे आपण पाहूया.
बद्धकोष्ठापासून देते संरक्षण
कैरीच्या पन्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्याचे सेवन केल्यामुळे तुमचे पचनस्वास्थ्य चांगले राहाते आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याचे पन्हे प्यायल्याने पोट साफ राहते आणि पोटाचा कोटा साफ राहिल्याने पोटाला त्रास होत नाही.
मधुमेही रूग्णांसाठी ठरते फायदेशीर
कैरीच्या पन्ह्यामध्ये नैसर्गिक साखर असते. यामध्ये लॉ ग्लाईसेमिक इंडेक्स असते त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. उन्हाळ्याच्या दिवसात याचे सेवन करण्याने इन्शुलिनची पातळी कमी होत नाही. त्यामुळे मधुमेह न वाढता आरोग्याची काळजी घेण्याचं काम कैरीचे पन्हे करते.
नैसर्गिक रक्तप्रवाह सुधारतो
फळांचा राजा समजल्या जाणाऱ्या या आंब्यामध्ये विटामिन सी चे प्रमाण असते. जे आपल्या रक्तप्रवाहासाठी उत्तम ठरते. शरीरातील रक्तसंचार सुधारण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. कैरीचे पन्हे आपले ब्लड सर्क्युलेशन नीट वाढवते आणि नव्या प्रवाहासाठीदेखील याचा फायदा मिळतो.
कॅन्सरपासून करते बचाव
कैरीमध्ये विटामिन सी जास्त प्रमाणात असते ज्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळे कॅन्सरच्या विषाणूंना मारण्याचे काम कैरी करत असते. त्यामुळे आतड्याचा कॅन्सर आणि पोटाचा कॅन्सर न होण्यासाठी आपण कैरीचे पन्हे नेहमी प्यायला हवे. याची अतिशयोक्ती नक्कीच नको मात्र तुम्हाला त्यापासून फायदाही नक्कीच मिळतो.
त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत
आंबा खाण्याचे फायदे
यामधील विटामिन सी आणि ए ही पोषक तत्वे आपल्या त्वचेला अधिक चमकदार करण्यासाठी मदत करतात. तसेच तुम्हाला जर चेहऱ्यावर सुरकुत्या नको असतील तर तम्ही कैरीचे पन्हे हे नक्कीच प्यायला हवे. कारण तुमची त्वचा अधिक सुंदर आणि डागविरहीत करण्यासाठी यातील पोषक तत्वे फायदेशीर ठरतात.
उन्हाळ्यात थंडावा देतील या ‘5’ रिफ्रेशिंग आईस टीज
डोळ्यांसाठीही फायदेशीर
Aam Panna Benefits In Marathi
कैरीच्या पन्ह्यामध्ये विटामिन ए आढळते. हे आपल्या डोळयांसाठी फायदेशीर ठरते. कैरीचे पन्हे प्यायल्याने डोळे निरोगी राहतात आणि दृष्टीदेखील चांगली राहते. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी नीट ठेवायची असेल तर तुम्ही कैरीचे पन्हे नक्की प्या.
दातांच्या हिरड्या राहतात निरोगी
कैरीच्या पन्ह्यामध्ये असलेले विटामिन सी हे पोषण देतेच मात्र यामध्ये असलेले पोटॅशियम आणि कॅल्शियम हे दात आणि हिरड्यांच्या निरोगीपणासाठी अधिक फायदेशीर ठरते. तुम्हाला तुमचे दात निरोगी ठेवायचे असतील तर तुम्ही कैरीच्या पन्ह्याचा उपयोग करून घेऊ शकता.
कच्च्या कैरीच्या स्वादिष्ट रेसिपी करा घरच्या घरी
डिहायड्रेट होऊ देत नाही
उन्हाळ्याच्या दिवस शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता जास्त असते. शरीरात योग्य प्रमाणात पाणी जाणेही आवश्यक आहे. पण कैरीच्या पन्ह्यामुळे तुम्ही डिहायड्रेशनपासून वाचता. तसेच हे शरीराला योग्य थंडावा मिळवून देते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात याचे सेवन करणे योग्य ठरते.
प्रतिकारशक्ती वाढवते
विटामिन सी, विटामिन बी6, विटामिन ए असे सर्व अँटीऑक्सिडंट्स असणारे घटक आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात आणि हे सर्व घटक आपल्याला कैरीच्या पन्ह्यामध्ये आढळतात. तसेच याचे सेवन आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासही मदत करतात.
अस्सल हापूस आंबे ओळखण्याची ही योग्य पद्धत
कैरीचे पन्हे कसे तयार कराल
साहित्य
- 2-3 कैरी
- 2 चमचे काळे मीठ
- 2 चमचे जिरे पावडर
- अर्धा चमचा काळी मिरी पावडर
- 15-20 पुदीना पाने
- 100 – 150 ग्रॅम साखर
बनविण्याची पद्धत
- कैरी उकडून घ्या. तुमच्याकडे जर चूल असेल तर कैरी थोडी शेकून मग उकडा (त्याची चव अधिक चांगली लागते)
- त्यानंतर त्याची कोय काढून टाका आणि उकडलेल्या कैरीचा गुदा काढून घ्या
- त्यात साखर, काळे मीठ, पुदीना घालून मिक्सरमधून वाटा
- दुसऱ्या भांड्यात गाळून घ्या
- त्यात काळी मिरी पावडर आणि जिरा पावडर घाला आणि पाणी मिक्स करा
- कैरीचे पन्हे तयार